मुकुंदनगरमधील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

नगर – महानगरपालिकेने  २४ फेब्रुवारीला झेंडीगेट परिसरात अतिक्रमणे व कत्तलखान्याची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त
केल्यानंतर २५ फेब्रुवारीला मुकुंदनगर व फकीरवाडा परिसरात कारवाई करण्यात आली. टपर्‍या, ओटे, रॅम्प,
पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. झेंडीगेट प्रभाग कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन
विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने सकाळीच वनविभाग कार्यालय, मेराज मस्जिद रोडपासून कारवाई
सुरू केली. मुकुंदनगसह फकीरवाडा रोडवरील अतिक्रमणेही हटवण्यात आली. टपर्‍या,
ओट्यांची पक्की अतिक्रमणे, रस्त्यावर येणारे रॅम्प, पार्किंगसाठी बांधण्यात आलेले
पत्र्याचे शेड, बेकायदेशीर फलक कारवाई करून हटवण्यात आले. महानगरपालिकेच्या
ओपन स्पेसमध्ये पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले होते. जेसीबीच्या
साहाय्याने ते जमीनदोस्त करण्यात आले.
महापालिकेने महिनाभर अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन केले आहे. त्यानुसार
कारवाई सुरू झाली आहे. अतिक्रमणधारकांनी त्यांची अतिक्रमणे त्वरीत काढून
घ्यावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक
यशवंत डांगे यांनी दिला आहे. पुढील वेळापत्रक प्रमाणे कार्यवाही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले
२७ फेब्रुवारी रोजी पाईपलाईन रोड, डी मार्ट, बंधनलॉन, आठरे पाटील पब्लीक स्कुल तपोवनरोड, भिस्तबाग
महाल, नानाचौक, ढवणवस्ती ते जुना पिंपळगांवरोड. २८ फेब्रुवारी रोजी
कोठला स्टॅण्ड, डी.एस.पी चौक, छत्रपती संभाजी महाराज रोड, वसंत
टेकडी ते इंद्रायणी हॉटेल पर्यंत. ३ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड, फॉरेस्ट
ऑफिस ते बडी मस्जीद, पाण्याची टाकी ते मेराज मस्जीद ते राजनगर, गाडे शाळा,
टॉपअप पेट्रोल पंप. ४ मार्च रोजी कोठला स्टॅण्ड, जीपीओचौक, चांदणी चौक, कोठी
चौक, मार्केट यार्ड चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सक्करचौक, कायनेटीक
चौक. ५ मार्च रोजी सक्कर चौक, मल्हार चौक, रेल्वे स्टेशन परिसर, कायनेटीक चौक.
६ मार्च रोजी कायनेटीक चौक, केडगांव, अंबिकानगर बस स्टॉप व केडगांव परिसर. ७
मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चाणय चौक, बुरुडगांवरोड, यश पैलेश
हॉटेल, आनंदऋषी हॉस्पीटल, चाणय चौक, महात्मा फुले चौक ते कोठी. १० मार्च
रोजी सक्कर चौक, टिळकरोड, आयुर्वेद कॉलेज, अमरधाम, नेप्तीनाका, कल्याणरोड,
रेल्वे उड्डाणपुल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लुटणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीतील आणखी दोघे पकडले

