हवाबंद डब्यातील अन्न खाल्ल्याने विषबाधा होते का?

हवाबंद डब्यातील अन्न खाल्ल्याने विषबाधा होते का?

घरगुती पद्धतीने साठवलेल्या भाज्या, खारवलेले मासे, घरी बनवलेले चीज अशा आम्लाचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांमुळे बोटूलिझम नावाची अन्नविषबाधा होते. अन्नविषबाधेचा हा एक भयंकर पण सुदैवाने क्वचित आढळणारा प्रकार आहे. लॉस्ट्रीडीयम बोटूलिनम नावाच्या जिवाणूपासून निर्माण होणार्‍या विषद्रव्यामुळे ही विषबाधा होते. हे विष अतिशय विषारी असते. इतके विषारी की १०० ग्रॅम विषामुळे जगातील सर्व लोक मृत्युमुखी पडतील. लॉस्ट्रीडीयम बोटूलिनम हा जिवाणू माती, धूळ आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये सापडतो. या जीवाणूच्या कोषावस्था अन्नावाटे माणसाच्या शरीरात जातात. असे अन्न खाल्ल्यानंतर १२ ते ३६ तासांत विषबाधेची लक्षणे दिसून येतात. ऑसिजन नसलेल्या अवस्थेत विषाची निर्मिती होते. हे तयार असलेले विष आपण सेवन करतो व त्यामुळे विषबाधा होते. हे विष मज्जासंस्थेवर विपरित परिणाम करते.

या विषबाधेत-गिळायला त्रास होणे, एका ऐवजी दोन वस्तू दिसणे, पापण्या उघडता न येणे, सांधे दुखणे, दृष्टीवर परिणाम होणे, हातपाय गळून जाणे व लुळे पडणे; अशी लक्षणे दिसतात. श्वसन थांबल्याने व हृदयाचे कार्य थांबल्याने मृत्यू येतो. या विषबाधेच्या उपचारामध्ये बोटूलिनम साठीच्या प्रतिविषाचा प्रामुख्याने उपयोग करतात. मेंदूतील पेशींवर विषाचा परिणाम झालेला नसेल तरच हे प्रतिविष उपयुक्त ठरते. बोटूलिनम टॉसाईडने लसीकरण केल्यास या रोगाचा प्रतिबंध करता येतो. चांगली चिकित्सा सेवा व शुश्रूषा मिळाल्यास रोगी वाचू शकतो. या विषाचा विषारीपणा उष्णतेमुळे नाहीसा होतो. त्यामुळे अन्न १००० सेंटीग्रेड तापमानाला काही मिनिटे तापवले, तर विषबाधेचा धोका राहणार नाही. सर्वात चांगले म्हणजे रोज ताजे अन्न खावे.

 

सुविचार

सर्वांगसुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात, तर गवत झपाट्याने उगवत असते. : शेसपियर

पित्त व कफ कमी करणारी बोरे

पित्त व कफ कमी करणारी बोरे
बोरे गुणांनी स्निग्ध, बृहण करणारी,
पचायला जड (गुरू) व मधुर आहेत. हिवाळ्यात
अनेकांना आव पडण्याचा किंवा आमांशाचा
त्रास होतो. तो टाळण्यासाठीही बोरे चांगली.
बोरे अग्निदीपन करणारी असून, ती पित्त व कफ
कमी करणारी व सारकदेखील आहेत. त्यामुळे
पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात.
लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे
काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक
असल्यासारखे घटक आहेत.

मक्याचा पुलाव

मक्याचा पुलाव

साहित्य : तीन वाट्या मक्याचे दाणे,
साडेचार वाट्या तांदूळ, आठ हिरव्या मिरच्या,
कढीपत्ता, सहा कांदे, तीन चमचा जिरं,
नारळाचं दूध, ओलं खोबरं (सजावटीसाठी),
कोथिंबीर, सहा चमचे तूप, आठ लवंगा, चार
छोटे दालचिनी तुकडे, सहा मसाला वेलची,
बारा-पंधरा मिरे, हळद, हिंग, मीठ, पाच
सहा तमालपत्र.
कृती : तांदूळ धुऊन निथळत
ठेवावेत. मक्याचे दाणे उकडून घ्यावे. कांदा
उभा चिरावा. मिरच्यांचे बारीक तुकडे करावे.
नारळाचं दूध काढावं. तूप तापवून त्यावर
जिरं, हिंगाची फोडणी करावी. कढीपत्ता,
हळद घालावी. कांदा लालसर परतावा. लवंग,
दालचिनी, मसाला वेलची, मिरे, तमालपत्र
घालून पुन्हा परतावं. त्यावर निम्मे मयाचे
दाणे, तांदूळ घालून परतावं, नारळाचं दूध
घालावं. नंतर मीठ घालून भात शिजू द्यावा.
वाढताना वरून कोथिंबीर, खोबरं, मयाचे
वाफवलेले दाणे, डाळिंबाचे दाणे घालावे.

