* लिपस्टिकच्या रिकाम्या केस सुया-
पिना, हुस इ. छोट्या वस्तू ठेवण्यासाठी
वापरा.
* च्युइंगम चावल्याने मानसिक क्षमतेत
पन्नास टक्के इतका फायदा होऊ शकतो.
याने आपला हार्ट रेट वाढतो आणि या
कारणाने रक्ताचा असरही वाढतो. यामुळे
मेंदूतील ऑसिजनचे प्रमाण वाढते. यामुळे
स्मरणशक्तीमध्ये अधिक फायदा होतो.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
च्युइंगम चावल्याने असा फायदा होतो
हसा आणि शतायुषी व्हा!
हसा आणि शतायुषी व्हा!
एक प्राध्यापक आपल्या बायकोला रोज पान खायला देत.
लग्नानंतर एक-दीड वर्ष गेल्यावर बायको म्हणाली,
“अहो, लग्नानंतर पहिले दोन-चार महिने माझं कौतुक म्हणून तुम्ही
पान दिलंत हे ठीक पण यापुढे देऊ नका.
उगाच कशाला ते खर्चिक कौतुक?”
प्राध्यापक म्हणाले, “अगं एक पान खाल्ल्यानं तू निदान पंधरा मिनिट
तरी बोलू शकत नाहीस. म्हणून मी तुला पान देतो समजलीस”
दैनिक पंचांग गुरुवार, दि. ११ जुलै २०२४
शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
पूर्वा १३|०४ सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. देवाणय्घेवाण टाळा. प्रवासाचे योग संभवतात.
सहकार्यांबरोबर संबंध सुधारतील. सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील.
वृषभ : मनोरंजनासाठी वायफळ खर्च कराल. व्यस्त रहाल. आरोग्य उत्तम राहील.मागील उधारी-उसनवारी वसुल होईल.
बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते
मिथुन : मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. कुटुंबाकडून सहयोग मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला
मिळू शकतो.
कर्क : व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. मानसिक सुखशांती मिळेल. पत्नी व मुलांचा सहवास मिळेल. आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आर्थिक बाबतीत उन्नती होईल.
सिंह : दिवस मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न कराल. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. मुलांसाठी आणि
पत्नीसाठी वेळ द्यावा. शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.
कन्या : कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. काळ अनुकूल आहे. आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ
होईल.
तूळ : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व संपर्क आपल्यासाठी आनंदायी ठरेल. आरोग्याची व खाण्या-
पिण्याची काळजी घ्या. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
वृश्चिक : राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. आर्थिक नुकसानाची शयता आहे. अनेक दिवसांचे
कष्ट फळास येतील. मागील उधारी-उसनवारी वसुल होईल.
धनु : काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. जुनी मित्र-मैत्रिणी भेटतील. महत्वाची बातमी
मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल.
मकर : वैवाहिक जीवनात वातावरणमधुर राहील. कामाचा भार अधिक राहील. जुने मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील.
कुंभ : जोखमीची कामे टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. दिवस आनंदात व्यतीत होईल. जीवनावश्यक खरेदी होईल.
मीन : महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. व्यापारय्व्यवसायात देवाण-घेवाण टाळा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
कोरड्या खोकल्याची ढाळ

