पाककला

बनारसी गोटे


साहित्य : चण्याची डाळ चार वाट्या, दही एक वाटी, सोडा, मीठ, आले, ओल्या
मिरच्या, कोथिंबीर, हिंग, धने, साखर, तेल.

कृती : चण्याची डाळ साधारण जाडसर दळून घ्यावी. त्यात दही घालावे व पाच
सहा चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. तसेच चवीप्रमाणे मीठ व ओल्या मिरच्या
वाटून, धने व हिंग यांची पूड करून, आले वाटून, कोथिंबीर चिरून व चवीप्रमाणे साखर
घालून, पीठ दोन तास भिजवून ठेवावे. पीठ भज्याच्या पिठाप्रमाणेच भिजवावे. तळण्याच्या
वेळी अर्धा चमचा सोडा घेऊन, भजी गोल करून तळावी

आरोग्य

थकवा दूर करण्यासाठी 

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आपण अनेकदा आपल्या आरोग्याची काळजी
घेणे विसरतो. दही या गोष्टींचे सेवन करून तुम्ही तुमचा थकवा कमी करू शकता. दह्यात
प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात, क्रीमलेस दही खाल्ल्याने तुमचा थकवा आणि सुस्ती दूर
होईल. हे तुमचे शरीर थंड ठेवण्यास देखील मदत करते ज्यामुळे थकवा कमी होतो

दैनिक पंचांग रविवार, दि. ५ जानेवारी २०२५

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
पू.भा.२०|१८, सूर्योदय ०६ वा. ३२ मि. सूर्यास्त ०५ वा. ५० मि.

मेष : काही विशेष करण्याचा प्रयत्न कराल. मनोरंजनासाठी काही
प्लॅन कराल. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळाल.

वृषभ : पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल.
मागील बाकी व उधारी वसुल होईल.

मिथुन : कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. आरोग्याची काळजी घ्याल.
जुन्या मित्रांची भेट होईल.

कर्क : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. स्पर्धा, पैजा
जिंकू शकाल. लाभ होईल.

सिंह : आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. उधारी
उसनवारी मिळेल. व्यापार उत्तम चालेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.

कन्या  : आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. मागील उधारी उसनवारी
मिळेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.

तूळ : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल.
महत्वपूर्ण कार्यांवर व्यय होईल.

वृश्चिक : चांगले प्रदर्शन करण्यास अडचणी येतील. निवेश प्रत्याशित. मांगलिक,
धार्मिक कामात अडथळा.

धनु : कौटुंबिक जीवन उत्तम असेल आणि घरातील मंडळी फारच आनंदात राहणार
आहे. मागील येणी वसुल होईल.

मकर  : भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. आर्थिक विषयांमध्ये
स्थिती सहयोगात्मक राहील.

कुंभ : सहकार्‍यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळाल. आपणास नवीन संधी
मिळण्याची शयता आहे. मागील उधारी वसुल होईल.

मीन : ग्रहदशेत एक महत्त्वपूर्ण बदल झाल्याने स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल.
प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळाल.

संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा

ब्रेड ऑफ लाईफ फाऊंडेशनद्वारे भिंगारला बाळगोपाळांसमवेत ख्रिस्त जयंती साजरी

नगर – भिंगार येथील इंदिरानगर सेवावस्ती मध्ये ब्रेड ऑफ लाईफ (बोल) फाऊंडेशनद्वारे बाळ गोपाळांसमवेत ख्रिस्त जयंती सोहळा ३० डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. नाताळनिमित्ताने सेवावस्तीमधील १५० हुन अधिक बाळगोपाळांना खाऊच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. सांतालॉज समवेत उपस्थित सर्व बालकांनी मोठया आनंद व उत्साहाने नाचगाण्यात भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली. यावेळी सांतालॉजची टोपी परिधान केलेले बाळ गोपाळ दिसून येत होते. या प्रसंगी प्रौढ स्त्रीया, वृध्द, तरुण तरुणी व बालकांकरीता उबदार कपडे, खेळणी यांचे ८० कुटुंबानी लाभ घेतला. इंदिरा सेवावस्तीतील नंदाताई राय यांनी बोल फाऊंडेशन प्रती आभार व्यक्त केले. फाऊंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. सेवावस्तीतील भारत ठोकळ, विनोद उमाप, सुनील वैराळ, सागर कांबळे, धनंजय घोरपडे, दिनेश जाधव व सौ. व श्री. दत्ता क्षिरसागर यांचे सहकार्य लाभले. बोल फाऊंडेशनच्या परिवारातील अध्यक्ष जोसेफ पाटोळे, सचिव शोभा पाटोळे, विश्वस्त श्रुती पाटोळे, अमित पाटोळे, स्वयंसेवक अंतोन पाटोळे, सुशीला पाटोळे, आरती नितीन पाटोळे व रुबेन रवि मुदलियार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी सांतालॉज बनलेले कुमार गॅब्रिएल पाटोळे, आरुष पाटोळे व काव्या पाटोळे यांचे आकर्षण वाखण्यासारखे ठरले.

