दैनिक पंचांग रविवार, दि. ९ जून २०२४

0
44

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, पुनर्वसु २०|२१
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या.

वृषभ : व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. आजचा दिवस महत्वपूर्ण ठरेल. व्यापार व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा.

मिथुन : आर्थिक बाबतीत एखादी विषम परिस्थती उद्भवण्याआधी आपली आर्थिक स्थिती तपासून स्थिती पाहावी लागेल.
शत्रूंपासून सावध राहा. दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील.

कर्क : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या
नवीन आवडींना प्रोत्साहन द्याल. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील.

सिंह : जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्याल. दिवस आनंदात जाईल. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल.

कन्या : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. कोणतेही कार्य सहजरित्या
होणार नाही.

तूळ : आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शयता. त्याची
कसोटी घेणारा हा दिवस आहे. कौटुंबिक सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील.

धनु : रहाते घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शयता आहे.

मकर : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो.
शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. वाहने काळजीपूर्वक चालवा.

कुंभ : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल. विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल. मित्रांचा सहयोग मिळेल.

मीन : सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. मुले त्रास देऊ शकतात. अनावश्यक चिंता टाळा. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर