मेहेर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलिसांची कार्य पध्दती व बंदुकीची माहिती
नगर – आज संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिवस उत्साहाने साजरा होत आहे. २ ते ८ जानेवारी या आठवड्यात पोलीस स्थापना दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती रॅली, शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिस दलाविषयीची माहिती, तसेच पोलिसांकडून विविध सामाजिक जबाबदार्या पार पाडल्या जातात. आज शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस दलाची माहिती सांगून विविध वापरण्यात येणार्या हत्यारांची व बंदुकींची माहिती देण्यात आली. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पोलीस दला विषयी माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पोलीस होण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस मुख्यालय येथे मेहेरे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पोलीस दलाची माहिती. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पो.नि. उमेश परदेशी, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा. अनुरीता झगडे आदींसह विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.अनुरीता झगडे म्हणाले, विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयीची माहिती मिळाली. तसेच आपणही पोलीस बनावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. या उपक्रमासाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी व हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.