
एक कंजुष माणूस आपल्या मित्राला म्हणाला, ’काय करु रे !…
आज मला कंगवा विकत घेतलाच पाहिजे.”का रे ?’
’माझ्या जुन्या कंगव्याचा एक दात तुटला.’ मित्र
म्हणाला, अरे कंगव्याला कितीतरी दात असतात. त्यातला
एखादा तुटला म्हणून सबंध कंगवाच टाकून देऊन नवा घेण्याचं
कारण नाही.’ ’नाही रे !…’ कंजुष माणूस म्हणाला, ’काल जो
दात तुटला तो त्या कंगव्यातला शेवटचा दात होता.’
हसा आणि शतायुषी व्हा!
मुंगुसाची बतावणी
मुंगुसाची बतावणी
आपल्या घरात मुंगूस घुसले आहे, असे पाहताच घराच्या मालकाने शिताफीने मुंगुसाला पकडले. तो त्याचा जीव घेणार, तोच त्याची विनवणी करीत मुंगूस म्हणाले, ” बाबा रे, मला विनाकारण ठार मारु नकोस. खरे तर मी तुझ्यावर उपकारच करतो. तुझ्या घरातले उंदीर तुझे धान्य खातात. त्या उंदरांना मी मारुन खातो. असे असता उपकार विसरून तू मलाच ठार मारू पाहतोस?
वा रे तुझा न्याय?”
त्यावर घराचा मालक म्हणाला, “अरे लबाडा, माझ्यावर कसले उपकार करतोस रे. स्वतचे पोट भरण्यासाठी तू उंदीर मारून खातोस, त्यासाठी माझ्या घराची जमीन इथे? तिथे खोदून ठेवतोस. याचा मला किती त्रास होतो आहे,
याचा तू कधी विचार केला आहेस काय? आणि वर मलाच न्याय शिकवतोस. थांब आता, तुला ठार केल्याशिवाय मी तसा सोडणार नाही. ” असे म्हणत घरमालकाने मुंगुसाला जमिनीवर आपटून ठार केले.
तात्पर्य : स्वतःच्या फायद्यासाठी केलेले कृत्य हा दुसर्यावर उपकारच आहे, असे समजणे हे लबाडीचे वर्तन होय.
कॅटस्कॅन म्हणजे काय?
कॅटस्कॅन म्हणजे काय?
“एस-रे झाला, सर्व तपासण्या झाल्या… मग शेवटी डॉटरांनी स्कॅन करायला सांगितला… तेव्हा मग रोगाचे निदान झाले.” अशा प्रकारची वाये केव्हातरी आपल्याला ऐकायला मिळतात. यावरून स्कॅन म्हणजे रोगनिदानाची एक पद्धत आहे आणि इतर पद्धतीपेक्षा ती सरस आहे, असा समज अनेकांच्या डोयात नक्कीच पक्का झाला असेल. कॅट स्कॅन म्हणजेच कॉम्प्युटराइझ्ड टोमोग्राफीक स्कॅन, क्ष-किरणांचा वापर करून या पद्धतीत शरीराच्या वेगवेगळ्या भागांची संगणकाच्या सहाय्याने आलेखने घेतली जातात. क्ष-किरण छायाचित्र व स्कॅन यात खूप फरक असतो. स्कॅनमध्ये शरीराच्या कोणत्याही भागाचे पृष्ठभागापासून कितीही अंतरावरचे (जसे त्वचेपासून दोन इंच आत वगैरे…) छायाचित्र घेता येते. अवयवांच्या उभ्या किंवा आडव्या छेदांची छायाचित्रे मिळू शकतात. मुख्य म्हणजे या पद्धतीत शरीराच्या आत काही रासायनिक पदार्थ वा नळी इ. टाकावे लागत नसल्याने कोणताच धोका होत नाही. अर्थात क्ष-किरणांच्या वापरामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. मेंदूमधील कर्करोगाच्या गाठी, रक्तवाहिन्यांवरील गाठी, रक्तस्त्रावामुळे तयार झालेल्या गाठी आदींचे निदान स्कॅनमुळे सहजगत्या होऊ शकते. ५ मि.मी. पेक्षा मोठ्या गाठीच या पद्धतीने दिसू शकतात. शरीराच्या इतर भागातील कर्करोग किंवा अंतर्गत शारीरिक वैगुण्यांचे निदान स्कॅनमुळे होऊ शकते. कॅट स्कॅन हे रोगनिदानासाठी डॉटरांच्या हाती सापडलेले प्रभावी साधन होय. पण ही तपासणी खर्चिक आहे. एका स्कॅनसाठी १५०० ते २००० रु. खर्च येतो. साहजिकच या रोगनिदान पद्धतीचा सुयोग्य व नेमकाच वापर होण्याची गरज आहे. उठसूट स्कॅन करण्याने फारसे काही साध्य होणार नाही. विशेषतः साध्या क्ष-किरणाने निदान होणार्या गोष्टींसाठी स्कॅन काढणे म्हणजे उंदीर मारायला तोफ आणण्यासारखेच आहे!
