अहिल्यानगर मधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करणार

हिंदुत्व हा अहिल्यानगर शहराचा श्वास : शिवसेनेचे किरण काळे

नगर – अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेला नगरकरांनी मागील पस्तीस वर्षांपासून भरभरून प्रेम दिल आहे. या
शहरामध्ये हिंदुत्वाची मशाल धगधगती ठेवण्याचे काम हे शिवसैनिकांनी केलं
आहे. प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करत पुढे घेऊन
जाण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे किरण काळे यांनी केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने
प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर काळे बोलत होते.
यावेळी प्रवक्ते खा. संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, रावजी
नांगरे, डॉ. श्रीकांत चेमटे, विलास उबाळे, आकाश आल्हाट, विकास
भिंगारदिवे, शंकर आव्हाड, किरण बोरुडे, किशोर कोतकर, भाकरे
महाराज मनीष गुगळे, दिलदारसिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख
अंबादास शिंदे, सुरज ठोकळ, मनीष गुगळे, ऋतुराज आमले, जेम्स
आल्हाट, सुजय लांडे, भाकरे महाराज, उमेश काळे, किरण डफळ,
दत्तात्रय गोसंके, मुन्ना भिंगारदिवे, अमित लद्दा आदीं उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले की, या शहरातील शिवसेनेचा जन्मच
मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाला. शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि
हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं अतूट नातं गेल्या अनेक वर्षांपासूनच
आहे. त्यामुळे शिवसैनिकांना हिंदुत्व हे काही नवीन नाही. लोकांना
ओरिजनल आणि डुप्लिकेट या मधला फरक कळतो. हिंदुत्व हा
अहिल्यानगर शहराचा श्वास आहे. तो कुणी संपवू शकत नाही असे
काळे म्हणाले.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुयात व गावात भूमिहीन बेघर समाजाला शासनाची जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक
तालुयात व गावात बेघर आदिवासी भिल्ल
समाजाचा सर्वे करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र
शासनाच्या जागा आहे. त्यातून भूमिहीन आदिवासी
भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांना ग्रामपंचात हद्दीमध्ये
महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून
द्यावी तसेच जागा नावावर नसल्याने आदिवासी
भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांना घरकुलाचा लाभ
देखील घेता येत नसल्याने जागा नावावर करून
देण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र
संघटक मोहन गोलवाड, महाराष्ट्र संघटिका वैजयंता
गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढवळे
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर
बेघर आदिवासी भिल्ल समाजाचा मोर्चा काढून
निवेदन देण्यात आले. यावेळी विजय दळे, चंद्रभान
फुलपगारे, बाबासाहेब फुलपगारे, बाबासाहेब दळे,
नवनाथ माळी, नवनाथ पवार, गोपीनाथ माळी,
सुनील पवार, अशोक निकम, बाबासाहेब निकम,
अर्जुन माळी, अंकुश माळी, महादेव माळी, लताबाई माळी, बबनराव गडाख, अण्णासाहेब पवार, हरिश्चंद्र
पवार, भाऊसाहेब गडाख, आदींसह नगर, शेवगाव, दहिगाव, बेरसडे, आने, निमगाव, नेप्ती, निंबोडी,
कर्जत, मिरजगाव, श्रीगोंदा, तरडगव्हाण, सांगवी, शहर टाकळी आदीसह विविध गावातील नागरिक
उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की, आदिवासी
भिल्ल समाजाचे अनेक कुटुंबीय असून हे ज्या
ठिकाणी राहतात त्या ठिकाणची जागा नावावर नसून
ती महाराष्ट्र शासनाची आहे. व गावामध्ये शेत जमीन
अथवा घर बांधण्यासाठी जागा नावावर नाही तसेच
या लोकांची अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने
जागा विकत घेता येत नाही व त्यांच्याकडे कोणतेही
साधन नसल्याने अनेक वेळा उपाशी राहावे लागते
त्यामुळे इकडे तिकडे भटकंती करावी लागत असून
या कुटुंबीयांना घरकुलाचा देखील लाभ भेटत नाही.
त्यामूळे जागा नावावर करून देण्यासाठी जीआर
काढण्यात यावा व देशाचा आदिवासी देशाचा मालक
असून त्यांना जागा राहण्यापूर्ती देण्यात यावी
अशी मागणी करण्यात आली असून आदिवासी
भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांचे सर्वे करून जागा अथवा
गावातील महाराष्ट्र शासनाची जागा नावावर करण्यात
यावी व घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा हे बेघर
आदिवासी भिल्ल समाज तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

