नगर शहर परिसरातून दुचाया चोरणारा सराईत आरोपी पकडला

नगर – शहरातून दुचाकी चोरी करणारा
सराईत आरोपी तोफखाना पोलिसांच्या
पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून
२ लाख ४५ हजार रुपयांच्या चार दुचाकी
हस्तगत करण्यात आल्या आहेत. किशोर
जयसिंग पठारे (वय ४०, मु.पो. पिंपळगांव
माळवी) असे त्याचे नाव आहे.
कैलास चंद्रकांत मांजरे (रा. मांजरी
ता. राहुरी) हे लग्नासाठी अहिल्यानगर येथे
आले असता त्यांची होंडा दुचाकी चोरीला
गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना
एक इसम ताठे मळा ते पंपींग स्टेशन
रोड परिसरात दुचाकी विक्रीसाठी येणार
असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद
कोकरे यांना मिळाली. गुन्हे शोध पथकाने त्याला
ताब्यात घेतले. त्याने सदर दुचाकी सिटी लॉन्स
येथील पार्किंगमधून चोरी केली असल्याचे कबूल
केले. तसेच, शहरात विविध ठिकाणाहून चोरी
केलेल्या व लपवून ठेवलेल्या तीन दुचाकी त्याने
पोलिसांच्या ताब्यात दिल्या. पुढील तपास महिला
अंमलदार संध्या म्हस्के करत आहेत.
पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या
पथकातील अंमलदार दत्तात्रय जपे, सुनिल
शिरसाठ, अहमद इनामदार, सुधीर खाडे, सुरज
वाबळे, वसिम पठाण, मनिष त्रिभुवन, बाळासाहेब
भापसे, सतिष भवर यांच्या पथकाने ही कारवाई
केली आहे.

 

बालघर प्रकल्प येथे राणी लंके यांची वही तुला

तपोवन रोड बालघर प्रकल्प येथे राणी लंके यांची वही तुला करण्यात आली.

नगर – अनाथ, गरजू मुलांना आधार देणारे
बालघर प्रकल्पामध्ये सुरू असलेले सामाजिक
कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक कामाची
आवड असणारे गणेश पवार वर्षभर विविध उपक्रम
राबवत समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत
आपले कर्तव्य पार पाडत असतात. सण, उत्सव
वाढदिवस साजरे करत असताना सकारात्मक
दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासली गेली
पाहिजेत. बालघर प्रकल्पामध्ये राबविण्यात येत
असलेले सामाजिक उपक्रमातून मुलांना संस्कार,
ऊर्जा व प्रेरणा देणारे ठरत आहे. बाल वयातच
योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगला विद्यार्थी घडला
जातो, असे प्रतिपादन राणी लंके यांनी केले
तपोवन रोड बालघर प्रकल्प येथे राणी लंके
यांची वही तुला करण्यात आली. यावेळी सिने
अभिनेत्री ऐश्वर्या कांबळे, मोनिका जाधव, शीतल
होन, पिंटू जगदाळे, बाळासाहेब भगत, सरपंच
विकास पवार, गणेश मिसाळ, शुभम जाधव,
गोवर्धन रोहकले, अक्षय लोखंडे आदींसह नागरिक
उपस्थित होते
खासदार निलेश लंके आजारी असल्यामुळे
गणेश पवार यांच्या वही तुला कार्यक्रमाला येऊ
शकले नाही, मात्र त्यांच्यापेक्षा माझे वजन जास्त
असल्यामुळे वही तुला कार्यक्रमात जास्त वह्या
लागल्या त्यामुळे बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक कामासाठी फायदा झाला असल्याचे मत
राणी लंके यांनी व्यक्त केले
वही तुला कार्यक्रमातून बालघर प्रकल्पातील
अनाथ, गरजू मुलांच्या चेहर्‍यावर हसू पाहिल्यावर
मनाला आनंद झाला. गणेश पवार हा युवक
ध्येयवेडा असून सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तरी
देखील समाजामध्ये वावरत असताना समाजाचे
आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून वर्षभर
सामाजिक उपक्रम राबवत असतात असे मत सिने
अभिनेत्री ऐश्वर्या कांबळे यांनी व्यक्त केले
खासदार निलेश लंके समाजामधील
दीनदुबळे, गरजू, अनाथ मुलांसाठी व नागरिकांसाठी
करीत असलेल्या सामाजिक कार्याचा आदर्श
घेऊन गेल्या ४ वर्षापासून कार्य सुरू आहे.
विविध सामाजिक संस्थेमधील विद्यार्थ्यांना जीवन,
आवश्यक वस्तू, शालेय गणवेश, साहित्य, आरोग्य
तपासणी, वैद्यकीय किट देण्याचे काम केले जाते.
याचबरोबर वृद्धाश्रम मधील ज्येष्ठांची देखील सेवा
केली जाते सामाजिक उपक्रमातून मनाला आनंद
होत असल्याचे मत गणेश पवार यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्त प्राध्यापकांनी ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा

महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सुधाकर मानकर यांचे आवाहन, अहिल्यानगरमध्ये शैक्षणिक परिषदेस प्रतिसाद

नगर – सेवानिवृत्तीनंतरही प्राध्यापकांना समाजातून मानसन्मान मिळत आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी सेवानिवृत्तीनंतरही
राहून नवे तंत्रज्ञान व नवे शैक्षणिक धोरण आत्मसात करा. तुमच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग समाजासाठी करून गरजू
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय व्हावे. तुमच्या
या सामाजिक कामास समाजातून नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. अखिल भारतीय स्तरावर महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटना सेवानिवृत्त प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे. नव्याने उपस्थित झालेल्या ग्रॅज्युएटीच्या प्रश्न सोडवण्यासाठी आता न्यायालयीन लढाई संघटना देत आहे. या लढाईत सर्व सेवानिवृत्त प्राध्यापकांनी एकजुटीने
सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यापीठ महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.
सुधाकर मानकर यांनी केले. अहिल्यानगरमध्ये सेवानिवृत्त महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त प्राध्यापकांचे एकदिवसीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पेमराज सारडा महाविद्यालयात झालेल्या
या परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय विद्यापीठ महाविद्यालयीन निवृत्त प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.
सुधाकर मानकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संघटनेचे माजी जनरल सेक्रेटरी प्रा.अशोक
बर्मन, महाराष्ट्र फेडरेशन विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक अध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा.शामराव
लवांडे, सेवानिवृत्त महाविद्यालयीन अध्यापक संघटना पुणेचे अध्यक्ष प्रा.मगन ताटे, सचिव प्रा.व्यंकटेश
होळेहुन्नर, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.नासीर सय्यद, प्रा. के.एल.गिरमकर, प्रा.ए. पी.कुलकर्णी व सौ.बर्मन
आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेत अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील सेवानिवृत्त
प्राध्यापक सहभगी झाले होते. यावेळी प्रा.अशोक बर्मन यांनी एआय फुटो संघटनेच्या कार्याची सविस्तर माहिती देत सांगितले, राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच एआय फुटो संघटना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
व समजतील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील आहे. प्राध्यापकांना मिळणारे
निवृत्तीवेतन हे नागरिकांनी भरलेल्या करातून मिळते; म्हणून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने आपल्या
ज्ञानाचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी करावा. तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये सक्रिय
सहभाग घेऊन आपद्ग्रस्तांना शय तेवढी मदत करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविकात प्रा.मगन
ताटे म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर प्राध्यापकांचे खूप प्रश्न निर्माण होत असतात. ते सोडवण्यासाठी
स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेला आता एक वार्ष्ण पूर्ण झाले आहे. प्राध्यापकांसमोरील
भविष्यातील आव्हाने यावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी या परिषदेचे आयोजन संघटनेने केले
आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रात ७५ वर्ष पूर्ण झालेल्या प्रो.मुकुंद दाते आणि प्रो.रामचंद्र वैशंपायन यांचा
सपत्निक विशेष सत्कार करण्यात आला. संघटनेचे सचिव प्रा.व्यंकटेश होळेहुन्नर यांनी स्वागत केले. अध्यक्ष
प्रा.शामराव लवांडे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.रविंद्र कडू यांनी
केले तर प्रा.डॉ. व्ही. एस.काळे यांनी आभार मानले. या शैक्षणिक परिषदेसाठी सारडा महाविद्यालयाच्या
प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित व प्रबंधक अशोक असेरी यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच यशस्वीतेसाठी
प्रा.संगीता परदेशी, प्राचार्य डॉ.एकनाथराव खांदवे, प्राचार्य डॉ.अशोक नवले प्रा. पांडुरंग चौधरी, प्रा.
विजय काळे, प्रा.दत्तात्रय साबळे, डॉ.जयंत क्षीरसागर, प्रा.मिलिंद देशपांडे, प्रा.दीपक भामरे, प्रा.शरद देवरे,
प्रा.शरद पवार, डॉ.श्रावण गाडेकर, डॉ.अशोक कांबळे, प्रा. बळवंत नागवडे, प्रा.बाळासाहेब रसाळ, प्रा.प्रदीप
गुजराथी, डॉ.मोहन जाधव, डॉ.कान्हू गिरमकर, प्रा.राजेंद्र साखरे, डॉ.विठ्ठल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

