हसा आणि शतायुषी व्हा!
एक प्राध्यापक आपल्या बायकोला रोज पान खायला देत.
लग्नानंतर एक-दीड वर्ष गेल्यावर बायको म्हणाली,
“अहो, लग्नानंतर पहिले दोन-चार महिने माझं कौतुक म्हणून तुम्ही
पान दिलंत हे ठीक पण यापुढे देऊ नका.
उगाच कशाला ते खर्चिक कौतुक?”
प्राध्यापक म्हणाले, “अगं एक पान खाल्ल्यानं तू निदान पंधरा मिनिट
तरी बोलू शकत नाहीस. म्हणून मी तुला पान देतो समजलीस”