बेघर कुटुंबाचा स्वतःचे घर भेटण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा

शासनाची जागा मनपाने घेऊन रमाई आवास योजनेसाठी मिळावी

नगर – मौजे बोल्हेगाव गावठाण येथील २ हेटर ५ आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यातच आहे.
ती जागा मनपाने घ्यावी व ती मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे १५० ते २०० कुटुंब
गांधीनगर बोल्हेगाव गावठाण येथे सुमारे १५ ते २० वर्षापासून भाडेतत्त्वावर रहिवास करत आहे.
त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन
योजना राबवण्याची मागणी मनपा आयुक्त डांगे यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात
आले. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब
वाघमारे, कर्मा वावरे, अक्षय गवळी, सतीश साबळे,
सचिन लोखंडे, अतुल काते, वंदना रोकडे, पोपट
रोकडे, सुनील सकट, अब्दुल पठाण, केसर ससाने,
संगीता गुंजाळ, अनिता कुर्‍हाडे, वैशाली शिरसाट,
मयुरी साबळे, अनिता साबळे, रूपाली वाल्हेकर, रेणुका
घोरपडे, अलका बोरुडे, जया मोकळ, अशा पठारे, राणी
दिवटे, अलका साबळे, संगीता मांडे, सतीश साबळे,
पिंटू तोरडे, रेखा शिरोळे, लता वैरागर, अशा काते,
मिराबाई सरोदे, मंगल चांदणे, मंगल शिंदे, यशोदा तोरडे
आदीसह बेघर कुटुंबीय उपस्थित
होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे
की, गांधीनगर बोल्हेगाव गावठाण
येथे १५ ते २० वर्षांपासून
भाडेतत्त्वावर राहत असून हे कुटुंब
बेरोजगार आहे. त्यामधील काही
कुटुंबातील व्यक्ती हे भंगार गोळा
करतात मजुरी, हमालीचे काम
करतात असे वेगवेगळ्या प्रकारे
आपले उपजीविका चालवीत
आहे. परंतु त्यांना राहण्यासाठी
स्वतःचे घर नसून हे भाड्याच्या
घरात राहून भाडे भरावे लागतात
तरी त्यांच्या उपजीविकेत पैसे
कधी मिळतात तर कधी मिळत
नाही अशा त्यांना भाडे भरणे परवडत नाही तरी बोल्हेगाव
गांधीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली पडीक
जागा सुमारे १ एकर रमाई आवास योजना, पंतप्रधान
आवास योजना, यशवंत आवास योजना ही योजना
राबवण्यासाठी घरकुल साठी मिळावी.

सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळा

सोशल मीडियाचा मिसयुज होऊ नये यासाठी ‘माझा प्रश्न सायबर क्राईमला’ यावर मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे संवाद