अहमदनगर महाविद्यालयाच्या सोशल लबतर्फे नगर शहरात वाहतूक सुरक्षा जनजागृती मोहीम

नगर – अहमदनगर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या सोशल लबच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी वाहतूक सुरक्षा
जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगर शहरातील चांदणी चौक, डीएसपी चौक, स्टेट बँक चौक येथे विद्यार्थ्यांनी सुरक्षित वाहतूक प्रवास विषय संबंधीचे घोषवाय असलेले फलक घेऊन प्रवाशांचे प्रबोधन केले. या उपक्रमाचा प्रारंभ
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दिलीपकुमार भालसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. रज्जाक सय्यद, प्रा. डॉ. समीर मोहोपात्रा, प्रा. डॉ.रवींद्र मते, प्रा. श्रद्धा कांबळे, प्रा. अमोल खाडे उपस्थित होते. तसेच या उपक्रमाला पोलीस विभाग, वाहतूक नियंत्रण विभाग आणि परिवहन कार्यालय अहिल्यानगर यांचे सहकार्य मिळाले. उपक्रमात सोशल लबची
विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी भोसले, स्वयंम बास्कर, आशिष वायभासे, ओमकार म्हस्के, आरती भोसले, ऋषिकेश अनंतरे, तोहिद शेख, कोमल शिंदे, स्वाती कनोजिया, नंदिनी निकाळजे, ऋतुजा ओहळ आदी विद्यार्थी सहभागी होते

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता, योग्य संधी मिळाल्यास भवितव्य उज्वल

पारनेर तालुयातील वासुंदे येथील साठे मैदानावर शाश्वत ब्रिगेड टीम आयोजित क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा येलुलकर यांच्या हस्ते झाला.

जयंत येलुलकर यांचे प्रतिपादन
नगर – ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता असते. त्यासाठी हवे ते परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असते. या
खेळाडूंना योग्य ते प्रशिक्षण दिले आणि त्यांच्यातील गुणवत्तेला संधी देत प्रोत्साहन दिल्यास हे खेळाडू देशात चमकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य व वअहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी
सरचिटणीस जयंत येलुलकर यांनी केले.
पारनेर तालुयातील वासुंदे येथील साठे मैदानावर शाश्वत ब्रिगेड टीम आयोजित क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा येलुलकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवृत्त आदर्श शिक्षक सूर्यभान झावरे, बी.एस.एन.एल. चे
अधिकारी भास्करराव चेमटे, रामदास झावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. येलुलकर पुढे म्हणाले की खेळाडूंच्या अंगी
असलेल्या गुणवत्तेला हेरून त्याला आकार देण्यासाठी
संघटनांनी प्रयत्नशील रहायला हवे. खेळाडूंचे
खेळाचे आयुष्य मर्यादित असल्यामुळे गुणवत्ता असूनही
ते मुख्य प्रवाहात न आल्यास त्यांचे भवितव्य झाकोळून
जाते. म्हणून खेळाडूंवर कोणताही अन्याय होऊ न
देता त्यांना हवी ते मदत करणे आवश्यक असते. या
पार्श्वभूमीवर मुंबईत आय.टी क्षेत्रात मोठ्या पदावर
असलेले गावातील उच्च शिक्षित युवक किरण झावरे
यांनी आपल्या गावाची नाळ तुटू न देता आपल्या ग्रामीण
भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे
ही कौतुकास्पद बाब आहे.
स्पर्धेचे संयोजक किरण
झावरे म्हणाले की ग्रामीण भागांत
मोठी गुणवत्ता आहे. त्यांना संधी
मिळायला हवी. भारताचा जलदगती
गोलंदाज झहीर खान आपल्या
अहिल्यानगर जिल्ह्यातील असून
खेळाडूंनी यातून प्रेरणा घ्यावी.
श्री. येलुलकर जिल्हा
क्रिकेट संघटनेचे सचिव असतांना
त्यांच्या कार्यकाळात अनेक
खेळाडूंना राज्यपातळीवर संधी
मिळाल्या. ग्रामीण भागातील
खेळाडूंमध्ये कोणताही न्यूनगंड
राहू न देता त्यांना संधी देण्यासाठी
त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच
जिल्ह्यातील प्रत्येक तालुयांत तालुका क्रिकेट संघटना
स्थापन करीत क्रांती केली. यामुळे ग्रामीण भागात शास्त्र
शुद्ध क्रिकेट सुरू होऊन मोठी चळवळ उभी राहिली.
अशा प्रकारचा प्रयोग राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच
सुरू झाला असावा.
यावेळी श्री. झावरे, श्री. चेमटे यांचीही भाषणे
झाली. भाऊसाहेब खिलारी यांनी आभार मानले. स्पर्धेत
एकूण ६० संघांनी भाग घेतला.

