दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रकल्प सादरीकरणाची मिळणार संधी
नगर – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर व जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर, अॅमेझॉन फ्युचर
इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित करण्यात आलेल्या सी.एस. हॅकेथॉन उत्सवमध्ये १५ जिल्ह्यांमधून ५७,६०१ विद्यार्थ्यांनी
सहभाग घेतला होता. त्यापैकी ४५ विद्यार्थी व १५ शिक्षकांची राज्यस्तरावर या स्पर्धेसाठी निवड
करण्यात आली होती. या स्पर्धे त नगर तालुयातील बाबुर्डी घुमट
जिल्हा परिषद शाळेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत
घवघवीत यश संपादन केले आहे.
हॅकेथॉन हा उत्सव १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन
दिवस अॅमेझॉन कंपनी पुणे येथे पार पडला. हा कॉम्प्युटर
सायन्स वर आधारित प्रोजेट सादर करण्याचा इव्हेंट
होता. विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य
रुजविणारा उत्कृष्ट कार्यक्रम होता. यामध्ये बाबुर्डी
घुमट शाळेच्या विद्यार्थिनी स्वाती परभाने, भक्ती परभाने,
प्रांजली सांगळे व मार्गदर्शक शिक्षिका वर्षा कासार
(भालसिंग) यांनी कृषी मित्र नावाचे मॉडेल बनवले.
त्यात ीेळश्र ोर्ळीीींश ीशपीेी वापरून ऑटोमॅटिक
एरिगेशन सिस्टीम, अल्ट्रासोनिक सेन्सर वापरून शेतीचे
जंगली प्राण्यांपासून संरक्षण तसेच शेतीसाठी लागणारी
वीज, पवन चक्कीवर बनवणे असा प्रोजेट सादर केला.
या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा नाविन्यपूर्ण असा हा
प्रोजेट होता. या प्रोजेटने सर्वांची मने जिंकून घेतली.
सदरच्या प्रोजेटचे पेटंट तयार करण्याची इच्छा मेझॉन
कंपनीचे इंजिनियर्सनी व्यक्त
केली.
या स्पर्धेत शाळेला लॅपटॉप,
टॅब, लेसा व १५०० रुपयांचा
धनादेश असे एक लाख रुपये
किंमतीचे साहित्य बक्षीस मिळाले.
या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक
नंदकुमार धामणे, वर्गशिक्षक
आबा लोंढे, वर्षा कासार, हेमाली
नागापुरे, सोहनी पुरनाळे, प्रीती
वाडेकर, संजय दळवी, राजेंद्र
काळे, अपर्णा आव्हाड या
शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल व्यवस्थापन
समिती अध्यक्ष संदीप परभाने,
उपाध्यक्ष सचिन भगत, सरपंच नमीता पंचमुख,
उपसरपंच ज्योती परभाने, केंद्रप्रमुख संजय धामणे,
विस्ताराधिकारी निर्मला साठे, गटशिक्षणाधिकारी
बाबुराव जाधव, उपशिक्षणाधिकारी जयश्री कारले,
शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, डायट प्राचार्य राजेश
बनकर, रामेश्वर लोटके, ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य
बाबुर्डी घुमट ग्रामस्थ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे
अभिनंदन केले.