१२ लाख ९२ हजाराची रोकड, एक कार, तीन मोबाईल हस्तगत, सायबर पोलिसांची कारवाई

नगर – शेअर मार्केटमध्ये
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून
गुंतवणूकदारांची फसवणूक
करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा
पर्दाफाश करणार्‍या सायबर
पोलिसांनी याच टोळीतील
आणखी दोघांना अटक केली
आहे. यापूर्वी चौघांना अटक केली
होती. दरम्यान, संशयित आरोपी
हे परदेशी गुन्हेगारांच्या मदतीने
नागरिकांची आर्थिक फसवणूक
करत असल्याचे समोर आले आहे.
राजेश राठोड ऊर्फ राजेंद्र भगीरथ सिंग (रा. बिंजारी राणीगाव, जि.
नागौर, राजस्थान) व दीपककुमार घनशामभाई जोशी (रा. वसंत
विहार, सोलापूर, मुळ रा. चाणस्मा, जि. पाटणा, गुजरात) अशी
अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १२ लाख
९२ हजाराची रोकड, एक कार, तीन मोबाईल हस्तगत करण्यात
आले आहेत.
२७ जानेवारी २०२५ रोजी शेंडी (ता. नगर) येथील
रहिवाशी आयटी इंजिनिअरने सायबर पोलीस ठाण्यात शेअर मार्केट
ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिषाने १ कोटी १० लाख
८० हजार रूपयांची फसवणूक झाली असल्याची फिर्याद दिली होती.
फिर्यादीनंतर सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण
केले. यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या तपासणीअंती चौघांना
अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून राजेश राठोड
उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग याचा या फसवणुकीत महत्त्वाचा सहभाग
असल्याचे समोर आले. तो कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून
पैसे परदेशात पाठवण्याचे काम
करत होता. पोलिसांनी त्याला
अटक केली.
दरम्यान, राजेंद्रच्या
चौकशीतून या आर्थिक
फसवणुकीत चीनमधील
नागरिकांचा सहभाग असल्याचे
निष्पन्न झाले. या टोळीने भारतीय
चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये
रूपांतरित करून ते कंबोडियामध्ये
पाठवले होते. राजेंद्रच्या माहितीच्या
आधारे हवाला नेटवर्कव्दारे पैसे
हस्तांतरित करणार्‍या दीपककुमार जोशी यालाही अटक करण्यात
आली. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक योगेश
चाहेर, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल
हुसळे, अरूण सांगळे, मोहम्मंद शेख, नीलकंठ कारखेल, दिगंबर
कारखेल, मल्लिकाअर्जुन बनकर, दिपाली घोडके, सविता खताळ,
प्रितम गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
नागरीकांना सायबर पोलिसांचे आवाहन
संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेअर मार्केटमध्ये
मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य तपासणी करूनच
गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आपले बँक
खाते किंवा कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे, अन्यथा
मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते असे सायबर
पोलिसांनी म्हटले आहे.

वास्तू

0

अग्नेय कोन स्वयंपाकघरासाठी सर्वात शुभ मानला जातो. घरात सुख समृद्धी नांदते.

असे काढा चेहऱ्यावरील लव

चेहऱ्यावरील लव काढण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. तांदळाचे पीठ त्वचेला एक्सफोलिएट करते आणि केसांच्या कूपांनाही कमकुवत करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील लव सहज काढता येतात,

चाळीशीतही दिसा चिरतरुण

0

योग्य स्ट्रेचिंगमुळे शरीर लवचिक तर होतेच पण रक्ताभिसरण वाढून त्वचा आणि स्नायू देखील तरुण राहतात. कोब्रा पोजसाठी सर्वप्रथम पोटावर झोपा आणि आपले हात

खांद्याखाली ठेवा. आता हळूहळू शरीराचा पुढचा भाग वरच्या बाजूला उचला. कोपर थोडे वाकू द्या आणि डोके वर उचलून १० ते १५ सेकंद धरुन ठेवा. कोब्रा पोज केल्याने पाठदुखी दूर होते, आणि शरीर खूप मजबूत होते. पोटाचे स्नायू टोन होतात

कोहळ्याचे खमंग वडे

0

साहित्य : अर्धी वाटी चणाडाळ, पाव

वाटी मुगडाळ, पाव वाटी उडीदडाळ, दोन टी स्पून तांदूळ, कोहळा पाव किलो किसून, हिरव्या मिरच्या ४, मीठ, जिरे व ओवा ह्यांची भाजून केलेली पूड, हळद, अद्रकाचा तुकडा

कृती : डाळी आणि तांदूळ धुवून घ्या. कोहळ्याच्या किसामध्ये ३ तास भिजत घाला. पाणी टाकण्याची गरज पडत नाही,

कोहळ्याच्या पाण्यात डाळी भिजतात. भिजत घातलेले मिश्रण मिक्सर जार मध्ये घाला. त्यात मिरच्या, अद्रक, जिरेओवा पूड हे सगळं घालून जाडसर भरडून घ्या. हे मिश्रण एका बाऊलमध्ये घेऊन त्यात चविप्रमाणे मीठ, चिमूटभर हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या. आता चमच्याने किंवा हाताने गरम तेलात सोडून कुरकुरीत वडे तळून घ्या.