उद्योजक मंगेश वडजे यांच्याकडून अंबिका विद्यालयाला देणगी

केडगाव येथील श्री अंबिका विद्यालयात मंगेश वडजे यांचेवतीने तीन लक्ष रुपये देणगी हस्तांतरण सोहळा पार पडला. या्रप्रसंगी उपस्थित असलेले दादाभाऊ कळमकर, सदस्य डी. एस. वडजे (बापू), माजी प्राचार्य कैलास मोहिते आदी.

नगर – केडगाव येथील श्री अंबिका विद्यालयात हायबर टेनोक्रेट प्रायव्हेट लिमिटेड ऐरोली, नवी मुंबई कंपनीचे
सीईओ मंगेश वडजे यांचेवतीने तीन लक्ष रुपये देणगी हस्तांतरण सोहळा पार पडला. या कार्यक्रम
ाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर होते. तर
प्रमुख उपस्थिती मध्ये देणगीदार मंगेश वडजे, रयतचे माजी सचिव शिवाजीराव भोर, मॅनेजिंग
कौन्सिलचे माजी सदस्य डी. एस. वडजे (बापू), माजी प्राचार्य कैलास मोहिते, माजी
रयत सेवक पेटकर, विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य महेश गुंड,
किसनराव सातपुते, रघुनाथ लोंढे, प्रशांत कोतकर, माजी प्राचार्य कृष्णाजी थोरात,
विद्यालयाचे प्राचार्य तथा रयतच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे,
पर्यवेक्षक पोपट घोडके उपस्थित होते.
.प्रास्ताविक प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी केले त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीची
माहिती दिली व लवकरच विद्यालयात इंटर ऍटिव्ह बोर्डच्या सहाय्याने अध्यापन केले
जाणार असल्याचे सांगितले.
मंगेश वडजे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात कष्टाशिवाय फळ नाही असे सांगितले.
त्याचप्रमाणे आपण मोठेपणी एक उत्तम नागरिक बना. आपला परिसर, आपले विद्यालय
व आपला देश स्वच्छ ठेवा व जीवनात न्यूनगंड बाळगू नका. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतः
च्या प्रगतीसाठी करा असा संदेश दिला. माजी सचिव शिवाजीराव भोर यांनी मंगेश वडजे यांना
विद्यालयाला दिलेल्या देणगी बद्दल धन्यवाद दिले व भविष्यातही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी उद्योग जगतातील सीएसआर फंडाच्या
माध्यमातून विविध शाळांचा चेहरा मोहरा बदललेला आहे. बदलतो आहे, असे
प्रतिपादन केले. रयतच्या वाटचालीविषयी माहिती दिली. तसेच अंबिका विद्यालय हे
नगर शहरातील उत्कृष्ट विद्यालय आहे असा गौरव केला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना
जीवनात उत्तुंग ध्येय ठेवण्याचाही संदेश दिला. देणगीदार मंगेश वडजे रयतचे माजी
विद्यार्थी असल्याबद्दल त्यांचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सीईओ मंगेश वडजे यांचे वडील वडजे बापू यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन स्वाती औटी यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक महेश ढगे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जपकर सिताराम, गारुडकर प्रदीप, बडवे अशोक,
गुरुकुल प्रमुख दिघे बापू, तंटक रवी, भोंदे विलास, आघाव सुधीर, चोभे स्वाती, चोभे
रोहिणी, दरेकर दत्तात्रय व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

