कॉर्नमेथी भाजी

0
21

कॉर्नमेथी भाजी

साहित्य : तीन जुड्या मेथी, तीन
वाट्या मयाच्या कणसाचा कीस, एक वाटी
मयाचे दाणे, दोन वाट्या बारीक चिरलेला
कांदा, एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा,
एक चमचा धने-जिरे पूड, चवीनुसार मीठ,
तिखट, फोडणीसाठी एक वाटी तेल, मोहरी,
हिंग, हळद.
साहित्य : मेथी निवडून धुवून घ्यावी.
हिरवी मिरची वाटून घ्यावी. मयाची कणसं
किसून घ्यावी. मयाचे वाटीभर दाणे काढून
ठेवावे. कांदा चिरून ठेवावा.

कृति : तेलाची
फोडणी करून त्यात कांदा परतावा. मयाचे
दाणे, मेथी घालून परतावी. झाकण ठेवून
शिजवून घ्यावी. हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ,
धने-जिरे पूड, हवं असल्यास तिखट घालून
ढवळून एक दोन वाफा द्याव्या.