नरेंद्राचार्य महाराज यांच्या विषयीच्या वक्तव्याचा निषेधार्थ नगरमध्ये मोर्चा

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याला मारले जोडे, शेण फासून तिरडी काढत आंदोलन करीत नोंदवला निषेध

कॉग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी जगद्रू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा बस स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी घोषणा देत तीव्र शब्दात निषेध करून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करत तिरडी काढून त्यांचा निषेध नोंदवला.

नगर – काँग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी जगदुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी बस स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घोषणा देत तीव्र शब्दात निषेध करुन विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी शिष्यांकडून

बुरुडगांव रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत निषेध नोंदवला. महाराजांचा अपमान करणाऱ्या वडेट्टीवारांनी माफी मागावी, अन्यथा भक्तांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

तसेच आंदोलनकर्त्यांनी आ. संग्राम जगताप यांची भेट घेतली. यावेळी आ. जगताप बोलतांना म्हणाले की, वडेट्टीवार यांनी नरेंद्रचार्य महाराज यांच्या

बद्दल एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला वोट जिहाद झाला. त्यावेळेला या लोकांची तोड बंद होती. त्या वेळेला फतवे निघत होते. त्यावेळेला हे काही बोलले नाहीत, मात्र आता या लोकांच्या मनामध्ये भगवा ध्वज हा सलतो आहे. म्हणून हिंदू धर्माच्या विरोधात हे लोक बोलत आहेत आणि काही संघटना हे काम करत आहेत असे आ. जगताप यांनी म्हटले आहे.

झेंडीगेट परिसरातील अनधिकृत कत्तलखाने, अतिक्रमणे हटविली

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई

नगर – महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २४
फेब्रुवारीला सकाळी शहरातील झेंडीगेट परिसरातील खाटिक गल्ली
येथे असलेले २ अनधिकृत कत्तलखाने जमीनदोस्त केली आहेत.
याशिवाय परिसरातील अतिक्रमणेही हटविली आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून गेल्या काही
दिवसांपासून शहरात व उपनगरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे.
या पथकाने २४ फेब्रुवारीला सकाळी झेंडीगेट परिसरातून कारवाईला
सुरुवात करण्यात आली. प्रारंभी महापालिकेच्या जागेत पार्किंगसाठी
खाजगी व्यक्तीने केलेले पत्र्याचे शेड काढण्यात आले. त्यानंतर
खाटिक गल्ली येथे असलेले २ अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या
सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.
त्यानंतर पथकाने बूथ हॉस्पिटल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोस्ट ऑफिस जवळील
खाद्य पदार्थ व इतर टपर्‍या, अशोक हॉटेल परिसरातील टपर्‍या व इतर अतिक्रमणे काढण्यात आली
आहेत. दुपारी उशिरापर्यंत ही मोहीम सुरु होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला
होता.
सदर कारवाई आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ,
उपअभियंता सुरेश इथापे, मुख्यालय क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, प्रभाग अधिकारी श्याम गोडळकर,
क्षेत्रीय अधिकारी देविदास बिज्जा, अमोल चावक यांच्या सह अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांनी केली.

