शहाणा कोंबडा

0
106

शहाणा कोंबडा

एका माणसाने बरेच कोंबडे पाळले होते. त्यातील अनेकांना खाण्यासाठी कापल्याने त्यातील आता एकच कोंबडा वाचला होता. मालक आपल्यालाही कापल्याशिवाय राहणार नाही, हे ओळखून तो कोंबडा भीतीने इकडे-तिकडे लपून बसू लागला. एके संध्याकाळी उरलेल्या कोंबड्याला कापून खावे, असा विचार करून कोंबड्याचा मालक त्याला हाका मारू लागला. “अरे, ये लवकर. हे बघ तुला खाण्यासाठी मी किती मिठाई आणली आहे ते. येरे बबड्या लवकर.” असे गोड गोड बोलून तो कोंबड्याला बोलावू लागला, पण कोंबडा त्याच्या गोड बोलण्याला आणि आमिषाला फसला नाही. होता तेथेच लपून बसला. जवळच त्या माणसाने पाळलेला ससाणा एका पिंजर्‍यात बसून हे ऐकत होता. तो कोंबड्याला म्हणाला, “अरे किती कृतघ्न आणि कपटी आहेस. मालकाने बोलावले असता त्याच्याकडे जाणे हे तुझे कर्तव्य नाही का? मी नाही तुझ्यासारखा. मालकाच्या पहिल्या हाकेसरशी मी त्याच्याजवळ जाऊन उभा राहतो.” त्यावर कोंबडा म्हणाला, ” माझ्यासारखे तुला कापून मालक शिजवून खात नाही म्हणून तू अशा बाता मारतोस. माझ्यासारखे मालक तुला खात असता तर तू सुद्धा असाच लपून बसला असतास.” तात्पर्य ः परिस्थिती जशी असेल, त्याप्रमाणे बदलावे लागत