नगर – सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा जीवघेणी ठरत असून सायबर फसवणुकीला
निमंत्रण देणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार
संग्राम जगताप यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राधाकृष्ण फाउंडेशनच्यावतीने सोशल
मीडियाचा मिसयुज होऊ नये यासाठी ‘माझा प्रश्न सायबर क्राईमला’ या सायबर क्राईम मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे संवाद कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप बोलत होते. आमदार जगताप पुढे म्हणाले की, सोशल मिडीयामुळे वेगवेगळ्या
प्रकारे सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता सर्वांनीच सतर्क होणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींना तसेच अमिषांना बळी न पडता विचारपूर्वक कृती केल्यास आपली फसवणूक टळू
शकते. आपले अहिल्यानगर शहर व जिल्हा सायबर क्राईम मुक्त करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी आमदार जगताप म्हणाले. सोशल मीडियावरील आमिषांना राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, क्षेत्रातील उच्चशिक्षित लोक बळी पडत आहेत. ही बाब गंभीर आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष आयोजक सुमित कुलकर्णी म्हणाले की, सायबर
गुन्ह्यांच्या तपासासाठी शासनाने एक
विशेष व वेगळी शाखा सुरू केलेली
आहे हे बर्‍याच लोकांना माहीत
नाही. सायबर क्राईम ब्रँच कार्यपद्धती
विषयी समाजात माहिती व जनजागृती
व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंती निमित्त आमदार
जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर
क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या
माध्यमातून सायबर क्राईम व
सुरक्षिततेविषयी समाजात व्यापक प्रसिद्धी
होईल. भविष्यातही मोठ्या प्रमाणात अशा
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार
असल्याचे कुलकर्णी म्हणाले. पोलिसांच्या
तत्परतेमुळे आजवर अनेकांचे प्राण
वाचले आहेत. अनेकांची आर्थिक फसवणूक व
मानसिक पिळवणूकीतून सुटका झाली
आहे.
सायबर पोलीस स्टेशनचे राहुल गुंडू
यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेविषयी
मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा
गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार
दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र नागरिकांच्या
सतर्कतेमुळे हे प्रकार टळू शकतात.
स्मार्टफोन व सोशल मीडिया हे सायबर
फसवणुकीचे मूळ आहे. त्यामुळे सोशल
मीडिया हाताळताना अतिशय सतर्क रहावे.
बँक महावितरण, फोन पे, गुगल पे, मेझॉन,
आर्मी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून
बोलत असल्याची बतावणी करणार्‍यांना
आपल्या बँकेची, एटीएमची, क्रेडिट
कार्डची माहिती किंवा ओटीपी देऊ नये.
तसेच त्यांच्या सांगण्यावरून कोणतेही
अ‍ॅप डाऊनलोड करू नये. अनोळखी
व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा टठ कोड
स्कॅन करू नये. ओएलएस, फेसबुक,
इंस्टाग्राम, क्विकर यासारख्या सोशल
मीडिया साईट वरून अनोळखी व्यक्तींशी
व्यवहार करू नये, त्यांना पैसे पाठवू
नये. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी
लोभापोटी अनोळखी व्यक्तींना पैसे
पाठवू नयेत. लोन अ‍ॅप वरून लोन
घेणे टाळावे. या माध्यमातूनही मोठ्या
प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढलेले
आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, जीमेल,
व्हाट्स अ‍ॅपमध्ये टू स्टेप वेरिफिकेशन ही
सेटिंग करून आपले सोशल मीडिया अकाउंट
हॅकिंग होण्यापासून वाचवता येऊ शकते.
याचबरोबर सोशल मीडियावर अनोळखी
व्यक्तींच्या आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू
नयेत आदी मार्गदर्शक सूचना राहुल गुंडू यांनी
केल्या. तसेच सायबर फसवणूक कशाप्रकारे
होते याची अनेक उदाहरणे देऊन यापासून
कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन केले. सायबर
फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या
क्रमांकावर संपर्क साधावा याचबरोबर
आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार
नोंदवावी. तसेच हीींिीं://लूलशीलीळाश.
र्सेीं.ळप या वेबसाईटवर जाऊन तात्काळ
ऑनलाईन तक्रार नोंदवावी इत्यादी माहिती
राहुल गूंडू यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमास सायबर पोलीस स्टेशनचे
पोलीस उपनिरीक्षक योगेश चहार, अमलदार
राहुल गुंडू, पो.कॉ.अरुण सांगळे, म.पो.
कॉ.प्रीतम गायकवाड, गीता गिल्डा, दिनेश
जोशी, राज्य टंकलेखन संस्था अध्यक्ष
प्रकाश कराळे, अंबिका महिला बँकेचे अध्यक्ष
भारती आठरे, प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष
अभिजीत खोसे, शहर बँकेच्या संचालिका
रेश्मा आठरे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा
अलकाताई मुंदडा, अमित गटणे, रचना तोर,
संध्या मेढे, विनोदसिंग परदेशी, अक्षय भिसे,
मायाताई कोल्हे, श्वेता पंधाडे, स्नेहा जोशी,
नंदाताई पांडुळे, प्रा. अतुल म्हस्के, भाग्यश्री
देवतरसे, मीनल बोरा आदीसह नागरिक
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
गौरी जोशी यांनी केले.

