त्वचेचा तेलकटपणा

तेलकट त्वचेवर दही, बेसन आणि मध
एकत्र करून लावावे व सुकल्यावर चोळून
धुवावे. त्वचेचा तेलकटपणा कमी होईल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग बुधवार, दि. १२ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, मघा २६|२
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल
राहील. आज जास्त खर्च होईल. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवतील.

वृषभ : मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. मागील उधारी व उसनवारी वसूल होईल.

कर्क : मान-सन्मानात वाढ होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल.

सिंह : न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार व्यवसाय सुरळीत राहील. राजकीय व्यक्तींसाठी
स्थिती संतोषदायक राहील. आजचा दिवस जोमदार ठरेल.

कन्या : आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. आपल्या करीयरमधील ध्येयपूर्ती कराल. प्रवासाचे योग संभवतात.

तूळ : आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करेल.

वृश्चिक : आपल्या क्रोधावर संयम ठेवाल आणि सहकार्यांबरोबर वादाची स्थिती टाळाल. आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे.

धनु : अधिकार्‍यांंकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल.

मकर : यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. दिवस संमिश्र जाईल.

कुंभ : आर्थिक नुकसानीची शयता आहे. आपली बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस.

मीन : धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल. व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

काजू शेंगदाण्याहून चांगले असतात का?

काजू शेंगदाण्याहून चांगले असतात का?

शेंगदाणे खाणार्‍यांना काजू खाणार्‍यांचा नेहमीच हेवा वाटेल! हो की नाही? कारण एक किलो काजूच्या किंमतीत ८-१० किलो शेंगदाणे सहज घेता येतील. एवढे महाग काजू खायला मिळाले तर तब्येत सुधारेल, असेही अनेकांना वाटत असेल; पण हे खरे आहे का? या दोहोंचा तुलतात्मक अभ्यास केल्यास असे लक्षात येते की काजूमध्ये ४६.९ टक्के इतके मेदपदार्थ असतात, तर शेंगदाण्यात त्यांचे प्रमाण ४० टक्के इतके असते. या उलट शेंगदाण्यामध्ये २६.७ टक्के प्रथिने असतात. काजूमध्ये प्रथिनांचे प्रमाण याहून कमी असते. शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची खूप गरज असते. मेद पदार्थापासून ऊर्जा मिळते. काजू व शेंगदाणे या दोहोंपासून व जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच लोह मिळते.

वरील तुलनेवरून असे लक्षात येईल, की काजू व शेंगदाण्यात पोषक द्रव्यांच्या दृष्टीने फारसा फरक नसतो. शरीराला प्रथिने व मेद पदार्थ तसेच जीवनसत्त्व ‘ब’ व क्षार दोहोंपासून सारख्याच प्रमाणात मिळतात; परंतु किंमतीतील तफावत लक्षात घेता काजूपेक्षा शेंगदाणे खाणे श्रेयस्कर ठरेल. अर्थात ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे काजू खाणे शय आहे, त्यांनी ते जरूर खावेत, पण काजू फार पौष्टिक आहेत या भ्रमात राहून न परवडताही ते खरेदी करून पुरवून खाणे मात्र नक्कीच टाळायला हवे. कारण एक किलो शेंगदाणे व त्याच किमतीत येणारे काजू यांची पोषणाच्या दृष्टीने तुलना केल्यास शेंगदाणे सरस ठरतील. त्यामुळे किमतीचा विचार केल्यास काजूहून शेंगदाणेच चांगले, असे म्हणावे लागेल.

सुविचार

जीवन एक पुष्प आहे, प्रेम हा त्याचा सुगंध आहे. : व्हिटर ह्यूगो

हिवाळ्यात बाळाची आंघोळ

हिवाळ्यात बाळाची आंघोळ
हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला बराच
वेळ आंघोळ घालत बसू नये. कोमट पाण्याने
पटकन त्याची आंघोळ करून लगेच त्यांचं
अंग सुती, मऊ कापडाने पुसून घ्यावे. तसंच
आंघोळीपूर्वी त्यांच्या संपूर्ण शरीराला तेल
लावून हलया हाताने मालिश करावी.

डिंक पुडींग

डिंक पुडींग

साहित्य : १ किलो लोणी, खसखस,
खारीक पूड, बदाम पूड, खडीसाखर,
खोबर्‍याचा कीस, सुंठपूड, तयार डिंक पूड.
कृती : डिंकपूडीचे दोन भाग करावे.
निम्मी साजूक तुपात भाजून घ्यावी व निम्मी
तशीच ठेवावी. खोबर्‍याचा कीस, खसखस
भाजून घ्यावे. लोणी कढवत ठेवावे. त्यात
भाजलेली डिंक पूड, खारीक पूड, बदामपूड,
खडीसाखर, भाजलेला खोबर्‍याचा कीस आणि
सुंठ पूड घालावी. हे मिश्रण राहिलेल्या निम्म्या
डिंकपूडीवर ओतावे त्याबरोबर डिंक फुलून
येईल. लगेच तो बरणीत भरावा.

किचन संबंधी

किचन संबंधी
* भाकरीचे पीठ भाताच्या पेजेत
मळावे. भाकरी तुटणारही नाही व चवदारही
होईल.
* तिजोरी स्थिर असावी. तसेच ती
स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहणारी
असावी. ती कलती नसावी. यासाठी वेगळी
खोली असल्यास तिला पिवळा रंग (समृद्धीचा
/ सोन्याचा) द्यावा. ज्यायोगे ‘धनवृद्धी’ होते.
ईशान्य कोपर्‍यातील तिजोरीमुळे चोरीचे भय
संभवते. नैर्ऋत्य कोपर्‍यातील तिजोरीमुळे
घरात येणारा पैसा वाममार्गाने जातो. तिजोरी
ही मुख्य वास्तूच्या शयतो उत्तर दिशेस
असावी.
* स्वयंपाककर्त्या स्त्रीचे तोंड पूर्वे
स असावे. दक्षिण दिशेला घरातील किचन
प्लॅटफॉर्म (स्वयंपाकाचा ओटा) असू नये.
यामुळे वारंवार आरोग्याच्या तक्रारी
उद्भवतात.

वास्तू

* ब्रेडच्या दोन्ही बाजूंना लोणी लावून
भाजा. त्याची चव आणि कुरकुरीतपणा तो
खाल्ल्यावरच समजून येईल.

चेहर्‍यावरील तारुण्यपिटिका

* चेहर्‍यावर तारुण्यपिटिका येत
असतील तर आंबट दह्याचा लेप चेहर्‍यावर
लावावा आणि सुकल्यानंतर धुवून टाकावा.
दोन-तीन दिवसातच तारुण्यपिटीका नष्ट
होतील.
* दही केसांसाठी उपयुक्त आहे.
आठवड्यातून एकदा आंबट दही केसांना
चोळावे. तासाभराने केस धुवावेत. याने
केसातील कोंडा नष्ट होतो.
* साय आणि गुलाबजल एकत्र करून
आंघोळीपूर्वी १५ मिनिटे त्वचेवर लावा. त्वचा
नरम व चमकदार होईल. त्यातील कोरडेपणा
जाईल. छिद्रे मोकळी होतील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,
नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

सखाराम पोपटरावांच्या ६० व्या वाढदिवसाच्या
पार्टीला जातो,
सखाराम : अरे, पोपटराव केकवर बल्ब का
लावलाय?
पोपटराव : अरे, ६० मेणबत्त्या लावायला त्रास पडत
होता, म्हणून ६० चा बल्ब लावून टाकला.