चेहर्‍यावर ५ मिनिटे वाफारा घ्या

आठवड्यातून एकदा चेहर्‍यावर ५
मिनिटे वाफारा घेऊन लगेच त्यावर बर्फाचा
खडा फिरवावा.

आरसे-काचा साफ करायला वापरा हे!

* लिंबाच्या साली क्रॉकरीवर पडलेले
डाग हटवण्यासाठी वापरा. डाग सहजतेने
जाईल.
* उकळलेली चहा पावडर थोडेसे
पाणी टाकून उकळा व आरसे-काचा साफ
करायला वापरा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

हसा आणि शतायुषी व्हा!
एक कंजूष माणूस आपल्या तरुण मुलाला चौपाटीवर फिरायला
घेवून गेला होता. त्याने आपल्या तरुण मुलाला विचारले,
“तुला आणखी एकदा भेळ हवी का?”
मुलगा त्याच्याकडे आश्चर्याने पहात म्हणाला, “आणखी
एकदा म्हणजे? अगोदर आपण भेळ केव्हा खाल्ली बाबा?”
“विसरलास वाटतं? तू आठ वर्षाचा होतास तेव्हा आपण
दोघे इथं फिरायला आलो होतो. त्यावेळी नाही का मी तुला भेळ
घेऊन दिली होती?”

दैनिक पंचांग शनिवार, दि. १३ जुलै २०२४

हस्त १९|१५, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

मेष : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे.

वृषभ : आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम कराल. लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

मिथुन : व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे.

कर्क : आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्‍यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील.

सिंह : व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. राजकीय कार्ये पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

कन्या : दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. नोकरदार व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील.

तूळ : महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क फायद्याचे राहतील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील.
संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. नवीन करार होतील.

वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल.

धनु : कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. श्रम अधिक झाल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. मनोरंजनावर खर्च होईल.

मकर : एखादे काम न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. दिवस आनंदात व्यतीत होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे.

मीन : कुटुंबात वेळ चांगला जाईल. वरिष्ठ लोकांचे कामात सहकार्य मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

एव्हील कशासाठी वापरतात?

एव्हील कशासाठी वापरतात?

एव्हील ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी गोळी आहे. सर्दी-पडशाने त्रस्त माणसाला औषध दुकानदार एव्हीलची गोळी सामान्यतः देताना आढळतात. एव्हीलमध्ये फेमिरॅमिन मॅलिएट नावाचे औषध २५ मि.गॅ्र इतके असते. या औषधाचा शरीरातील स्वयंचलित मज्जासंस्थेवर परिणाम होतो व त्यामुळे विविध ग्रंथीतून निर्माण होणार्‍या स्त्रावांच्या प्रमाणात घट होते. याचाच परिणाम म्हणून गळणारे नाक थांबते. पण त्याचबरोबर त्वचा कोरडी होते. तोंड कोरडे पडणे अशा गोष्टीही होतात. दिवसातून तीन गोळ्यांच्यापेक्षा जास्त गोळ्या कधीही घेऊ नयेत. तसेच लहान मुलांना किती प्रमाणात औषध द्यायचे ते डॉटरच ठरवू शकतात. त्यामुळे आपण निर्णय न घेतलेलाच बरा. विषाणूंमुळे वा अ‍ॅलर्जीमुळे होणार्‍या सर्दीसाठी एव्हील हे परिणामकारक औषध आहे; पण या औषधाचे दुष्परिणामही आहेत.

एव्हील गोळी घेतल्याने व्यक्तीला झोप येते. त्यामुळे एव्हील घेऊन वाहन चालवणे धोयाचे ठरू शकते. दुसरे म्हणजे एव्हीलचा परिणाम असतो. परिणाम संपल्यानंतर परत जास्त सर्दी होते. सर्दीसाठी खरे पाहता औषध घ्यायची गरज नसते. सर्दी हा आपोआप बरा होणारा रोग होय. नाक गळणे थांबण्यासाठी पाण्यात मीठ टाकून त्या द्रावणाचे दोन-चार थेंब नाकपुड्यांत टाकावेत. तसेच पाणी उकळवून त्याची वाफ घ्यावी. या उपायांमुळे बराच फायदा होतो व मुख्य म्हणजे औषधांचे दुष्परिणामही टाळता येतात.

सुविचार

प्रत्येक मनुष्याला स्तुती इतकी प्रिय असते की, त्याच्या सर्व कार्याची मूळ प्रेरणा तीच बनते. : जॉन्सन

आरोग्यदायी पालक

आरोग्यदायी पालक
पालकमध्ये रक्तशोधक गुणधर्म
असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ,
पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे. आतड्यांची
ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील
बनविण्यासाठी पालकचा एक ग्लासभर रस
अनशेपोटी नियमितपणे सेवन करावा. याच्या
सेवनाने आतड्यांतील मलाचे निस्सारण
होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन
पोट स्वच्छ राहते.

हरबर्‍याच्या डाळीचे गुलाबजाम

हरबर्‍याच्या डाळीचे गुलाबजाम

साहित्य : १ मोठी वाटी हरबर्‍याची
डाळ, अर्धी वाटी खवा, अर्धी वाटी मैदा,
चिमूटभर खायचा सोडा, २ चमचे साजूक तूप,
५-६ वेलदोड्यांची पूड, पाकासाठी ३ वाट्या
साखर, ३ वाट्या पाणी.
कृति : साखर व पाणी एकत्र करून
एकतारी पाक करावा. पाकात वेलदोड्यांची
पूड घालावी. हरबर्‍याची डाळ शिजवून घ्यावी.
नंतर चाळणीवर ओतून पाणी निथळावे.
शिजलेली डाळ पुरणयंत्रावर वाटून घ्यावी.
खवा कुस्करून घ्यावा. मैद्याला तूप चोळून
घ्यावे.
नंतर हरबर्‍याची शिजवून वाटलेली
डाळ, मैदा, खवा व खायचा सोडा एकत्र
करून गोळा तयार करावा. नंतर ह्या मिश्रणाचे
गुलाबजामसारखे लांबट गोळे करून तळून
घ्यावेत. गडद रंगावर येईपर्यंत तळावे व
तळल्यावर लगेचच पाकात टाकावेत.

त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी

त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी
* आपली त्वचा ऑयली असेल, तर
चमचाभर गुलाब पाण्यात चमचाभर लिंबाचा
रस मिसळून कापसाने चेहरा स्वच्छ करा.
आठवड्यातून दोन वा तीन वेळा या लिंजरचा
वापर केल्यास तेलकटपणा कमी होईल व
चेहराही काळा पडणार नाही.
* उन्हात फिरल्याने त्वचा काळपट
पडते तेव्हा ताज्या काकडीचा रस लावा.
वाळल्यानंतर चेहरा धुऊन काढावा.
* चंदन+आंबेहळद+संत्रासाल आणि
मुलतानी माती यांचा लेप आठवड्यातून दोन
वेळा लावून तो अर्ध्या तासाने धुऊन टाकावा.
तारुण्य टिकविण्यासाठी याची मदत होते.

घरात प्रवेश करण्यापूर्वी

जर घरात प्रवेश करण्यापूर्वी भिंत आड
येत असल्यास गणेशाचा फोटो लावावा. एक
स्वस्तिक चिन्ह लावावे.