सुविचार

भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं भाग्यवान तर ते असतात जे त्यांना मिळतं ते चांगलं बनवतात.

हसा आणि शतायुषी व्हा!

हसा आणि शतायुषी व्हा!

मगनलाल शेट अतिशय कंजूष होते. एकदा बातमी पसरली की ते पार्टी देणार आहेत.
गावातल्या एका माणसाने शेटजींच्या नोकराला विचारले, ’काय तुझे शेट पार्टी देणार आहेत
म्हणे !’ नोकर म्हणाला, ’वाट पहा. प्रलयाच्या दिवशीच ते पार्टी देतील.’ शेटजीनी ते संभाषण
ऐकले. तो माणूस गेल्यावर नोकराला त्यांनी दटावलं, ’पार्टीचा दिवस निश्चित करण्याची तुला
काय गरज पडली होती ?’

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

दुधाचा पेला 

एकदा फार मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे लोकांवर फार मोठी आपत्ती कोसळली. पाऊस, पाणी नसल्यामुळे पीकपाणी आले नाही. प्राण्यांना चारा मिळेना. माणसांना खायला अन्नधान्य मिळेना. तप्त उन्हामुळे लोकांचा जीव नकोसा झाला. त्या वस्तीत सारेच लोक मोलमजुरी करून पोट भरणारे होते. २ ते ४ जण गर्भश्रीमंत लोक होते. त्यांच्या शेतीवाडीवर गावकरी मोलमजुरी करून आपले गुजराण करीत असत. त्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे त्या गर्भश्रीमंतांच्या शेतावरही मजुरांना काम मिळाले नाही. सहानुभूती म्हणून त्या शेठजींनी काही दिवस सर्व मजुरांना सांभाळले. शेवटी मजुरांनीच स्थलांतर करण्याची परवानगी मागितली. नाईलाजाने गावातल्या श्रीमंतांनी त्यांना परवानगी दिली. त्यानंतर गावातले मजूर कुठे जायचे याचा विचार करू लागले. तेव्हा त्यांना एका राज्याचा पत्ता समजला. त्या राज्यात जाण्याचा विचार त्या मजुरांनी केला. काही दिवस प्रवास केल्यानंतर मजुरांचा तो ताफा दुष्काळ नसलेल्या राज्याच्या वेशीपाशी आला. अनोळखी लोक राज्यात प्रवेश करताना बघून वेशीवरच्या सैनिकांनी त्यांना अडवले आणि वेशीपाशीच थांबायला लावले. राजाला वेशीपाशी अनोळखी लोक येऊन थांबल्याची वर्दी देण्यात आली. तेव्हा राजाने आपला दूत त्या लोकांकडे पाठवला. ते कोण लोक आहेत, हे तपास करून यायला सांगितले. राजाची आज्ञा मिळताच दूत तपास करून आले. त्यांनी राजाला ते मजूर कशासाठी आले त्याबद्दलची माहिती सांगितली. आणि म्हटले की, ’ते आपल्या राज्यात आश्रय मागत आहेत.’ त्या दूतांचे बोलणे ऐकून राजा विचारात पडला. राजाने आपल्या प्रधानाला बोलावून सांगितले की, ’या लोकांना आपल्या राज्यात राहू द्यायचे का?’ त्यावर प्रधान म्हणाला, ’मी त्यांची परीक्षा घेतो, नंतर आपण ठरवू. ते आपल्या राज्यात कसे राहतील ते आपल्याला समजेल! प्रधानाने त्या लोकांच्याकडे दूतांकरवी दुधाने भरलेला पेला पाठवला. त्या मजुरांमध्ये एक अतिशय हुशार माणूस होता. त्याला दुधाच्या पेल्याचा अर्थ समजला. त्याने त्या पेल्यात साखर टाकून चमच्याने दूध ढवळून परत पाठवले. प्रधानाने राजाला सांगितले. आलेले मजूर आपल्या राज्यात दुधातल्या साखरेसारखे समरसून राहू इच्छितात. राजाने तात्काळ त्या लोकांना राज्यात राहायला परवानगी दिली. तात्पर्य : मनमिळावू स्वभावामुळे परका का असेना माणूस सर्वांना प्रिय वाटतो

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

बुच पाण्यावर कसे तरंगते?