‘जोडी तुझी माझी’ कार्यक्रमात ३०० जोडप्यांनी घेतला सुखी व समाधानी संसाराचा मूलमंत्र

घटस्फोट घेणारे पती-पत्नीही आले पुन्हा एकत्र हे या कार्यक्रमाचे फलित

नगर – ज्येष्ठ संगीत समिक्षक सुहास मुळे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर मधील पती पत्नींसाठी ‘जोडी तुझी माझी’ या अनोख्या व महाराष्ट्रातील पहिल्याच संगीतमय समुपदेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शोला लग्नाला अगदी एक महिना झालेल्यांपासून ५० वर्ष झालेले असे सर्वच वयोगटातील
३०० हून अधिक जोडप्यांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात पुण्याचे मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ.गणेश
शिंदे यांनी उपस्थितांना अंतर्मुख करत सहज, सोप्या भाषेतून मनोरंजनाद्वारे जोडप्यांना सुखी व समाधानी संसारासाठी मार्गदर्शन केले. रोजच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या दिवसात सुखी संसाराचे
हरवलेले छोटे छोटे क्षण कसे पुन्हा मिळवायचे याचा
मुलमंत्र डॉ.शिंदे यांनी आपल्या तीन तासाच्या कार्यक्रम
ातून पती पत्नींना दिला.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काही
जोडप्यांमध्ये कौटुंबिक वाद होते. त्यातील काहींनी
घटस्फोटाचा निर्णयही घेतला होता. पण डॉ.गणेश शिंदे
यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शना मुळे अनेक जोडप्यांनी
घटस्पोटाचा निर्णय बदलला असल्याचे यावेळी घोषित
केले. हे या कार्यक्रमाचे मोठे फलित ठरले. डॉ.शिंदे
यांनी उपस्थितीत जोडप्यांना भावनिक करत रडायला
लावले तर प्रेमाच्या दिवसांचे स्मरण करत रोमँटिकही
केले. कार्यक्रमात अधूनमधून वातावरणाशी अनुरूप
होणारे मराठी हिंदी गाणे यावेळी स्थानिक कलाकार
सादर करत असल्याने उपस्थित जोडप्यांनी नाचण्याचा
आनंद यावेळी लुटला.
यावेळी डॉ.गणेश शिंदे यांनी पती पत्नींना अनेक
उदाहरणे देत मार्गदर्शन केले. असेच अर्धनारी नटेश्वराच्या
चित्राचे महत्व सांगून म्हणाले, पती पत्नीच्या नात्यातील
ओलावा, प्रेम, सुसंवाद कुठेतरी हरवला आहे. जे हरवले
आहे ते पुन्हा मिळवून देण्यासाठीच मी हा कार्यक्रम
करत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सर्वाधिक
महत्व आहे. स्त्री ही लक्ष्मी, संरक्षण करणारी व विद्या
देणार्‍या देवीचे स्वरूप आहे. म्हणून तिची काळजी
करत तिला प्रेम, आदर व सुरक्षा देणे आवश्यक आहे.
घरातील स्त्री जर सुखी असेल तरच ते घरही सुखी होते.
चांगले पती पत्नी झालात तरच चांगले पालकही तुम्ही
व्हाल. संसाररुपी झाडास प्रेमरूपी खत व विश्वासाचे
पाणी घातल्यास त्याचा वटवृक्ष होऊन त्याला फळे ही
मधुर व रसाळच येतील.
प्रास्ताविकात संयोजक सुहास मुळे
म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनातून सुख, आनंद व
समाधान कमी होत चालले आहे. यात बदल होणे
आवश्यक असल्याने या अनोख्या समुपदेशनाच्या
कार्यक्रमाचे आयोजन केले
आहे. लग्न नावाच्या मातीत
हिंदू संस्कृतीचा वटवृक्ष
आपले मूळ धरून आहे. परंतु
लग्नात केवळ अंतरपाट दूर
झाल्यानंतर अंतर्मनाच मिलन
होईलच याची खात्री नाहीये.
म्हणूनच अनेक घरांमध्ये
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये
होणारे सूक्ष्म भुकंप कुठल्याही
वेधशाळेत नोंदले जात नाहीत.
नंतर ते गळ्यातलं मंगळसूत्र
एक तर पायाची बेडी तरी होतं
किंवा दुसर्‍याचा गळफास तरी…
यासाठी उणे दुणे न काढत बसता
समजुतीच्या बासरीवर संसाराची
धून वाजली जाण गरजेचे आहे. तसं न होता आजकाल
घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळेच आज
आई-वडिलांनाच समुपदेशनाची गरज आहे. संस्कार व
शिस्ती अभावी कुटुंब व्यवस्था पूर्ण ढासळली आहे. या
पार्श्वभूमीवर ‘जोडी तुझी माझी’ या म्युझिकल कौन्सिलिंग
कार्यक्रमाचे आयोजन केवळ मनोरंजनासाठीच न करता
पती पत्नीने अंतमुर्ख होत चिंतन करण्यासाठी केले
आहे.
उद्घाटन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन
वसंत लोढा, किसनराव लोटके, माऊंट लिटेरा झी
स्कूलचे संचालक सुनील लोटके व प्राचार्य शैलजा लोटके
आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी नेत्ररोग तज्ञ
डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, मर्चंट बँकेचे
संचालक किशोर मुनोत आदींसह नागरिक उपस्थित
होते. यावेळी स्थानिक कलाकार रामनाथ गव्हाणे, दीपक
घायतडक, राजेंद्र शहाणे, किरण खोडे, कु.आराधना
गायकवाड, सागर शेळके व सुनील हळगावकर यांनी
गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