नागरिकांनी अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत –

आयुक्त यशवंत डांगे शहरात व उपनगर परिसरात अतिक्रमण मोहिमेसाठी महानगरपालिका प्रशासनाने महिनाभराचे
नियोजन केलेले आहे. त्याची माहितीही वेळापत्रकासह सार्वजनिक करण्यात आलेली आहे. यापूर्वीही
मागील एक – दोन महिन्यात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती.
गेल्या दोन महिन्यात ४८५ अतिक्रमणे व ७५५ हून अधिक अनधिकृत बॅनर, होर्डिंग हटवण्यात आले
आहेत. आता पुन्हा शहरामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार व नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई सुरू राहणार
आहे. नागरिकांनी अतिक्रमण केले असल्यास, ते तात्काळ काढून घ्यावे. अनधिकृत कत्तलखान्यावर
कारवाईबाबत पोलिस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कत्तलखान्यावरही कारवाई
सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत कत्तलखाने तत्काळ काढून घ्यावेत, अन्यथा कारवाईला सामोरे
जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. दरम्यान, यापुढे
अतिक्रमण हटाव मोहीम केवळ कार्यालयीन वेळेत सीमित न राहता पहाटे सहा वाजल्यापासून रात्री बारा
वाजेपर्यंत चालूच राहणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

 

रस्ता दुभाजकाला धडकून कारने घेतला पेट, पोलीस कर्मचार्‍यासह दोघांचा होरपळून मृत्य

जामखेड – बीड रोडवरील घटना जामखेड – जामखेड शहरातील बीड रोडवर मारुती कंपनीची सीएनजी गॅस वर चालणारी
इर्टीगा कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने कारने पेट घेतला. या अपघातात एका पोलिस कर्मचार्‍यासह
दोघांना आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास
घडली. या अपघातात जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल (वय ३५) व पान शॉप मालक,
महादेव दत्ताराम काळे (वय २८, रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रोड, जामखेड) हे दोघे मयत झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे जण २४
फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कारने बीड रोडकडुन जामखेड शहराच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्या
कारने शहरापासून एक किमी अंतरावरील एका हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली. सदरची कार अत्याधुनिक पध्दतीचे असल्याने अपघातानंतर ती लगेच लॉक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला
जात आहे. त्यामुळे कारमधील दोघांना बाहेर पडता आले नाही. त्यातच कारने पेट घेतल्याने दोघांचाही कारमध्येच होरपळून
दुर्दैवी मुत्यू झाला. घटनास्थळी अपघात झाल्यानंतर पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा
मोबाईल फोन हा रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळुन आला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक
कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले. यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तातडीने जामखेड
नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनास बोलवण्यात आले. जामखेड नगरपरिषदेच्या आय्यास शेख, विजय
पवार, अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारुन आग आटोयात आणली.
मात्र तोपर्यंत गाडी जळुन खाक झाली होती. घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे
यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला व दोघांच्या मृतदेहाचे घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ.
शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. अपघातील मयत महादेव काळे याचे बीड रोडवर साईनाथ पान शॉप नावाचे पानशॉप
आहे तर धनंजय गुडवाल हे जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करीत होते. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत

दुर्बलांचे जीवन आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यसेवेने प्रकाशमान करत आहे

