रक्तगट कशावरून ठरवतात?

0
43

रक्तगट कशावरून ठरवतात?

तुमचा रक्तगट कोणता, हे अनेकदा अनेकांनी तुम्हाला विचारले असेल. रक्तगट माहीत नसणे, हे सुशिक्षित लोकांना कमीपणाचे वाटू लागले आहे; ही चांगली गोष्ट आहे. या रक्तगटांविषयी थोडयात माहिती करून घेऊ. सगळ्यांचे रक्त लाल असते व सगळ्यांच्या रक्तात लाल, पांढर्‍या पेशी, हिमोग्लोबीन, पाणी हे घटक सारखेच असले तरी रक्तगटाच्या बाबतीत मात्र ते सारखे नसते. लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटांचा शोध लावला. लाल रक्तपेशी वर अ, इ या घटकांच्या (अँग्ल्युटीनोजेन) असण्या वा नसण्यावर रक्ताचे चार गट करण्यात येतात. अ आणि इ या घटकांशी क्रिया करून लालपेशी साकळवणार्‍या घटकांना अ‍ॅग्लुटीनीन असे म्हणतात.

अ रक्तगट असणार्‍या माणसाच्या रक्तात बीटा, B गटाच्या रक्तात अल्फा, O गटाच्या रक्तात अल्फा, बीटा दोन्ही अ‍ॅग्लुटीनीन उपस्थित असतात. AB गटाच्या रक्तात हे दोन्ही नसतात. A, O, B, AB अशा वरील वर्गीकरणाखेरीज रक्ताचे Rh+Ve आणि Rh-Ve असे वर्ग असतात. +Ve रक्त असेल तर त्यात D- अ‍ॅग्लुटोनोजेन असते व -Ve असेल तर ते नसते.

त्यामुळे वरील वर्गीकरणावरून एकूण रक्तगट असे करता येतील : A+Ve, A-Ve, B+Ve, B-Ve, AB+Ve, AB-Ve, O+Ve, O-Ve. यातही जर कुणाच -Ve रक्तगट असेल, तर त्यास +Ve रक्तगटांचे रक्त चालणार नाही. त्यास Ve रक्तगटाचेच रक्त द्यावे लागते. परंतु +Ve रक्तगटाचे रक्त चालू शकते.

या रक्तगटांचे महत्त्व आपल्याला रक्त स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते. तसेच जर मातेचा रक्तगट -Ve असेल आणि तिच्या गर्भात जर +Ve रक्तगटाचे मूल असेल, तर त्या रक्तांमध्ये विरोधी क्रिया होऊ शकते आणि मातेवर व गर्भावर विपरित परिणाम होऊ शकतात. रक्तगटाचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यावरून पालकत्व सिद्ध करता येऊ शकते. लँडस्टीनरच्या या शोधामुळे रक्तदानाच्या क्षेत्रात खूप मोलाचा विकास झाला आहे.