दैनिक पंचांग मंगळवार, दि. ११ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, आश्लेषा २३|३९
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शयता आहे. मनोरंजनावर खर्च होईल.

वृषभ : एखाद्या प्रोजेटसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे. आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्याने आपले कार्य किंचित सोपे होईल.

मिथुन : आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल गंभीररीत्या विचार करण्यासाठी या वेळी आपणास एकांताची आवश्यकता असू शकते.

कर्क : आज नवीन संबंध स्थापित करणे, माहितीची देवाण-घेवाण व मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शयता आहे. सध्या आपल्याकडे भरपूर शारीरिक ताकद व आत्मविश्वास आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

सिंह : आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे.

कन्या : अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. आपण इतर लोकांबरोबर एक भावनात्मक नाते निर्माण करण्यासाठी एखादा ओळखीचा मार्ग शोधता.

तूळ : नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ.

वृश्चिक : कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. प्रेम संबंधांमध्ये
स्थिती होकारात्मक राहील. यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. लेखन कार्यात यश मिळेल. येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल.

धनु : लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. आरोग्य चांगले राहील. व्यापार व्यवसायात स्थिती सुखद राहील.

मकर : आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. वाहने व उपकरणे जपून हाताळावीत. आपण सहजरित्या नवीन आव्हाने पेलता.

कुंभ : पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. मानसिक स्थिरता वाढेल. मान सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. आज आपल्या स्वतःच्या तर्कांना बळ मिळू शकेल.

मीन : व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. प्रवास काळजीपूर्वक करा. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

रक्तगट कशावरून ठरवतात?

रक्तगट कशावरून ठरवतात?

तुमचा रक्तगट कोणता, हे अनेकदा अनेकांनी तुम्हाला विचारले असेल. रक्तगट माहीत नसणे, हे सुशिक्षित लोकांना कमीपणाचे वाटू लागले आहे; ही चांगली गोष्ट आहे. या रक्तगटांविषयी थोडयात माहिती करून घेऊ. सगळ्यांचे रक्त लाल असते व सगळ्यांच्या रक्तात लाल, पांढर्‍या पेशी, हिमोग्लोबीन, पाणी हे घटक सारखेच असले तरी रक्तगटाच्या बाबतीत मात्र ते सारखे नसते. लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटांचा शोध लावला. लाल रक्तपेशी वर अ, इ या घटकांच्या (अँग्ल्युटीनोजेन) असण्या वा नसण्यावर रक्ताचे चार गट करण्यात येतात. अ आणि इ या घटकांशी क्रिया करून लालपेशी साकळवणार्‍या घटकांना अ‍ॅग्लुटीनीन असे म्हणतात.

अ रक्तगट असणार्‍या माणसाच्या रक्तात बीटा, B गटाच्या रक्तात अल्फा, O गटाच्या रक्तात अल्फा, बीटा दोन्ही अ‍ॅग्लुटीनीन उपस्थित असतात. AB गटाच्या रक्तात हे दोन्ही नसतात. A, O, B, AB अशा वरील वर्गीकरणाखेरीज रक्ताचे Rh+Ve आणि Rh-Ve असे वर्ग असतात. +Ve रक्त असेल तर त्यात D- अ‍ॅग्लुटोनोजेन असते व -Ve असेल तर ते नसते.

त्यामुळे वरील वर्गीकरणावरून एकूण रक्तगट असे करता येतील : A+Ve, A-Ve, B+Ve, B-Ve, AB+Ve, AB-Ve, O+Ve, O-Ve. यातही जर कुणाच -Ve रक्तगट असेल, तर त्यास +Ve रक्तगटांचे रक्त चालणार नाही. त्यास Ve रक्तगटाचेच रक्त द्यावे लागते. परंतु +Ve रक्तगटाचे रक्त चालू शकते.

या रक्तगटांचे महत्त्व आपल्याला रक्त स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते. तसेच जर मातेचा रक्तगट -Ve असेल आणि तिच्या गर्भात जर +Ve रक्तगटाचे मूल असेल, तर त्या रक्तांमध्ये विरोधी क्रिया होऊ शकते आणि मातेवर व गर्भावर विपरित परिणाम होऊ शकतात. रक्तगटाचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यावरून पालकत्व सिद्ध करता येऊ शकते. लँडस्टीनरच्या या शोधामुळे रक्तदानाच्या क्षेत्रात खूप मोलाचा विकास झाला आहे.

सुविचार

अत्यंत सुंदर व सुगंधी फूल लज्जाशील व विनयशील असते. : वर्डस्वर्थ

बाळांच्या डायपरचा वापर

बाळांच्या डायपरचा वापर
लहान बाळ कपडे ओले करू नये म्हणून
त्याला डायपर घालतात, मात्र हे डायपर बराच
वेळ ओलं राहिलं तर बाळाला त्याचा त्रास
होऊ शकतो. त्याच्या त्वचेवर लाल रॅशेस
येऊ शकतात. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने
बाळाचं डायपर बदल रहा. तसंच ओलं डायपर
जास्त वेळा ठेवू नका. तसंच बाळाची त्वचा
स्वच्छ टिश्यूपेपरने साफ करा.

कॉर्नमेथी भाजी

कॉर्नमेथी भाजी

साहित्य : तीन जुड्या मेथी, तीन
वाट्या मयाच्या कणसाचा कीस, एक वाटी
मयाचे दाणे, दोन वाट्या बारीक चिरलेला
कांदा, एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा,
एक चमचा धने-जिरे पूड, चवीनुसार मीठ,
तिखट, फोडणीसाठी एक वाटी तेल, मोहरी,
हिंग, हळद.
साहित्य : मेथी निवडून धुवून घ्यावी.
हिरवी मिरची वाटून घ्यावी. मयाची कणसं
किसून घ्यावी. मयाचे वाटीभर दाणे काढून
ठेवावे. कांदा चिरून ठेवावा.

कृति : तेलाची
फोडणी करून त्यात कांदा परतावा. मयाचे
दाणे, मेथी घालून परतावी. झाकण ठेवून
शिजवून घ्यावी. हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ,
धने-जिरे पूड, हवं असल्यास तिखट घालून
ढवळून एक दोन वाफा द्याव्या.

वास्तू

किचन संबंधी
* स्वयंपाककर्त्या स्त्रीचे तोंड पूर्वे
स असावे. दक्षिण दिशेला घरातील किचन
प्लॅटफॉर्म (स्वयंपाकाचा ओटा) असू नये.
यामुळे वारंवार आरोग्याच्या तक्रारी
उद्भवतात.
* देवघरात नंदादीप व निरांजन सतत
तेवत ठेवा. हे शय नसेल, तर झिरो वॅटचा
दिवा सतत जळत ठेवा.

भाकरी तुटत असतील तर

भाकरीचे पीठ भाताच्या पेजेत मळावे.
भाकरी तुटणारही नाही व चवदारही होईल.

तारुण्यपिटिका

चेहर्‍यावर तारुण्यपिटिका येत असतील
तर आंबट दह्याचा लेप चेहर्‍यावर लावावा
आणि सुकल्यानंतर धुवून टाकावा. दोन-तीन
दिवसातच तारुण्यपिटीका नष्ट होतील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

गौरव : ‘सिनेमात माझी मेल्याची अ‍ॅटींग पाहून
एक बाई बेशुद्ध पडली.’
केदार : ‘अरे हे तर काहीच नाही! मी एकदा
मेलेल्याची अशी अ‍ॅटींग केली होती की, ते
पाहून जीवन विमावाल्यांनी माझ्या पत्नीला
माझ्या विम्याच्या पैशांचा चेक पाठवून दिला.

दैनिक पंचांग रविवार, दि. ९ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, पुनर्वसु २०|२१
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या.

वृषभ : व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आजचा दिवस महत्वपूर्ण ठरेल. व्यापार व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा.

मिथुन : आर्थिक बाबतीत एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून स्थिती पाहावी लागेल.
शत्रूंपासून सावध राहा. दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील.

कर्क : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या
नवीन आवडींना प्रोत्साहन द्याल. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील.

सिंह : जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्याल. दिवस आनंदात जाईल. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल.

कन्या : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. कोणतेही कार्य सहजरित्या
होणार नाही.

तूळ : आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शयता. त्याची
कसोटी घेणारा हा दिवस आहे. कौटुंबिक सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील.

धनु : रहाते घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शयता आहे.

मकर : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो.
शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. वाहने काळजीपूर्वक चालवा.

कुंभ : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल. विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल. मित्रांचा सहयोग मिळेल.

मीन : सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. मुले त्रास देऊ शकतात. अनावश्यक चिंता टाळा. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर