ब्रेड ऑफ लाईफ फाऊंडेशनद्वारे भिंगारला बाळगोपाळांसमवेत ख्रिस्त जयंती साजरी

0
29

नगर – भिंगार येथील इंदिरानगर सेवावस्ती मध्ये ब्रेड ऑफ लाईफ (बोल) फाऊंडेशनद्वारे बाळ गोपाळांसमवेत ख्रिस्त जयंती सोहळा ३० डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. नाताळनिमित्ताने सेवावस्तीमधील १५० हुन अधिक बाळगोपाळांना खाऊच्या पुड्यांचे वाटप करण्यात आले. सांतालॉज समवेत उपस्थित सर्व बालकांनी मोठया आनंद व उत्साहाने नाचगाण्यात भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली. यावेळी सांतालॉजची टोपी परिधान केलेले बाळ गोपाळ दिसून येत होते. या प्रसंगी प्रौढ स्त्रीया, वृध्द, तरुण तरुणी व बालकांकरीता उबदार कपडे, खेळणी यांचे ८० कुटुंबानी लाभ घेतला. इंदिरा सेवावस्तीतील नंदाताई राय यांनी बोल फाऊंडेशन प्रती आभार व्यक्त केले. फाऊंडेशनचे संस्थापक गौरव पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. सेवावस्तीतील भारत ठोकळ, विनोद उमाप, सुनील वैराळ, सागर कांबळे, धनंजय घोरपडे, दिनेश जाधव व सौ. व श्री. दत्ता क्षिरसागर यांचे सहकार्य लाभले. बोल फाऊंडेशनच्या परिवारातील अध्यक्ष जोसेफ पाटोळे, सचिव शोभा पाटोळे, विश्वस्त श्रुती पाटोळे, अमित पाटोळे, स्वयंसेवक अंतोन पाटोळे, सुशीला पाटोळे, आरती नितीन पाटोळे व रुबेन रवि मुदलियार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी सांतालॉज बनलेले कुमार गॅब्रिएल पाटोळे, आरुष पाटोळे व काव्या पाटोळे यांचे आकर्षण वाखण्यासारखे ठरले.