आनंदऋषीजी नेत्रालयात दृष्टीदोष असलेल्या बालकांच्या मोफत तपासण्या

राजकुमार छाजेड यांचे प्रतिपादन नगर – आनंदऋषीजी हॉस्पिटल दुर्बल घटकांच्या जीवन आरोग्यसेवेने प्रकाशमान
करत आहे. सर्व आरोग्य सुविधा एका छताखाली देत असताना, दृष्टीदोष असलेल्यांना देखील नेत्रालय विभागाचा आधार मिळत आहे. लहान मुलांमध्ये दृष्टीदोष निर्माण झाल्यास यांचे भवितव्य अंधकारमय बनते. अशा लहान
मुलांमधील दृष्टीदोष दूर करुन त्यांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीकोनाने हे शिबिर घेण्यात आले. या सेवा कार्याच्या संधीतून
समाधान मिळत असल्याची भावना पुणे येथील राजकुमार छाजेड यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी नेत्रालय येथे बाल नेत्र चिकित्सा व मोफत नेत्र शस्त्रक्रिया
शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी राजकुमार छाजेड बोलत होते. यावेळी अशोककुमार छाजेड, सुनिल छाजेड,
सौ. भावना छाजेड, सौ. समता छाजेड, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रकल्पाचे समन्वयक डॉ. विजय
दळवी, जैन सोशल फेडरेशनचे सुनिल मालू, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, मेडिकल
डायरेटर डॉ. अशोक महाडिक, बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. विमल राजपूत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ.
संपदा मिरीकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात आनंद छाजेड म्हणाले की, मागील ७
वर्षांपासून आनंदऋषीजी नेत्रालयात ९२ हजार ऑपरेशन यशस्वी करण्यात आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात जाऊन
दृष्टीदोष असलेल्या रुग्णांना नवदृष्टी देण्याचे काम केले जात आहे. दुर्गम भागात वाड्या-वस्तीवर जाऊन तेथील
दृष्टीदोष असलेल्या दुर्बल घटकातील रुग्णांना हॉस्पिटल मध्ये आणून दोन दिवस त्यांच्या राहण्याची व जेवणाची
सुविधा उपलब्ध करुन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार केले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच
लहान मुलांमधील दृष्टीदोष निर्मूलनासाठी नेत्रालयाने पुढाकार घेतलेला आहे. लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या सम
स्या वाढत असून, हे दृष्टीदोष लवकर लक्षात येत नाही. यासाठी पालकांनी देखील जागरूक राहण्याची गरज
आहे. संपूर्ण जिल्ह्यात नेत्रालयाच्या माध्यमातून मनपा व जिल्हा परिषद शाळांमधील साडेतीन हजार मुलांची नेत्र
तपासणी करण्यात आली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देऊन आवश्यकतेनूसार शस्त्रक्रिया देखील
करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. अशोक महाडिक यांनी लहान मुलांचे अंधत्व
वेगवेगळे असतात, त्यांचे दृष्टीदोष लवकर लक्षात येत नाही. सक्षम समाजासाठी व मुलांच्या भवितव्यासाठी
नेत्रालयाने पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून छाजेड परिवाराने केलेले सहकार्य कौतुकास्पद
आहे. वयाच्या आठ वर्षानंतर दृष्टीदोष लक्षात येतो, डोळ्यांचे कॅन्सर असलेले मुले देखील आढळत आहे.
यासाठी वेळोवेळी पालकांनी तपासणी करणे आवश्यक आहे. सुदृढ आरोग्य व निरोगी दृष्टी समाजाच्या प्रगतीसाठी
आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. विजय दळवी म्हणाले की, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात आनंदऋषी
हॉस्पिटलचे मोठे सहकार्य लाभत आहे. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी
नेत्रालय विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. २०१७ पासून ते २०२५ पर्यंत नेत्रदोष असलेल्या ४५० पेक्षा अधिक बालकांवर या विभागाच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुयात नेत्र
शिबिर घेऊन अडीच हजार पेक्षा जास्त मुलांचे स्क्रीनिंग करण्यात आले. तर गरजूंना मोफत चष्मे
व नेत्रदोषाचे विविध शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुनील छाजेड यांनी सशक्त पिढी घडविण्यासाठी
मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजची मुले ही आपल्या देशाचा भविष्य आहे. दृष्टीदोष
असलेल्या लहान मुलांच्या नेत्रतपासणी व उपचारासाठी छाजेड परिवाराने निस्वार्थपणे आणि सेवाभावाने हातभार
लावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी छाजेड परिवाराचा सत्कार करण्यात आला. नेत्रालयाच्या माध्यमातून जिल्हाभर शालेय
स्तरावर राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणीसाठी विशेष योगदान देणारे राजेंद्र गायकवाड व कमल गायकवाड
यांचा सन्मान करण्यात आला. या शिबिरात डोळ्यांचा तिरळेपणा, अल्प दृष्टी, जन्मजात मोतिबिंदू, पापणी
लवणे आदी विकारांची तपासणी बाल नेत्ररोग तज्ञ डॉ. विमल राजपूत यांनी केली. दिवसभर चाललेल्या या
शिबिरात शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या ११० बालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर २५ बालकांवर मोफत
शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. बाल नेत्र रुग्णांना मोफत चष्मे देखील उपलब्ध करुन देण्यात आले.