नगरमधील सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे दाक्षिणात्य
पद्धतीचे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी, गणपती
व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहेत. सध्या चालू असलेल्या मंडल
महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सवामध्ये मूर्तीची आकर्षक अशी
फुलांची सजावट करण्यात येते. मंदिराच्या मूर्तीच्या गाभार्यात लाईट
नाही त्यामुळे तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात मूर्ती प्रसन्न दिसतात.
मूर्तीची फुलांची सजावट
एचएमपीव्ही व्हायरसच्या धसयाने भारतीय शेअर बाजार कोसळला
सेन्सेस १२०० अंकांनी तर निफ्टीही ३६० अंकांनी घसरला
मुंबई – भारतातील पहिले एचएमपीव्ही प्रकरण समोर आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी (दि.६) सेन्सेस १२०० अंकांनी घसरला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३६० अंकांनी कोसळला. बँकिंग, फायनान्स आणि ऊर्जा समभागांमध्ये मोठी पडझड होताना मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही विक्रीचा सपाटा पाहायला मिळत आहे. इंडिया विस, बाजारातील अस्थिरता मोजणारा निर्देशांक १३.३७ टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे. एचएमपीव्ही चिनी विषाणूची भारतात एन्ट्री झाली असून याचा पहिला रुग्ण बंगळुरू येथे आढळला आहे. त्यामुळे शेअर बाजारात खळबळ उडाली. बीएसई सेन्सेस १,१०० हून अधिक अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये सुमारे १.४ टक्के घसरण दिसून येत आहे. सेन्सेसने याआधी सोमवारी सकाळी हिरवीगार ओपनिंग केली पण भारतात एचएमपीव्ही चे पहिले प्रकरण समोर येताच गुंतवणूकदार चक्रावले. पीएसयु बँकिंग, रिअल इस्टेट आणि तेल व वायू क्षेत्रात सर्वाधिक पडझड झाली असून बँक ऑफ बडोदा, पीएनबी आणि कॅनरा बँक प्रत्येकी सुमारे ४ टक्के आपटले तर एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोटक महिंद्रा बँक या सेन्सेसमध्ये सूचिबद्ध कंपन्यांना सर्वाधिक नुकसान झाले. त्याचवेळी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, गुंतवणूकदारांचे लक्ष तिसर्या तिमाहीचे निकाल, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ आणि भू-राजकीय समस्यांवर लागून असताना भारतात एचएमपीव्ही चे पहिले प्रकरण आढळल्याची बातमी आली तेव्हा त्यांना धक्काच बसला. कर्नाटकातील बंगळुरू येथे पहिला एचएमपीव्ही रुग्ण असल्याची बातमी सकाळी समोर येताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. हा विषाणू सर्वप्रथम चीनमध्ये आढळून आला असून एचएमपीव्ही प्रकरणाने बाजारातील गुंतवणूकदारांना पाच वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या करोनाची आठवण झाली त्यानंतर, गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण पसरले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिर तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेच्या मागण्यांसाठी दिल्लीगेट येथे आंदोलन
नगर – बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रम्हचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. चिन्मय कृष्णदास हे बांगलादेशातील हिंदू समाजाचे प्रतिनिधीत्व करत होते व तेथील अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवत होते. ही घटना अत्यंत दुःख व खंत व्यक्त करणारी असून, स्वामी चिन्मय कृष्णदास यांची त्वरित सुटका करण्यात यावी याचबरोबर पुणतांबा (जि. अहिल्यानगर) या ठिकाणी महादेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. पुणतांबा