अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा
नगर – अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुयातील मढी गावात मार्च महिन्यात मोठी यात्रा दरवर्षी भरत असते, त्या
अनुषंगाने या यात्रेत पुर्वी पासुन सर्वधर्म जातीचे लोक या यात्रेत सामील होतात. मढीची यात्रा ही
भटयांची पंढरी म्हणुन राज्यात ओळखली जाते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदु मुस्लिम
ऐयाचे प्रतिक म्हणुन यात्रेकडे बघितले जाते असे असताना देखील येथील ग्रामपंचायतचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड आणि देवस्थान समिती सदस्य यांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या
व्यापार्यांना बंदी घालण्याचा ठराव घेतला. त्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करत जिल्हाधिकार्यांना या असंविधानिक ठराव रद्द करण्यातबाबत
निवेदन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, नगर तालुका
महासचिव रविकिरण जाधव, अॅड. योगेश गुंजाळ, फिरोज पठाण, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, शहर महासचिव अमर निरभवने, राजीव भिंगारदिवे, भिंगार शहराध्यक्ष प्रकाश साळवे, जे. डी. शिरसाठ, देविदास भालेराव,
प्रतीक जाधव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी या ठरावाची शहानिशा करून तसेच चौकशी करून हा ठराव
रद्द करून संबंधित ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही भारताचे लोक…. संविधानाच्या प्रस्ताविकेची
सुरुवात यामध्ये अशी सुरुवात असतांना, भारतीय राज्य घटनेप्रमाणे भारतातील
प्रत्येक मनुष्याला जगण्याचा, त्याचा
उदरनिर्वाह करण्याचा समान कायदा आहे.
राज्य घटनेत कोणत्या समाजाने कोणता
व्यवसाय करावा अथवा करु नये असे नाही
राज्यघटनेने येथे सर्वांना समान अधिकार
दिलेले आहे आणि समानता नांदावी असे
सांगितले आहे. मढी गावच्या
यात्रेत जो काही असंविधानिक
ठराव करुन दोन समाजात तेढ
निर्माण होईल अशाने समानता
राहणार नाही. अशा मनुवादी
विचार सरणीच्या संकुचीत
प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे
यांनी राज्यघटनेने दिलेले मुलभूत
अधिकार तत्वांचे उल्लंघन केलेले
आहे. मुस्लिम समाजालाच नव्हे
तर येथील प्रत्येक घटकाला
राज्यघटनेने समानतेचा
अधिकार बहाल केलेला आहे.
चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेमध्ये
मुस्लिम समाजाच्या व्यापार्यांना बंदी घालुन
असंविधानीक ठराव संमत करणार्या सरपंच
तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय
मरकड यांच्यासह ठरावास मंजुरी देऊन
संमती देणार्यांवर कठोरात कठोर कारवाई
करावी. तसेच असंविधानिक ठराव करून
पदाचा गैरवापर करणार्या ग्रामपंचायत
बरखास्त करावी व तेथे प्रशासक नेमण्यात
यावा व ठराव नामजुर करन्याचे आपण
आदेशीत करावे. यात्रेपुर्वी आपण झालेला
ठराव नामंजुर करुन ग्रामपंचायत सरपंच,
ग्रामपंचायत सदस्य आणि देवस्थान
समितीवर कारवाई केली नाही तर वंचित
बहुजन आघाडी तर्फे जन आंदोलन छेडण्यात
येईल मग त्याचे पासुन होणार्या परिणामास
संबंधित जबाबदार राहतील.