आपण बुचाचा तुकडा पाण्यात टाकला तर तो पाण्यावर तरंगतो. ही गोष्ट आपल्याला शेकडो
वर्षांपूर्वीपासूनच माहिती होती. पूर्वी बुचाचे मोठे तुकडे बुडत्या माणसाला वाचवण्यासाठी वापरले
जात. पाण्यापेक्षा हलकी वस्तू पाण्यावर तरंगते. बूच म्हणजे ओकवृक्षाचं साल. या सालीमध्ये ती
वाळल्यावर खूप हवा साठवण्याइतकी पोकळ जागा निर्माण झालेली असते. यामुळे बुचाचा
तुकडा पाण्यात टाकला की, या हवेच्या सहाय्यानं तरंगतो.
ओक वृक्ष स्पेन, पोर्तुगाल, अमेरिका व भारतात आढळतात. ते ४० फूट म्हणजे १०
मीटरपर्यंत उंच वाढतात. याचे खोड ३ ते ५ फूट (१ ते १ ॥ मीटर) व्यासाचे असते. साधारणपणे
प्रथम वीस वर्षांनी व नंतर दर नऊ वर्षांनी ओक वृक्षाचे साल काढले जाते. हे चक्र झाड १०० ते
१२५ वर्षांचे होईपर्यंत चालते.
बुचाचे तुकडे आज रबरी बुचांमुळे व्यवहारात दिसत नसले, तरी क्रिकेट व हॉकीच्या चेंडूंचा
गाभा आणि ध्वनीनियंत्रित खोल्या यात वापरण्यात येतात.

सौंदर्य

आपला हात पाठीपर्यंत पोहचत
नसल्याने पाठीची स्वच्छता निट होऊ शकत
नाही. यासाठी बॉडी स्पंजचा वापर करावा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा

सल्ला

एटीएम सुविधा उत्तर दिशेला असावी.

वास्तू


हॉटेलचे प्रवेशद्वार
सर्वसाधारण उपाहारगृह व लॉज या
प्रकारातील हॉटेल्स् अत्यावश्यक प्रकारातील
मानली जातात. त्यामुळे त्यांचे प्रवेशद्वार पाच
मुख्य शुभ प्रवेशद्वारांपैकी खास करुन उत्तर ते
पूर्व भागातील असणे अधिक चांगले.

पाककला

नारळी पाकातील खोबर्‍याच्या वड्या

साहित्य : एक मध्यम नारळ, पाव किलो साखर, पाव लिटर दूध, पाच-सहा वेलदोडे,
पिस्ते, चारोळी.
कृती : नारळ खोवून घ्यावा. खोबरे, साखर व दूध एकत्र शिजत ठेवावे. शिजत असताना
सारखे हलवावे व गोळा झाल्यावर त्यात वेलचीची पूड घालावी. ताटाला तूप लावून त्यावर तो गोळा
थापावा. त्याच्यावर पिस्त्याचे काप व चारोळी टाकावी व हलया हाताने थोडेसे थापावे अगर
लाटावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात.

आरोग्य


रोज किमान एवढे चालावे आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज चालणे
अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. हा
एक व्यायाम आहे जो कोणत्याही वयोगटातील लोक करू शकतात. चालण्याने लठ्ठपणा
कमी होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला दररोज १० हजार पावले चालण्याचा
सल्ला दिला जातो.

दैनिक पंचांग शनिवार, दि. ४ जानेवारी २०२५

शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
शततारा २१|२४, सूर्योदय ०६ वा. ३५ मि. सूर्यास्त ०५ वा. ५० मि

मेष : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका.
मन रमणार नाही.

वृषभ : पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल.
आपल्या आरोग्याची काळजी घ्याल.

मिथुन : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल.
व्यक्तिगत कामात उन्नति होईल.

कर्क : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास
समर्थन मिळेल.

सिंह : अडकलेला पैसा मिळेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. आर्थिक
विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे.

कन्या : आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा.
आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.

तूळ  : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल.
वरिष्ठांची मर्जी राहील.

वृश्चिक : नवीन कामांना चालना मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आरोग्य मध्यम
राहील.

धनु : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी
संभवतात. प्रतिष्ठा लाभेल.

मकर : आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. कामाला वाव मिळेल.
आपले निर्णय, विचार इतरांवर थोपवाल.

कुंभ : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील.

मीन : वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक
लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा