सेप्ट्रॉनचे औषध घेतल्यानंतर रिअ‍ॅशन येते का?

0
74

सेप्ट्रॉनचे औषध घेतल्यानंतर रिअ‍ॅशन येते का?

तुम्ही डॉटरांकडे गेल्यानंतर तपासणी झाल्यावर औषध लिहून देण्यापूर्वी “तुम्हाला सेप्ट्रॉनची रिअ‍ॅशन येते का?” असा प्रश्न डॉटरांनी नक्कीच विचारला असेल. सेप्ट्रॉन हे एक अत्यंत उपयुक्त असे औषध आहे. सल्फामेथोझॅझोल व ट्रायमिथोप्रीम या दोन्ही औषधांचे ५: या प्रमाणात मिश्रण म्हणजे सेप्ट्रॉन होय. अनेक जिवाणूंना मारण्यासाठी या प्रभावी औषधाचा वापर केला जातो. बरेचदा सुरुवातीस हेच औषध दिले जाते. कोणत्याही द्रव्याला शरीराकडून स्विकारले जाईलच असे नाही. काही वेळा शरीर असे द्रव्य नाकारते. यालाच आपण अ‍ॅलर्जी किंवा वावडे असे म्हणतो. पेनिसिलीनसारख्या इंजेशनद्वारे दिल्या जाणार्‍या औषधाला रिअ‍ॅशन येऊ शकते. ती फार गंभीर स्वरूपाची असते व क्वचित मृत्यूही येऊ शकतो. सेप्ट्रॉनलाही रिअ‍ॅशन येऊ शकते. कोणत्याही द्रव्याला शरीराच्या प्रतिकारशक्तीने नष्ट करण्यासाठी दिलेला प्रतिसाद म्हणजेच रिअ‍ॅशन होय. सेप्ट्रॉनला येणारी विशिष्ट प्रकारची रिअ‍ॅशन म्हणजे अंगावर सर्वत्र पुरळ येतो. हा पुरळ नंतर लाक्षणिक चिकित्सेनंतर बरा होतो. क्वचित प्रसंगी जास्त गंभीर रिअ‍ॅशन येऊ शकते. मृत्यूही येण्याची शयता नसली तरी शारीरिक त्रास बराच होतो. त्यामुळे एकदा सेप्ट्रॉन व सल्फरला रिअ‍ॅशन आल्यास ते लक्षात ठेवून डॉटरांना तसे सांगावे, म्हणजे पुढील धोके टळतील