चित्रकलेच्या माध्यमातून आपला इतिहास संस्कृती पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे एक माध्यम आहे

कोहिनूर मॉल येथे ’कलर्स आर्ट’ प्रदर्शन पाहण्यासाठी नगरकरांची गर्दी

नगर – कला ही मानवी अनुभवाचा अविभाज्य भाग आहे, हे आपल्याला एकमेकांशी संवाद
साधण्यास स्वतःला व्यक्त करण्यास, आणि जगाबद्दल नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी मदत
करत असते, कला ही प्रेरणा चिंतन आणि आनंदाचा स्रोत आहे, कला ही आपल्या इतिहास,
संस्कृती, जीवन आणि इतरांचे अनुभव समजून घेण्यासाठी मदत करते. कलेच्या माध्यमातून आपले
जीवन आनंददायक बनवते, चित्रकलेच्या माध्यमातून मनुष्याला कल्पनाशक्ती, ऊर्जा-प्रेरणा
ठरत असते चित्रकलेच्या माध्यमातून आपला इतिहास संस्कृती पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे एक माध्यम आहे, कोहिनूर मॉल येथे चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले असून नगरकर पाहण्यासाठी मोठी गर्दी करत
आहेत, तरी नगरकरांनी चित्रकलेचा आनंद घेण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन चित्रकार
गौरव भोसले यांनी केले. कोहिनूर मॉल येथे चित्रकार गौरव भोसले, अविनाश सोनवणे, अद्विती सोलंकी,
महावीर सोनटक्के या कलाकारांनी ’कलर्स आर्ट’ प्रदर्शनाचे आयोजन केले असून
पाहण्यासाठी नगरकरांची गर्दी होत आहे. यावेळी चित्रकार प्रमोद कांबळे, विटणकर
सर यांनी भेट दिली. नगर शहरामध्ये नवीन चित्रकार निर्माण होत असून, त्याचा मनस्वी आनंद
होत आहे. कोहिनूर मॉल येथे भरवण्यात आलेल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाला नगरकरांनी
भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे, असे आवाहन प्रमोद कांबळे
यांनी केले. नव्या पिढीच्या चित्रकलेचे काम पाहून खूप आनंद झाला आहे, नवी पिढी कशी
प्रगती करते हे पाहण्यासाठी मी कोहिनूर मॉल येथील चित्र कलेच्या प्रदर्शनाला भेट
दिली, हे प्रदर्शन पाहून समाधान वाटले युवा चित्रकारांची आवड चांगली आहे, त्यामुळे
त्यांनी कलेमध्येच प्रगती करावी या चित्रांमध्ये व शिल्पा मध्ये जिवंतपणा पाहिला मिळाला
असल्याचे मत विटणकर सर यांनी व्यक्त केले.