येथे जाधव, बालाजी रायपेल्ली, ओंकार जेटला, किशोर भागानगरे, गणेश वाळुंजकर आदींसह विविध संघटनांचे ३५ हुन अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते. भारत सरकारने तात्काळ निर्णय घेऊन उपाययोजना करावी : नामदेव जायभाय सध्या आपण पहातो, मंदिरावर हल्ले होतात, हिंदूंचे धर्मांतरण होते, ही गोष्ट गंभीर आहे. आज बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात, पूर्वी पाकिस्तान, अफगानीस्तान या ठिकाणीही हिंदूंची संख्या कमी झाली. तरी या सर्व घटनेचा विचार करता भारत सरकारने यावर तात्काळ निर्णय घेऊन बांगलादेशातील हिंदू व मंदिरे सुरक्षित करावी, असे ते यावेळी म्हणाले. याचबरोबर दिगंबर गेंट्याल, बापू ठाणगे यांनीही मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाद्वारे एक ठाम संदेश दिला गेला की, हिंदू धर्मावर होणार्या एकाच महिन्यात ही दुसरी घटना असून १३ डिसेंबर रोजी हनुमान मंदिरात तर २३ डिसेंबर रोजी महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना करण्यात आली. या घटनेचा लवकरात लवकर तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अहिल्यानगर येथील दिल्लीगेट येथे साय. ५ ते ६ या वेळेत हिंदू राष्ट समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी जय श्रीराम, हर हर महादेव अशा घोषणाही देण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिर तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेच्या मागण्यांसाठी दिल्लीगेट येथे आंदोलन करताना हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते. या आंदोलनाला दिगंबर गेंट्याल, छावा युवा मराठा महासंघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर गोरे, अधिवक्ता नामदेव जायभाय, मंदिर महासंघाचे गणेश पलंगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख व अहिल्यानगर जिल्हा हिंदू संघटक बापू ठाणगे, भाजप महिला आघाडीच्या सौ. सुरेखा विद्ये, सनातन संस्थेचे विनायक बत्तीन, हिंदू जनजागृती समितीचे परमेश्वर गायकवाड, संतोष गवळी, यश आघातांचा विरोध करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. पुणतांबा येथील हनुमान मंदिर व महादेव मंदिरातील घटनांची सक्षम व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, आरोपी खरच मनोरुग्ण आहे का, याची तपासणी सक्षम वैद्यकीय अधिकार्यामार्फत करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व मंदिरातील दानपेट्या चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व मंदिरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, जेणेकरून भवीष्यात अशा घटना होणार नाहीत, आदी मागण्या करण्यात आल्या.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
म्हातारा आणि तरुण
एक अविचारी तरुण माणूस रस्त्याने चालला असता म्हातारपणामुळे ज्याचे शरीर धनुष्यासारखे
वाकले आहे असा एक माणुस त्याला दिसला, तेव्हा तो त्या म्हातार्याला म्हणाला, ’बाबा तुमचं हे
धनुष्य मला विकत देता का ?’ म्हातारा त्यावर म्हणाला, ’तुम्ही पैसे खर्च करून धनुष्य विकत
घेण्यापेक्षा थोडे थांबाल तर बिनपैशाने असंच धनुष्य तुम्हाला मिळेल, कारण तुम्हाला म्हातारपण आलं
म्हणजे तुमच्याही शरीराचं असंच धनुष्य होणार आहे.’
हे ऐकताच तो तरुण माणू खाली मान घालून निमूटपणे चालता झाला.
तात्पर्य : माणसाला म्हातारपणामुळे निर्माण झालेल्या वैगुण्याबद्दल त्याची चेष्टा करून त्यात
आनंद मानणे हे माणूसकीचे लक्षण नव्हे.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
आईस्क्रीमचा शोध कोणी लावला?