* ताज्या भाज्या थोडा वेळ मिठाच्या
पाण्यात ठेवल्या तर भाज्यातील जंतू-किडे
मरतात.
* डोसा बनवताना जर तव्यावर
चिकटत असेल तर अर्धा कांदा कापून गरम
तव्याला घासावा. त्यावर एक वाटी पीठ
टाकावे. एक गोल वांगे मधून कापून घ्यावे व
पीठ त्याने पटकन तव्यावर पसरावे.
* ड्रायफु्रटस् प्लॅस्टिक पिशवीत भरून
फ्रीजमध्ये ठेवा. ते जास्त काळपर्यंत खराब न
होता ताजे राहतील.
* कोरड्या खोकल्याची ढाळ येत
असल्यास मोहरी, खडीसाखर चावून खाणे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
शहाणा कोंबडा
शहाणा कोंबडा
एका माणसाने बरेच कोंबडे पाळले होते. त्यातील अनेकांना खाण्यासाठी कापल्याने त्यातील आता एकच कोंबडा वाचला होता. मालक आपल्यालाही कापल्याशिवाय राहणार नाही, हे ओळखून तो कोंबडा भीतीने इकडे-तिकडे लपून बसू लागला. एके संध्याकाळी उरलेल्या कोंबड्याला कापून खावे, असा विचार करून कोंबड्याचा मालक त्याला हाका मारू लागला. “अरे, ये लवकर. हे बघ तुला खाण्यासाठी मी किती मिठाई आणली आहे ते. येरे बबड्या लवकर.” असे गोड गोड बोलून तो कोंबड्याला बोलावू लागला, पण कोंबडा त्याच्या गोड बोलण्याला आणि आमिषाला फसला नाही. होता तेथेच लपून बसला. जवळच त्या माणसाने पाळलेला ससाणा एका पिंजर्यात बसून हे ऐकत होता. तो कोंबड्याला म्हणाला, “अरे किती कृतघ्न आणि कपटी आहेस. मालकाने बोलावले असता त्याच्याकडे जाणे हे तुझे कर्तव्य नाही का? मी नाही तुझ्यासारखा. मालकाच्या पहिल्या हाकेसरशी मी त्याच्याजवळ जाऊन उभा राहतो.” त्यावर कोंबडा म्हणाला, ” माझ्यासारखे तुला कापून मालक शिजवून खात नाही म्हणून तू अशा बाता मारतोस. माझ्यासारखे मालक तुला खात असता तर तू सुद्धा असाच लपून बसला असतास.” तात्पर्य ः परिस्थिती जशी असेल, त्याप्रमाणे बदलावे लागत
सेप्ट्रॉनचे औषध घेतल्यानंतर रिअॅशन येते का?
सेप्ट्रॉनचे औषध घेतल्यानंतर रिअॅशन येते का?
तुम्ही डॉटरांकडे गेल्यानंतर तपासणी झाल्यावर औषध लिहून देण्यापूर्वी “तुम्हाला सेप्ट्रॉनची रिअॅशन येते का?” असा प्रश्न डॉटरांनी नक्कीच विचारला असेल. सेप्ट्रॉन हे एक अत्यंत उपयुक्त असे औषध आहे. सल्फामेथोझॅझोल व ट्रायमिथोप्रीम या दोन्ही औषधांचे ५: या प्रमाणात मिश्रण म्हणजे सेप्ट्रॉन होय. अनेक जिवाणूंना मारण्यासाठी या प्रभावी औषधाचा वापर केला जातो. बरेचदा सुरुवातीस हेच औषध दिले जाते. कोणत्याही द्रव्याला शरीराकडून स्विकारले जाईलच असे नाही. काही वेळा शरीर असे द्रव्य नाकारते. यालाच आपण अॅलर्जी किंवा वावडे असे म्हणतो. पेनिसिलीनसारख्या इंजेशनद्वारे दिल्या जाणार्या औषधाला रिअॅशन येऊ शकते. ती फार गंभीर स्वरूपाची असते व क्वचित मृत्यूही येऊ शकतो. सेप्ट्रॉनलाही रिअॅशन येऊ शकते. कोणत्याही द्रव्याला शरीराच्या प्रतिकारशक्तीने नष्ट करण्यासाठी दिलेला प्रतिसाद म्हणजेच रिअॅशन होय. सेप्ट्रॉनला येणारी विशिष्ट प्रकारची रिअॅशन म्हणजे अंगावर सर्वत्र पुरळ येतो. हा पुरळ नंतर लाक्षणिक चिकित्सेनंतर बरा होतो. क्वचित प्रसंगी जास्त गंभीर रिअॅशन येऊ शकते. मृत्यूही येण्याची शयता नसली तरी शारीरिक त्रास बराच होतो. त्यामुळे एकदा सेप्ट्रॉन व सल्फरला रिअॅशन आल्यास ते लक्षात ठेवून डॉटरांना तसे सांगावे, म्हणजे पुढील धोके टळतील
पाककला
पनीर-बटाटा भाजी

साहित्य – बटाटे, पनीर, गरम मसाला, टोमॅटो, मलई, थोडेसे दही, जिरे, धने, सैंधव
मीठ व तूप.
कृति – बटाटे सोलून त्याच्या छोट्या फोडी करून घ्या. पनीरचे तुकडे करून घ्या. पनीर व बटाटे तळून काढा. त्यानंतर
कुकरमध्ये जिरे, धने, गरम मसाला टाकून त्यात टोमॅटो टाका व पाणी ओतून उकळू द्या. उकळत्या पाण्यात पनीर व बटाटे टाका. नंतर एक चमचा दही व दोन चमचे मलई व मीठ टाकून खाली उतरवा
आरोग्य
नैसर्गिक माऊथफ्रेशनर :वेलची

शरीरातील रक्तदाबाची पातळी स्थिर
राखते. वेलची दातांच्या समस्येवर उपयुक्त
असते. अनेक माऊथ फ्रेशनर्स आणि
टुथपेस्टमध्येही वेलचीचा समावेश असतो.
जीवाणूंमुळे होणार्या संसर्गांशी सामना
करण्यासाठी वेलची एक उत्तम औषध म्हणून
काम करते. घशाच्या संसर्गांवर वेलचीचे पाणी
पिणे उपयुक्त ठरत