‘हिंद सेवा’च्या दोनशे विद्यार्थ्यांनी साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे महानाट्य

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – अनुराग धूत

नगर – हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेतील २००
विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन प्रसंगी महानाट्यातून साकारला छत्रपती शिवरायांचा इतिहास.
माऊली सभागृहात घोड्यावर स्वार झालेल्या
बाल शिवाजीची एन्ट्री पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या महानाट्यात छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव,
रायरेश्वर येथे मावळ्यांसोबत घेतलेली स्वराज्याची
शपथ, अफजल खान वध, तानाजी मालुसरे यांचा
कोंढाणा येथील पराक्रम, गड आला पण सिंह गेला,
पावनखिंड येथील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम,
भव्यदिव्य शिवराज्याभिषेक सोहळा हे सर्व ऐतिहासिक
प्रसंग पाहुन प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
सावेडी, माऊली सभागृह येथे हिंदसेवा
मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेचा
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ
उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक
अनुराग धूत, माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्रकाश पाटील आदींसह हिंद सेवा मंडळाचे
ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, हिंद सेवा मंडळाचे कार्य. सदस्य जगदिश झालानी,
अनंत देसाई, ज्योती कुलकर्णी, विष्णु सारडा, शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, शालेय
समिती सदस्य रविंद्र गुजराती, वरूण सारडा, प्राचार्य सुनिल सुसरे, सीताराम सारडा
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ.मंगला भोसले, मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनुरीता
झगडे, प्रा.शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक शिक्षकेतर
कर्मचारी उपस्थित होते.
उद्योजक अनुराग धूत म्हणाले, हिंदसेवाच्या प्राथमिक शाळेत मोठ्या प्रमाणात
शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याने शाळेची प्रगती होत आहे.तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी
पूर्ण केली जाते. विद्यार्थ्यांचे कला गुण व जिज्ञासा ओळखून विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक
महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शाळेचे २०० विद्यार्थी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी
इतिहासावर आधारित महानाट्य सादर करीत आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
धनंजय जाधव म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे विविध उपक्रम
कौतुकास्पद आहे. तसेच मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी शाळेला मैदान नसल्याने टेरेसवर
क्रीडा मैदान तयार करण्याची सुंदर संकल्पना मांडली आहे. शहरात क्रीडा मैदानी
नसल्याने टेरेसवर क्रीडा मैदान साकारण्याची कल्पना पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांच्या
समवेत आ. संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभेल.
असे आश्वासन दिले.
प्रकाश पाटील म्हणाले, छत्रपती शिवरायांचा
तेजस्वी इतिहास पाहून सर्वजण भरून गेले आहेत.
शाळेतील मुलांची संवाद करणे आवडत असल्याने
त्यांच्याशी हितगुज साधून आपला अनुभव त्यांना
सांगितल्यास त्यांचे भविष्य घडविण्यासाठी ते अनुभव
उपयोगी पडतील.
प्रास्ताविकात मधुसूदन सारडा म्हणाले,
मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांच्या प्रयत्नातून पहिली
ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एम एस सी टी च्या परीक्षेला
बसण्याची परवानगी मिळाली आहे. मागील वर्षी वीस
विद्यार्थी एम.एस.सी. आय.टी.परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक
यांच्या अथक परिश्रमामुळे पहिली ते चौथीचे विद्यार्थी १२ ते १३ वर्षापासून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण
होत आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. या स्नेहसंमेलन
कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. परिचय
सौ.मनीषा साळी यांनी करून दिला. व स्वागत सौ.अरुणा धाडगे यांनी केले. तर सौ.विद्या पोतदार
यांनी अध्यक्ष निवड केली. सूत्रसंचालन सौ. गौरी ब्रह्मे यांनी केले. तर आभार सौ. अंजली सासवडकर
यांनी मानले.