रणरणत्या उन्हात घामाच्या धारांवरील एकमेव जालीम उपाय म्हणजे कोनाच्या सर्वबाजूंनी ओळघणारे आईस्क्रीम. तापमानाचा पारा चढलेला असताना आपल्याला हा थंडगार खाद्यपदार्थ चाखावासा वाटतोच, पण कुडकुडणार्या थंडीतही या पदार्थाचा आनंद ज्यांनी लुटला असेल ते खरे आईस्क्रीमचे चाहते. निमित्त काहीही असो, शेवट गोड करायचा असेल तर आईस्क्रीमलाच पसंती दर्शवली जाते. आईस्क्रीमच्या इतिहासात डोकावायला गेल्यास तब्बल २५०० वर्षे मागे जावे लागते. आता आपण खात असेलेल्या आईस्क्रीमपेक्षा कितीतरी वेगळे आईस्क्रीम पहिल्यांदा प्राचिन पर्शियामध्ये बनवले गेले. गोड चवीच्या पाण्याच्या बर्फाचे तुकडे करून त्यावर वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आणि फळांनी ते सजवलं जात असे. आईस्क्रीम बनवण्याची ही पद्धत हळूहळू रोमन आणि ग्रीक साम्राज्यातही पोहोचली. खरंतर आईस्क्रीम बनवण्याची प्रक्रिया फारच खर्चिक होती. परंतु तिथल्या राजांनी अतिशय खुल्या मनाने या पदार्थाचे स्वागत केले आणि त्यांच्याकडे असलेल्या मुबलक संपत्तीच्या जोरावर त्याला मानाचं स्थान प्राप्त करून दिलं. पुढे रोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर शिखरांवरून शहरात येणार्या बर्फाची वाहतूक बंद झाली आणि मग आईस्क्रीम बनवणं आणि खाणं ही खर्चिक बाब बनली. इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला आपल्या आईस्क्रीम पाककृतीला उर्वरित इंग्लंडपासून गुप्त ठेवण्यासाठी खानसाम्याला प्रतिवर्षी ५०० पौंड देत होता, असे सांगितले जाते. मार्को पोलो (१२५४ १३२४) या प्रवाशाने आपल्या चीनच्या दौर्यात आईस्क्रीम तयार करून इटलीला आणल्याचे पुरावे सापडतात. परंतु, पर्शियाप्रमाणेच चीनमध्येही इसवी सन पूर्व २०० च्या आसपास दूध आणि भाताचे गोठवलेले मिश्रण याच काळात जन्माला आले होते. त्यामुळे आशिया खंडासाठी आईस्क्रीमचा समावेश कधीच आयात केलेल्या पदार्थांच्या यादीत नव्हता. १३ व्या आणि १४ व्या शतकात, इटली हे मध्य पूर्वेकडील देश आणि आशियासाठी व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. त्यामुळे तेथे येणार्या व्यापार्यांमार्फत आईस्क्रीम युरोपातील वेगवेगळ्या देशात पोहोचण्यास मदत झाली. असं असलं तरी, आईस्क्रीमचा विस्तार फार सोपा नव्हता. १५३३ मध्ये इटलीची कैथरीन डीमेडीसी ही फ्रान्सच्या ड्यूक डी ऑर्लीन्स (फ्रान्सचा भावी राजा) याच्याशी विवाह करण्यासाठी फ्रान्सला गेली. तिथे तिने पूर्वेकडील आश्चर्यकारक गोष्टींसोबत युरोप खंडातील खानदानी गोष्टींची ओळख करून दिली. त्यामध्ये जेवणाची वेगळी भांडी, उंच टाचांचे बूट आणि अर्थातच आईस्क्रीम यांचा समावेश होता. पुढे नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि प्रयोगांच्या माध्यमातून आईस्क्रीमला लोकप्रियता प्राप्त झाली. उत्तर अमेरिकेत मात्र आईस्क्रीमच्या विक्रीला औद्योगिक क्रांतीनंतर आणि इंग्लंड व फ्रान्सच्या मागोमाग सुरूवात झाली. पण सगळीकडे आईस्क्रीमला दीर्घकाळासाठी गोठवून ठेवणे ही समस्या कायम होती. या समस्येचे निराकरण होण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले. १९२६ साली इलेट्रीक फ्रिझरचा शोध लागला आणि हव्या त्या क्षणी गारेगार आईस्क्रीम ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली.
वास्तू
बेडरुम संबंधी

बेडरुममध्ये कोणत्याही देवाची किंवा
देवीची चित्रे किंवा मूर्ती असू नये. यासोबतच
तुमच्या मृत नातेवाईकांचे फोटोही बेडरूममध्ये
ठेवू नयेत. जर असे असेल तर त्यामुळे गंभीर
वास्तुदोष निर्माण होतो आणि पती-पत्नीमध्ये
नेहमी भांडणे होतात. बेडरुममध्ये देवदेवतांची
चित्रे लावल्याने संततीच्या वाढीमध्ये अडथळे
निर्माण होतात.