 

सुसज्ज नेत्रपटल व जबड्याच्या क्रेस्टआय व ओरोफेशिअल क्लिनिकचे ५जानेवारीला लोकार्पण – डॉ.क्षितीज तांबोळी

नगर – येथील घुमरे गल्लीतील तांबोळी हॉस्पिटल येथे ५ जानेवारी रोजी क्रेस्ट आय व ओरोफेशिअल लिनिक याचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन बेंगलोरचे डॉ. हेमंत मूर्ती, संभाजीनगरचे डॉ. मनोज सासवडे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती डॉ. सूचित तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ.तांबोळी यांनी पुढे म्हटले की या उद्घाटनाच्या निमित्ताने डॉटरांसाठी रेटीनावर कार्यशाळा स्टेशन रोड वरील हॉटेल राजयोग येथे ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. यासाठी डॉ. हेमंत मूर्ती, डॉ. मनोज सासवडे संभाजीनगर, डॉ. मनीष बापये नाशिक, डॉ. राजीव गांधी अकलूज असे वक्ते मार्गदर्शन करणार आहे. डायबीटीस, ब्लडप्रेशरमुळे डोळ्यांवर होणारे परिणाम तसेच कमी दिवसांचे मुलांच्या डोळ्यावर होणारे परिणाम, यावर चर्चासत्र आयोजित केले असून जास्तीत जास्त डॉटरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेटिना तज्ञ डॉ. क्षितीज तांबोळी यांनी केले आहे. डॉटर तांबोळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा एक भाग म्हणून क्रेस्ट आय व ओरोफेशिअल लिनिक येथे सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. या केंद्रात मधुमेह व रक्तदाब असणार्‍या पेशंट साठी नेत्र तपासणी, कमी दिवसांच्या बाळाची नेत्र पटल तपासणी, इंजेशन थेरपी द्वारे नेत्र पटल आजारांवर उपचार, मार लागलेल्या डोळ्याचे व्यवस्थापन, गुंतागुंतीची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया, उतार वयातील नेत्रपटलाचे विकार व व्यवस्थापन, अत्याधुनिक लेझर उपचार पद्धती, रेटिना सर्जरी इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तोंडाच्या कॅन्सर संबंधी सल्ला व उपचार, मार लागलेल्या जबड्याचे व चेहर्‍याचे व्यवस्थापन, रुतलेला दात सर्जरी द्वारे काढणे जबडा व चेहरा यांच्या आजाराचे उपचार, तसेच डेंटल इम्प्लांट याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता नगरच्या पेशंटना पुणे मुंबईला जाण्याची गरजच नाही कारण नगरमध्येच अत्यंत आधुनिक सोयी सवलतीच्या दरात आणि तज्ञ डॉ. क्षितीज आणि डॉ. अर्चना यांच्यामार्फत उपलब्ध करून होणार आहे. अ.नगरचे पहिले नेत्रपटल व जबड्याच्या विकारांसाठी लिनिक सुसज्ज करताना डोळे व जबड्याच्या उपचारासाठी कृतीशील ! आपले अहिल्यानगर बनवूया प्रगतशील’ !! हेच आमचे ब्रीदवाय असल्याचे तांबोळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉटर सुचित व सौ. नेहा तांबोळी यांनी सांगितले.

 

हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने आ. शिवाजीराव कर्डिले सन्मानित

नगर – भिंगार येथील श्री शुलेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्र मंडळाच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आ. शिवाजीराव कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महेश झोडगे, ह.भ.प.अमित धाडगे आदींसह नागरिक उपस्थित होते. आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमधील माझा विजय हा हिंदू धर्मामुळेच झाला असून दोन वर्षांपूर्वी राहुरी तालुयात हिंदू बांधवांवर काही जातीवादी समाजकंटकांनी अन्याय केला त्यावेळी मी मताचे राजकारण न करता धावून गेलो आणि हिंदू धर्म वाचवण्यासाठी काम केले. राजकारणापेक्षा हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि तो वाढवण्यासाठी सर्वांनी काम करावे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत असतात त्या माध्यमातून धार्मिकता जोपासली जाते. राज्यातील महायुतीचे सरकार हे महाराजांच्या धार्मिकतेच्या प्रचार व प्रसारामुळे आले आहे. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले असल्यामुळेच नागरिक उपस्थित राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हिंदू धर्म वाढीसाठी काम करीत आहे. आता माझ्यावर मोठी जबाबदारी पडली असून ती मी नक्कीच पार पाडेल, असे ते म्हणाले.