तरुणींनी करिअर बरोबर आपल्या आरोग्याकडेही लक्ष केंद्रित करावे

डॉ. शितल शिंदे यांचे प्रतिपादन

नगर – आजच्या घडीला महाविद्यालयीन
तरुणींनीमध्ये भ्रमणध्वनी, फास्ट फूडचे आती सेवन
आणि रात्री उशिरापर्यंत जागणे हा कलनिर्माण
झाल्यामुळे त्यांचे भावनिक, मानसिक आणि शारीरिक
आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी विविध प्रकारचे
रोग व विविध प्रकारच्या मनोविकृती त्याच्या मध्ये
दिसून येत आहेत. महाविद्यालयीन तरुणींनी आपल्या
करिअर बरोबर आरोग्याकडे ही लक्ष केंद्रित करावे, असे
प्रतिपादन बुथ हॉस्पिटलच्या आहार व पोषण विभाग
प्रमुख डॉ.शितल शिंदे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यार्थी
विकास मंडळ व अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर,
विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय
कन्या अभियान अंतर्गत ‘महाविद्यालयीन तरुणींचे
आरोग्य, सद्यस्थिती व भवितव्ये’ या विषयावर डॉ.
शितल शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले
होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कार्यक्रमास
उपप्राचार्य प्रा.डॉ.नोएल पारगे, उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रितमकुमार
बेदरकर आणि संगणक विभागाच्या प्रा. फरहिन खान उपस्थित
होते.
पुढे बोलताना डॉ.शितल शिंदे म्हणाल्या की, वेळेवर जेवण न
करणे, सकस आहाराचा अभाव आणि नियमित व्यायामाचा अभाव
या सर्व गोष्टींमुळे आज महाविद्यालयीन तरुणींचे आरोग्य खालवत
आहे. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर त्याचबरोबर
कार्यसंस्कृतीवर होतांनी दिसून येत आहे. विविध
अवयवांचे कॅन्सर सारखे घातक रोग अल्पकालावधीत
होत आहेत. हे टाळण्यासाठी महाविद्यालयीन तरुणींनी
याबाबत सजग राहिले पाहिजे. चांगल्या सवयी, नियमित
व्यायाम करून शारीरिक, मानसिक आणि भावनिक
आरोग्य जपले पाहिजे. त्याचबरोबर आरोग्याचे पोषण
करण्यासाठी सकस आहार नियमित घेतला पाहिजे,
असे मत त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना
वाणिज्य विभागातील प्रा.डॉ शबनम गुरुग म्हणाल्या
की, महाविद्यालयातील तरुणी आरोग्या बाबत जागरूक
नाहीत या व्याख्यान रूपाने त्यांच्यामध्ये आरोग्य विषयक
जागरूकता निर्माण होईल, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुजा विधाटे हिने
केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास
अधिकारी प्रा .डॉ भागवत परकाळ यांनी केले.
पाहुण्याचा परिचय अश्वीनी खरजुलेने करुन दिला.
तर आभार नजन साक्षी हीने मानले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी प्रियंका मुंगसे, साक्षी निकम, कापसे वैष्णवी, प्रतीक्षा
जिने, पूजा मस्के गोपाळे मनीषा, कुलात प्राची आणि साक्षी शेळके
यांनी विशेष परिश्रम घेतले.