वास्तू

कडीच्या आवाजाने वितंडवाद
आजोबा आपण दरवाजाच्या कडीशी
खेळताना ओरडल्याचे आपल्याला आठवत
असेल, तर याचा संबंध कडीच्या आवाजाशीच
आहे. यामुळे घरात वितंडवाद होतात.

ड्राय त्वचेसाठी

* ड्राय त्वचेसाठी – ड्राय त्वचेवर बर्‍याचदा
अकाली सुरकुत्या पडतात. त्या त्वचेसाठी दह्यात
पपईच्या ज्यूस व ऑलिव्ह ऑइल मिसळून पेस्ट
तयार करावी. त्यामध्ये थोडेस ग्लिसरीनचे थेंब
मिसळावे. हा मास्क चेहर्‍यावर थोडा वेळ लावून
ठेवावा. नंतर कोमट पाण्याने चेअरा धुवावा.
* हर्बल मास्कसाठी हळदीचा, तसेच
पिंपल्सपासून रक्षणासाठी कडुलिंबाच्या पानांचा
वापर करू शकता.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

शिक्षक : सांग, माकडाला
इंग्लिशमध्ये काय म्हणतात?
गण्या : मंकी
शिक्षक : खर सांग पुस्तकात
बघून बोललास ना?
गण्या : नाही सर देवाची शपथ मी
तुमच्याकडे बघून बोललो…

दैनिक पंचांग शनिवार, दि. ८ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, आर्द्रा १९|४२
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा.

वृषभ : दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन : महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल.

कर्क : आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल.

सिंह : शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. महत्त्वाचा कार्यक्रम होण्याची शयता आहे.

कन्या : प्रेयसीशी संपर्क होण्याची शयता आहे. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ. वाहने व उपकरणे जपून हाताळावीत.

वृश्चिक : आरोग्य चांगले राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. आपण सहजरित्या नवीन आव्हाने पेलता.

धनु : उल्हासाचा अनुभव येईल. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद देतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल.

कुंभ : मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल.

मीन : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

वनस्पती तूप कसे तयार करतात?

वनस्पती तूप कसे तयार करतात?

तूप व तेल हे दोन्ही मेदपदार्थांचेच प्रकार आहेत. दोहोंतील महत्त्वाचा फरक म्हणजे सर्वसामान्य तापमानाला तूप घन अवस्थेत, तर तेल द्रव अवस्थेत असते. रासायनिकदृष्ट्याही दोन्ही कार्बन, हायड्रोजन व ऑसिजनपासून बनलेले असतात. दोन्हींमध्ये मेदाम्ले असतात. सुयोग्य तापमान व दाबाच्या अवस्थेत आणि रासायनिक क्रियेला पूरक अशा घटकांच्या उपस्थितीत पाण्याचा रेणू व वनस्पतीज तेल यांचा संयोग (हायड्रोजीनेशन) होऊन वनस्पती तूप तयार होते. हायड्रोजीनेशन या प्रक्रियेत तेलात असणार्‍या असंपृक्त मेदाम्लांचे रूपांतर संपृक्त मेदाम्लात होते व अरॅचिडोनीक, लिनोलेइक व लिनोलेनीक या मेदाम्लांचे प्रमाण खूप कमी होते. तुपाचा मुख्य फायदा म्हणजे ते घट्ट असते व कोणत्याही हवामानात चांगले टिकते. आरोग्याच्या दृष्टीने तुपापेक्षा तेल खाणे चांगले.

संपृक्त मेदाम्ले जास्त असलेले मेदपदार्थ नेहमी सेवन केल्यास रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते व त्या रोगग्रस्त होतात. हृदयविकारही होतो. याउलट असंपृक्त मेदाम्ले अधिक असलेले मेदपदार्थ म्हणजेच तेल सेवन केल्यास हृदयविकार टाळता येऊ शकतात. वनस्पती तूप अतिप्रमाणात खाणे अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक ठरते. आजकाल वनस्पती तुपाचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी १०० ग्रॅम वनस्पती तुपामध्ये २५०० आंतरराष्ट्रीय एकके जीवनसत्त्व ‘अ’ व १७५ आंतरराष्ट्रीय एकके जीवनसत्त्व ‘ड’ मिसळलेले असते.

सुविचार

प्रेमाची खरी भाषा म्हणजे फुले होत. : पी. बेन्जामिन