शयनगृहाच्या नैऋत्येचा कोपरा

* शयनगृहाच्या नैऋत्येचा कोपरा
रिकामा ठेवू नये. तेथे शोभेच्या वस्तू आकर्षक
असे दिवे, सिरॅमिक पॉट ठेवावेत.
* हॉलच्या पूर्वेकडील भिंतीवर उत्तुंग
पर्वत शिखराचे व उत्तरेकडील भिंतीवर
डोंगरदर्यातून झुळूझुळू वाहणार्या निर्झराचे
किंवा उंचावरून खाली झोपावणार्या
धबधब्याचे पोस्टर लावा. या योगे तुमच्या
प्रसिद्धीत व नावलौकिकात वाढ होते, असा
माझा अनुभव आहे.
साखरेतील मुंग्या अशा काढा
* साखरेत जर जास्त मुंग्या झाल्या असतील व सहजतेने बाहेर निघत नसतील तर साखरेच्या डब्यात कापराचा एक
तुकडा ठेवल्यास मुंग्या स्वत: होऊन बाहेर पडतील.
* फणस कापण्यापूर्वी तो प्लॅस्टिक पिशवीत ठेवून पाच-सहा तास फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर फणस कापल्यास फणसाचा दुधट चिकटपणा नाहीसा होतो.
* आपल्या किचनचा ओटा तेलकट व चिकट झाला असेल त्यावर फडयाने रॉकेल चोळा व तासाभरानंतर एखाद्या
डिटर्जण्ट पावडरने गरम पाण्याने धुवा. ओटा नव्यासारखा चमकू लागेल.
* पुलाव बनवताना तांदळात थोडा
लिंबाचा रस मिसळावा. पुलाव फडफडीत होईल.
चिरोटे
साहित्य – अर्धा किलो मैदा, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी डालडा, पाणी, अर्धा लिटर दूध, तळण्यासाठी तेल, पाव वाटी तांदळाची पिठी, बेकिंग पावडर, पिठी साखर अर्धी वाटी.
कृति – प्रथम मैदा चाळून घ्यावा. त्यात डालडा गरम करून पाव वाटी टाकावा. पाव चमचा बेकिंग पावडर, मीठ घालून दूध घालावे व चपातीच्या कणकेप्रमाणे भिजवावे. नंतर एका ताटात उरलेला डालडा व तांदळाची पिठी फेसून ठेवावी नंतर मैद्याच्या छोट्या छोट्या गोळा करणे व लाटणे व प्रत्येक चपातीला तांदळाची फेसलेली पिठी लावून एकावर एक
ठेवणे व वळकटी करणे व गोलगोल काप करावेत व ते गोल काप अलगदपणे लाटावेत. नंतर तेलात चिरोटे तळून घ्यावेत. गरम असतानाच त्यावर पिठीसाखर पेरावी