रूग्णांना प्रधानमंत्री सहाय्यता निधी मिळवून देण्यात खा.निलेश लंके राज्यात अव्वल, स्वतःसह शरद पवारांचाही कोटा संपविला, ६३ रूग्णांना १ कोटी ८६ लाखांची मदत

नगर – प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीचा राज्यात सर्वाधिक
रूग्णांना लाभ मिळवून देत खासदार निलेश लंके यांनी नवी
दिल्लीमध्येही आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. दरवर्षी प्रत्येक
खासदाराला असलेला ३५ केसचा कोटा संपल्यानंतर राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोट्यातून २७ केसेससाठी
निधी मिळवत निलेश लंके हे सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून देणारे
खासदार ठरले आहेत.
पाच वर्षांपूर्वी विधानसभेत पारनेर-नगर मतदारसंघाचे
प्रतिनिधीत्व करताना खा. निलेश लंके यांनी मुख्यमंत्री सहाय्यता
निधीचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून दिला होता.
त्या विभागाच्या अधिकार्‍यांनी अधिकृतपणे निलेश लंके यांनी या
योजनेचा राज्यात सर्वाधिक रूग्णांना लाभ मिळवून दिल्याचे जाहीर
केले होते.
खा. निलेश लंके यांच्याकडे दररोज
अनेक रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक
उपचारासाठी मदत मिळावी यासाठी येतात.
खा. लंके हे रूग्णाच्या आजाराची माहीती
घेऊन मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सहाय्यता
निधीतून त्यास मदत मिळेल का याची खात्री
करतात. संबंधित आजार दोन्ही योजनांच्या
निकषामध्ये बसती नसतील तर लंके हे स्वतः धर्मदाय रूग्णालयांशी
संपर्क करून त्या रूग्णावर उपचार करण्याची व्यवस्था करतात.
वेळप्रसंगी सामाजिक संस्थांशी संपर्क करून संबंधित रूग्णास मदत
मिळवून देण्यासाठीही लंके यांची धडपड असते.
हजारो रूग्णांना मदतीचा हात
कोणत्याही योजनेमार्फत प्रस्ताव सादर
केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी
खा. लंके यांच्या पारनेर, नगर व मुंबई दिल्ली
येथील संपर्क कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा असून
या यंत्रणेमार्फत सादर करण्यात आलेल्या
प्रस्तावांचा दररोज आढावा घेतला जातो.
प्रस्तावात काही तृटी असतील तर संबंधित रूग्ण किंवा त्यांच्या
नातेवाईकांशी संपर्क करून त्रृटी दुर केल्या जातात. आरोग्याच्या
मदतीसाठीची यंत्रणा सतर्क असल्याने गेल्या पाच, साडेपाच वर्षात
हजारो रूग्णांना आजवर लंके यांच्या माध्यमातून मदत मिळाली
आहे.
रूग्णसंख्येची मर्यादा नको
खासदार निलेश लंके यांच्या कोटयातील ३५ तर राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोटयातील २८ अशा एकूण ६३
रूग्णांना आजवर १ कोटी ८६ लाख रूपयांची मदत मिळवून देण्यात
आली आहे. खा. निलेश लंके हे संसदेत गेल्यानंतर त्यांचा ३५
रूग्णांचा कोटा काही महिन्यात संपला. त्यामुळे त्यांनी पाठविलेले
प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाकडे पडून होते. त्यासाठी प्रत्येक
खासदारासाठी दरवर्षासाठी घालण्यात आलेले ३५ रूग्णांचे बंधन
दुर करून अमर्याद रूग्णांना मदत देण्याची मागणी खा. लंके यांनी
यापूर्वीच संसदेत केली आहे.