 

लिलाबाई झोडगे यांना सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार

नगर – फिनिस सोशल फाऊंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भिंगार येथील श्रीमती लिलाबाई भाऊसाहेब झोडगे यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. शुलेश्वर मंदिराच्या प्रांगणात झालेल्या शिव पुराण कथेच्या कार्यक्रमात लिलाबाई झोडगे यांना पद्मश्री पोपटराव पवार व ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदेश संघचालक नानासाहेब जाधव, उद्योजक महेश झोडगे, अण्णा चौधरी, फिनिस फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते. लिलाबाई झोडगे या सर्वसामान्य कुटुंबातून येवून पतीच्या निधनानंतर बिकट परिस्थितीत भाजी विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या मुलाला चांगले शिक्षण व संस्कार देऊन उद्योजक म्हणून घडविले. त्या सामाजिक व धार्मिक कार्यात सातत्याने योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य उद्योजक महेश झोडगे करत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने त्यांनी मुलांना सुशिक्षित करुन घडविले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले. महिला समाज घडविण्याचे कार्य करतात. महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंच्या विचाराने मुलांवर संस्कार रुजविण्याची गरज आहे. लिलाबाई झोडगे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले.

 

विद्यार्थ्यांना पोलीस दलाची माहिती व जनजागृती व्हावी -उमेश परदेशी

 मेहेर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलिसांची कार्य पध्दती व बंदुकीची माहिती

oplus_0

नगर – आज संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिवस उत्साहाने साजरा होत आहे. २ ते ८ जानेवारी या आठवड्यात पोलीस स्थापना दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती रॅली, शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिस दलाविषयीची माहिती, तसेच पोलिसांकडून विविध सामाजिक जबाबदार्‍या पार पाडल्या जातात. आज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस दलाची माहिती सांगून विविध वापरण्यात येणार्‍या हत्यारांची व बंदुकींची माहिती देण्यात आली. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पोलीस दला विषयी माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पोलीस होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे मेहेरे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलीस दलाची माहिती. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पो.नि. उमेश परदेशी, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा. अनुरीता झगडे आदींसह विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.अनुरीता झगडे म्हणाले, विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयीची माहिती मिळाली. तसेच आपणही पोलीस बनावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. या उपक्रमासाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी व हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

 

स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते

अनिता काळे यांचे प्रतिपादन; प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने गौरवपूर्ण सन्मान

नगर – सर्व महिलांनी एकत्र केलेला गौरवपूर्ण सत्कार हा एका मोठ्या पुरस्काराप्रमाणे आहे. स्त्री शक्ती समाजात बदल घडवू शकते. महिला सक्षमीकरणासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी महिलांना संघटित करुन हे कार्य चालवले जात आहे. ग्रुपच्या माध्यमातून देखील सातत्याने महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रुपच्या वतीने करण्यात आलेला सत्कार हा भविष्यात आनखी कार्य करण्याची ऊर्जा देणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना अनिता काळे यांनी सांगितले. प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. काळे यांची दुबई येथे होणार्‍या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौर्‍यासाठी निवड व रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सर्व महिलांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पांढरीपूल येथील आठवण हॉटेलच्या परिसरात हा सन्मान सोहळा रंगला होता. यावेळी प्रतिभा भिसे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सावेडी ग्रुपचे अध्यक्ष रजनी भंडारी, उपाध्यक्ष उषा सोनी, खजिनदार मेघना मुनोत, आशा गुंदेचा, सचिव रेखा फिरोदिया, जयश्री पुरोहित, शोभा भालसिंग, हेमा पडोळे, आरती थोरात, रेखा मैड, ज्योती गांधी, नीलिमा पवार, उषा सोनटक्के, अलका वाघ, अर्चना बोरूडे, संगिता घोडके, सुजाता कदम, सुनीता काळे, सुरेखा जंगम, लीला अग्रवाल, शकुंतला जाधव, शशिकला झरेकर, आशा गायकवाड आदी उपस्थित होत्या. प्रतिभा भिसे म्हणाल्या की, महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्तकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अनिता काळे या सातसमुद्रापकीकडे जावून आपल्या मातीतला इतिहासाचा प्रचार-प्रसार करीत आहे. सातत्याने त्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर व्याख्यानातून महिलांमध्ये जिजाऊंचे संस्कार रुजवित आहेत. जिल्हा परिषद शाळेत आदर्श शिक्षिका म्हणून कार्य करताना मुलांना दर्जेदार शिक्षणासह संस्कार रुजविण्याचे कार्य त्या करत आहे. त्यांची झालेली निवड ही सर्व महिलांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, ग्रुपच्या उपाध्यक्षा असलेल्या अनिका काळे या अष्टपैलू व्यक्तीमत्व असून, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी त्या सातत्याने योगदान देत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्या व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे कार्य करत आहे. अहिल्यादेवींच्या नावाने त्यांना मिळालेला पुरस्काराने ग्रुपच्या सर्व महिलांना आनंद झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. आशा गुंदेचा या ज्येष्ठ महिलेच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हेमा पडोळे यांनी केले. आभार आरती थोरात यांनी मानले.

