बनारसी गोटे
साहित्य : चण्याची डाळ चार वाट्या, दही एक वाटी, सोडा, मीठ, आले, ओल्या
मिरच्या, कोथिंबीर, हिंग, धने, साखर, तेल.
कृती : चण्याची डाळ साधारण जाडसर दळून घ्यावी. त्यात दही घालावे व पाच
सहा चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. तसेच चवीप्रमाणे मीठ व ओल्या मिरच्या
वाटून, धने व हिंग यांची पूड करून, आले वाटून, कोथिंबीर चिरून व चवीप्रमाणे साखर
घालून, पीठ दोन तास भिजवून ठेवावे. पीठ भज्याच्या पिठाप्रमाणेच भिजवावे. तळण्याच्या
वेळी अर्धा चमचा सोडा घेऊन, भजी गोल करून तळावी