विकासकामांच्या माध्यमातून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले

नागपूर – बोल्हेगाव येथील गुंदेचा कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

ोक बडे यांचे प्रतिपादन नगर – नागपूर- बोल्हेगाव उपनगराचा विकास कामातून कायापालट होत
आहे. महापालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लावली आहे, या
भागातील नागरिकांनी देखील विकासकामांना साथ देत २० वर्षे नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. एम.आय. डी.सी मध्ये काम करणारा वर्ग
या ठिकाणी वास्तव्य करीत असून, त्यांना मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावून दिले
आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे झाली
असल्यामुळे ती पुन्हा-पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर आली
नाही. गुंदेचा कॉलनीतील रस्ता काँक्रिटी करण्याचे काम मार्गी
लागत असल्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त
होईल. तसेच प्रभागातील विविध विकासकामे मंजूर असून ते
लवकरच मार्गे लागले जातील असे प्रतिपादन माजी सभागृह
नेते अशोक बडे यांनी केले
नागपूर-बोल्हेगाव येथील गुंदेचा कॉलनी येथे अशोक
बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
चैतन्य अशोक बडे यांच्या हस्ते झाले. यावेळी
अनिल कोरडे, प्रविन गांधी, अशोक गुंदेचा, वामन
आडकर, पांडुरंग सगभोर, गणेश पवार, संकेत
रावताळे, राहुल भाबड, शुभम भापकर, विजय
भांड, अशोक बेंद्रे, अंबादास रावताळे, संजय
रिसे, भाऊसाहेब खेडकर, कालिदास देशपांडे,
बाळासाहेब भणगे, दिलीप पेटकर, विलास गोफणे,
रामदास खोडदे, कृष्णा थिटे, यश शाहू, मंगल
भणगे, संगीता पवार,अंबिका पवार, सीमा रावताळे,
रिया तिजोरे, ज्योती बोरा, शारदा हिंगमीरे, सुनीता
लांडे, रत्नमाला वांढेकर, सरिता बोरुडे, मिना थिटे,
गयाबाई कबाडी, तारामती अमृते, सविता वाघमारे,
काळे काकू, शोभा आढाव, संगीता शिंदे, बेंद्रेताई,
आशाताई दळवी, कमल गिरी, अलका थिटे आदी
उपस्थित होते.
कॉलनीतील रस्त्याचे काम अनेक दिवसापासून
प्रलंबित होते. ते मार्गी लावण्याचे काम अशोक बडे
यांनी केले आहे, त्यांना सांगितलेले कामे तातडीने मार्गी लागले
जातात, या परिसराच्या विकास कामात त्यांचा मोठा वाटा
आहे, पूर्वी या भागामध्ये कुठलेही विकास कामे नव्हती तेव्हा
त्यांनी या परिसराच्या विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर
करून आणला होता अशी माहिती अशोक गुंदेचा यांनी दिली

पुण्याच्या हॅकेथॉन उत्सवात अहिल्यानगर येथील बाबुर्डी घुमट जिल्हा परिषद शाळा राज्यात प्रथम

दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत प्रकल्प सादरीकरणाची मिळणार संधी