 

स्मार्ट विद्युत मीटर बसवून सामान्य नागरिक, व्यापारी, लघुउद्योजकांची पिळवणूक करू नका

शहरात मीटर बसवण्यास तीव्र विरोध, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना लेखी निवेदन

नगर – महावितरणद्वारे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर शहरात स्मार्ट विद्युत मीटर सक्तीचे केले गेले आहे. जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व महावितरण यांच्या माध्यमातून देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत. अहिल्यानगर शहरात विद्युत स्मार्ट मीटर बसविण्यास पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे लेखी निवेदन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले. सदर मीटर बसवून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, लघुउद्योजकांची पिळवणूक करू नका, असा इशारा यावेळी दिला आहे. शहरात मीटर बसवण्यास तीव्र विरोध, महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना लेखी निवेदन यावेळी दशरथ शिंदे, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, महिला शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, उपाध्यक्ष जाहिदा शेख, दिव्यांग शहर विभाग जिल्हाध्यक्ष मिनाज सय्यद, क्रीडा व युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, शहर सामाजिक न्याय युवा आघाडीचे अध्यक्ष गौरव घोरपडे आदीं उपस्थित होत. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देताना किरण काळे व इतर. काळे म्हणाले की, भारत सरकारकडून ऑगस्ट २०२१ मध्ये याबाबतचा कायदा भांडवलदारी कंपन्यांना फायदा व्हावा, या हेतूने पारित केल्याचे निदर्शनास येत असून जनतेवर वाढीव बोजा टाकण्याचे षडयंत्र तेव्हापासून नियोजित होते असे दिसते. २० किलोवॅट किंवा २७ हॉर्सपॉवर पेक्षा कमी विद्युत दाब असणारे विद्युत उपभोक्ता म्हणजेच सर्वसामान्य कुटुंब, गोरगरीब नागरिक, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, लघुउद्योजक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायकारक असे धोरण ठरवून घेतलेला हा निर्णय आहे. मार्च २०२५ पर्यंत विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून यातून फक्त जनतेचे नुकसान होईल, असे स्पष्टपणे दिसते आहे. सरकारची भूमिका ही जनहित विरोधी व भांडवलदार स्नेही आहे. सदर मीटर हे आम्ही सामान्य ग्राहकांसाठी बसविणार नाही. मात्र प्रत्यक्षात तसे न करता आता सदर मीटर हे सामान्य ग्राहकांसाठी देखील बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. सरकारने दिलेला शब्द न पाळता नागरिकांची फसवणूक सुरू केली असल्याचा आरोप काळे यांनी यावेळी केला. किमतीत जवळपास दुप्पट वाढ करून १२००० रुपये हे कंत्राट सदर कंपन्यांना देण्यात आले आहे. हा सरळ सरळ घोटाळा असून यामागे प्रस्थापित राज्यकर्त्यांचे मोठे आर्थिक हितसंबंध दडल्याचा आरोप यावेळी काळेंनी केला. बेरोजगारीचे संकट डीआयएससीओएम महावितरणच्या वितरण विभागाचे हे खाजगीकरणाकडे जाणारे धोरण असून विद्युत स्मार्ट मीटर सोबत अकाउंट आणि बिलिंग विभागाच्या अनेक कर्मचार्‍यांची कपात करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बेरोजगारी होत निर्माण होणार. विद्युत स्मार्ट मीटरच्या नावावर विद्युत चोरी थांबणार असा खोटा बनाव राज्य सरकार करीत आहे. वास्तविक पाहता २० केव्ही पेक्षा जास्त विद्युत दबाव वापर करणार्‍या ग्राहकांकडून विज चोरी झाल्याचे बहुदा निदर्शनास आले असल्याचे काळे म्हणाले. स्मार्ट मिटरचे तोटे १. ग्राहकाला सध्या वीज बिल भरण्यासाठी मुभा मिळते. परंतु स्मार्ट मिटर मुळे ग्राहकाला पहिले रु. २००० किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जे पहिले करावे लागेल. नंतर लाईट वापरावी लागेल. काळे म्हणाले, राज्यामध्ये विविध विभाग करण्यात आले असून या विभागांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची कंत्राटे अदानी ग्रुप, एनसीसी कंपनी, मेसर्स जीनस कंपनी अशा भांडवलदारी कंपन्यांना सुमारे रू. २६,९३९ कोटींचे टेंडर राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल्याची माहिती आहे. सदर कंपन्या या स्मार्ट विद्युत मीटरची निर्मिती करणार्‍या कंपन्या नसून देखील त्यांना सदर कंत्राटे देण्यात आली आहेत. ती कोणत्या आधारावर देण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये मोठ्या आर्थिक हितसंबंध, देवाघेवाण व घोटाळा झाला असल्याचा आमचा आरोप आहे. काळे पुढे म्हणाले, संपूर्ण भारतात २२ कोटी २३ लाख विद्युत मीटर बदलायचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक शोषण होणार आहे. त्यास विरोध आहे. यापैकी महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील सुमारे २ कोटी २५ लाख ६५ हजार विद्युत मीटर बदलण्याचा डाव आहे. यासाठी राज्य सरकारने ३९ हजार ६०२ कोटी एवढा खर्च करण्याचे ठरविले आहे. आज पर्यंत महाराष्ट्र राज्यात किमान सुमारे १ लाख ७५ हजार स्मार्ट मीटर कार्यरत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर कोणत्या भौगोलिक क्षेत्रात कोणत्या कंपनीकडून विकायचे याचे टेंडर मंजूर केले असून यापूर्वी निवडणूकी आधी त्यांनी सभागृहात असे सांगितले होते की पैसे कुठून आणणार? एकूण २,२४,६१,३४६ मीटर करिता तब्बल २६,९३९ कोटी रुपये या कंत्राटी कंपन्यांना दिले जाणार आहेत. यात ६०% रक्कम भारत सरकारच्या वतीने तर ४०% रक्कम ही महावितरण महाराष्ट्र यांच्याकडून दिली जाणार आहे. अगोदरच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेली महावितरण ही महाराष्ट्राची सरकारी कंपनी हे पैसे कुठून आणणार? कर्ज काढून आणणार काय की वीज उपभोक्त्यांवर आर्थिक बोजा टाकून वसूल करणार? शेवटी यासाठीचे पैसे हे सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जाणार हे स्पष्ट आहे. सदर विद्युत स्मार्ट मीटरची निर्मिती व जोडणी किंमत ६३०० रुपये प्रति मीटर अपेक्षित असताना या मीटरच्या २. स्मार्ट मिटरचा बॅलन्स संपल्यावर घरातील लाईट आपोआप बंद होईल. त्यामुळे रात्री अपरात्री रिचार्ज संपल्यास अंधारात बसण्याची वेळ येईल. ३. सर्वसामान्य गरीब जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडेल. पहिलेच महागाईने वैतागलेल्या जनतेला महावितरण मोठा झटका देत आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मोठ्या प्रमाणावर राजकीय सत्ताधारी पक्षांना रसद पुरवणारे अदाणी व इतर तीन कंपन्या जनतेची आर्थिक लूट करून त्यातील रक्कम तीन महिने बिनव्याजी स्वरूपात वापरणार आणि एकीकडे ग्राहकांना प्रीपेड स्वरूपात विद्युत बिलाचे पैसे भरण्यास बंधनकारक करून महाराष्ट्राच्या जनतेचे आर्थिक शोषण करू पाहणार्‍या या बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजनेचा आम्ही अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत त्याचा विरोध करीत आहोत. सद्यस्थितीत सदर मीटर बसण्याचे काम सुरू केले गेले असून सुरुवातीचे काम पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी सदर कामास तात्काळ स्थगिती देऊन ते बंद करण्यात यावे. अन्यथा आम्ही जनहितार्थ याबाबत आक्रमक आंदोलनात्मक भूमिका घेऊ, असा इशारा यावेळी किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने महावितरणला दिला आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.