नगर – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर, अ‍ॅमेझॉन फ्युचर
इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित करण्यात आलेल्या सी.एस. हॅकेथॉन उत्सवमध्ये १५ जिल्ह्यांमधून ५७,६०१ विद्यार्थ्यांनी
सहभाग घेतला होता. त्यापैकी ४५ विद्यार्थी व १५ शिक्षकांची राज्यस्तरावर या स्पर्धेसाठी निवड
करण्यात आली होती. या स्पर्धे त नगर तालुयातील बाबुर्डी घुमट
जिल्हा परिषद शाळेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत
घवघवीत यश संपादन केले आहे.
हॅकेथॉन हा उत्सव १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन
दिवस अ‍ॅमेझॉन कंपनी पुणे येथे पार पडला. हा कॉम्प्युटर
सायन्स वर आधारित प्रोजेट सादर करण्याचा इव्हेंट
होता. विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य
रुजविणारा उत्कृष्ट कार्यक्रम होता. यामध्ये बाबुर्डी
घुमट शाळेच्या विद्यार्थिनी स्वाती परभाने, भक्ती परभाने,
प्रांजली सांगळे व मार्गदर्शक शिक्षिका वर्षा कासार
(भालसिंग) यांनी कृषी मित्र नावाचे मॉडेल बनवले.
त्यात ीेळश्र ोर्ळीीींश ीशपीेी वापरून ऑटोमॅटिक
एरिगेशन सिस्टीम, अल्ट्रासोनिक सेन्सर वापरून शेतीचे
जंगली प्राण्यांपासून संरक्षण तसेच शेतीसाठी लागणारी
वीज, पवन चक्कीवर बनवणे असा प्रोजेट सादर केला.
या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा नाविन्यपूर्ण असा हा
प्रोजेट होता. या प्रोजेटने सर्वांची मने जिंकून घेतली.
सदरच्या प्रोजेटचे पेटंट तयार करण्याची इच्छा मेझॉन
कंपनीचे इंजिनियर्सनी व्यक्त
केली.
या स्पर्धेत शाळेला लॅपटॉप,
टॅब, लेसा व १५०० रुपयांचा
धनादेश असे एक लाख रुपये
किंमतीचे साहित्य बक्षीस मिळाले.
या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक
नंदकुमार धामणे, वर्गशिक्षक
आबा लोंढे, वर्षा कासार, हेमाली
नागापुरे, सोहनी पुरनाळे, प्रीती
वाडेकर, संजय दळवी, राजेंद्र
काळे, अपर्णा आव्हाड या
शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल व्यवस्थापन
समिती अध्यक्ष संदीप परभाने,
उपाध्यक्ष सचिन भगत, सरपंच नमीता पंचमुख,
उपसरपंच ज्योती परभाने, केंद्रप्रमुख संजय धामणे,
विस्ताराधिकारी निर्मला साठे, गटशिक्षणाधिकारी
बाबुराव जाधव, उपशिक्षणाधिकारी जयश्री कारले,
शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, डायट प्राचार्य राजेश
बनकर, रामेश्वर लोटके, ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य
बाबुर्डी घुमट ग्रामस्थ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे
अभिनंदन केले.

सारसनगरच्या ग्रीन स्पार्क प्री स्कूलमध्ये इलेट्रॉनिक उपकरणांवर विज्ञान प्रदर्शन

सारसनगरच्या ग्रीन स्पार्क प्री स्कूलमध्ये इलेट्रॉनिक उपकरणांवर विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक दिसत आहेत.

नगर – सारसनगरमधील ग्रीन स्पार्क प्री स्कूलमध्ये इलेट्रॉनिक उपकरण या थीमवर विज्ञान प्रदर्शन पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या कल्पना शक्तीची चुणूक दाखवली. तर सादर केलेल्या
विविध प्रकल्प पाहून पालक वर्ग अवाक झाले. बालकांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा वाढून त्यांच्यातील
कला कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात मुलांनी स्मार्ट वॉच, हेअर ड्रायर, हेलिकॉप्टर, कॅलयुलेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, एटीएम मशीन, रोबोट, एलईडी बल्ब, लॅपटॉप, मोबाईल, रेफ्रिजरेटर, सीसीटीव्ही कॅमेरा, ब्ल्यू-टूथ डीव्हाईस यांसारख्या उपकरणांचे प्रकल्प
सादर केले होते. बालसंशोधकांनी उपकरणांची कार्यप्रणाली, उपयोग आणि त्यांचे महत्त्व विशद केले.
श्री विद्या निकेतनचे प्राध्यापक राहुल कुलकर्णी यांनी  या प्रदर्शनाची पहाणी केली. तर त्यांनी विद्यार्थ्यांची उत्साही कार्यशैली पाहून व विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पाचे कौतुक केले. मुलांमधील आत्मविश्वास आणि त्यांचा उत्साह
पाहून त्यांच्याशी हसत खेळत संवाद साधला. प्राध्यापक कुलकर्णी म्हणाले की, ग्रीन स्पार्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्षात त्यांना कौशल्यक्षम
शिक्षणातून घडविले जात असल्याचे सांगितले. तर प्री स्कूलच्या संचालिका हेमलता पाटील व
शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. सहशिक्षिका योगिनी गाडळकर आणि दुर्वा पाटील यांनी स्वागत केले.

धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या मढी ग्राम पंचायतीच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करा

भारतीय जनसंसद व सावित्री-फातेमा सदभावना मंचची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नगर – जात, धर्म याच्या पलीकडे जात नाथ संप्रदायाने मानवतेची शिकवण दिली. नाथांच्या भक्तात मुस्लीम, भटके,
मागासवर्गीय, वंचीत भक्तच फार मोठ्या प्रमाणात आहेत नव्हे नाथांनी याच उपेक्षित, वंचित समाजाचे संघटन केले. सुफी संत व नाथ सांप्रदाय हा अनेक शतकांपासून मानवता धर्म व जीवब्रम्ह सेवा करीत
आहेत. नाथांची हिच पंरपरा संत ज्ञानेश्वर माऊलींपासून आजपर्यंत येते. नाथांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या भूमित नेमया
त्यांच्या विचाराविरोधी वर्तन करणार्‍यांना नाथांची शिकवण व त्यांचे कार्यच समजले
नाही असे वाटते. अशा भूमीत एखाद्या विशिष्ट समूहाने यात्रेत व्यवसाय करू नये, असा ठराव करणे ही नाथ संप्रदायांच्या
विचारांशी विसंगत कृती आहे. चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रेचे पावित्र जपण्यासाठी यात्रेसाठी
सर्वांसाठी केलेल्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचे उल्लघंन कोणीही करणार नाही याची दक्षता
घेण्यात यावी. चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत कोणत्याही जाती, धर्माचा असलेला व समाज विघातक कृत्य करणार्‍याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला असला, तरी
कोणत्याही जाती – धर्माच्या विरुद्ध असा  ठराव बहुसंख्या मतदारांना ग्रामसभेत घेता येणार नाही.
सभा अध्यक्ष असलेल्या इसमाने ग्रामसभेच्या सभेच्या सूचनेत मान्यता देणे हेच मुळात संविधान व ग्रामसभेच्या कायदा
विरोधी आहे. १) ग्रामसभा – अजेंडा वर असा विषय
घेता येणार नाही.
२) सभा अध्यक्ष यांनी ऐत्यावेळी
येणार्‍या विषयावर असा प्रश्नासाठी परवानगी
करायला हवी.
३) ग्रामसभेला गणपूर्ती होऊन, असा
विषय – बहुसंख्येने पारित झाला असला,
तरी ग्रामसभेने घेतलेला अवैध ठराव
– पंचायतीने स्वीकारलाच पाहिजे असे
पंचायतीवर बंधन घालण्यात आलेले नाही.
घटनाबाह्य वैध आणि अवैध याची व्याख्या
खझउ, खपवळरप िेश्रळलश अलीं – १८६० मध्ये
सुस्पष्ट दिलेली आहे.
आता – खझउ ऐवजी भारतीय न्याय
संहिता २०२४ सुरु त्यामध्ये सुद्धा वैध आणि
अवैध तीच व्याख्या सामाविष्ठ करण्यात
आली आहे.
ग्रामसभेच्या अध्यक्ष व ग्रामसचिव
विरोधात धार्मिक तेढ, संविधानाचे व
ग्रामसभेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल
कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी
मागणी सावित्री फातेमा सद्भावना मंचा
तर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली
आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
अहिल्यानगर यांना प्रत देण्यात आली.
याप्रसंगी भारतीय जनसंसदचे
राज्याध्यक्ष अशोक सब्बन, प्रतिक बारसे,
युनूस तांबटकर, संध्या मेढे, फिरोज शेख,
रवि सातपुते, राजेंद्र कर्डिले, अ‍ॅड.आरिफ
भाई आदि उपस्थित होते.

मढी ग्रामपंचायतीचा ठराव नामंजुर करुन सरपंच, सदस्य आणि देवस्थान समितीवर कारवाई करा

अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा

नगर – अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुयातील मढी गावात मार्च महिन्यात मोठी यात्रा दरवर्षी भरत असते, त्या
अनुषंगाने या यात्रेत पुर्वी पासुन सर्वधर्म जातीचे लोक या यात्रेत सामील होतात. मढीची यात्रा ही
भटयांची पंढरी म्हणुन राज्यात ओळखली जाते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदु मुस्लिम
ऐयाचे प्रतिक म्हणुन यात्रेकडे बघितले जाते असे असताना देखील येथील ग्रामपंचायतचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड आणि देवस्थान समिती सदस्य यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या
व्यापार्‍यांना बंदी घालण्याचा ठराव घेतला. त्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करत जिल्हाधिकार्‍यांना या असंविधानिक ठराव रद्द करण्यातबाबत
निवेदन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, नगर तालुका
महासचिव रविकिरण जाधव, अ‍ॅड. योगेश गुंजाळ, फिरोज पठाण, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, शहर महासचिव अमर निरभवने, राजीव भिंगारदिवे, भिंगार शहराध्यक्ष प्रकाश साळवे, जे. डी. शिरसाठ, देविदास भालेराव,
प्रतीक जाधव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी या ठरावाची शहानिशा करून तसेच चौकशी करून हा ठराव
रद्द करून संबंधित ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही भारताचे लोक…. संविधानाच्या प्रस्ताविकेची
सुरुवात यामध्ये अशी सुरुवात असतांना, भारतीय राज्य घटनेप्रमाणे भारतातील
प्रत्येक मनुष्याला जगण्याचा, त्याचा
उदरनिर्वाह करण्याचा समान कायदा आहे.
राज्य घटनेत कोणत्या समाजाने कोणता
व्यवसाय करावा अथवा करु नये असे नाही
राज्यघटनेने येथे सर्वांना समान अधिकार
दिलेले आहे आणि समानता नांदावी असे
सांगितले आहे. मढी गावच्या
यात्रेत जो काही असंविधानिक
ठराव करुन दोन समाजात तेढ
निर्माण होईल अशाने समानता
राहणार नाही. अशा मनुवादी
विचार सरणीच्या संकुचीत
प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे
यांनी राज्यघटनेने दिलेले मुलभूत
अधिकार तत्वांचे उल्लंघन केलेले
आहे. मुस्लिम समाजालाच नव्हे
तर येथील प्रत्येक घटकाला
राज्यघटनेने समानतेचा
अधिकार बहाल केलेला आहे.
चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेमध्ये
मुस्लिम समाजाच्या व्यापार्‍यांना बंदी घालुन
असंविधानीक ठराव संमत करणार्‍या सरपंच
तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय
मरकड यांच्यासह ठरावास मंजुरी देऊन
संमती देणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई
करावी. तसेच असंविधानिक ठराव करून
पदाचा गैरवापर करणार्‍या ग्रामपंचायत
बरखास्त करावी व तेथे प्रशासक नेमण्यात
यावा व ठराव नामजुर करन्याचे आपण
आदेशीत करावे. यात्रेपुर्वी आपण झालेला
ठराव नामंजुर करुन ग्रामपंचायत सरपंच,
ग्रामपंचायत सदस्य आणि देवस्थान
समितीवर कारवाई केली नाही तर वंचित
बहुजन आघाडी तर्फे जन आंदोलन छेडण्यात
येईल मग त्याचे पासुन होणार्‍या परिणामास
संबंधित जबाबदार राहतील.