हिंदुत्व हा अहिल्यानगर शहराचा श्वास : शिवसेनेचे किरण काळे
नगर – अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेला नगरकरांनी मागील पस्तीस वर्षांपासून भरभरून प्रेम दिल आहे. या
शहरामध्ये हिंदुत्वाची मशाल धगधगती ठेवण्याचे काम हे शिवसैनिकांनी केलं
आहे. प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करत पुढे घेऊन
जाण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेचे किरण काळे यांनी केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने
प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर काळे बोलत होते.
यावेळी प्रवक्ते खा. संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, रावजी
नांगरे, डॉ. श्रीकांत चेमटे, विलास उबाळे, आकाश आल्हाट, विकास
भिंगारदिवे, शंकर आव्हाड, किरण बोरुडे, किशोर कोतकर, भाकरे
महाराज मनीष गुगळे, दिलदारसिंग बीर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख
अंबादास शिंदे, सुरज ठोकळ, मनीष गुगळे, ऋतुराज आमले, जेम्स
आल्हाट, सुजय लांडे, भाकरे महाराज, उमेश काळे, किरण डफळ,
दत्तात्रय गोसंके, मुन्ना भिंगारदिवे, अमित लद्दा आदीं उपस्थित होते.
काळे पुढे म्हणाले की, या शहरातील शिवसेनेचा जन्मच
मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून झाला. शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि
हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं अतूट नातं गेल्या अनेक वर्षांपासूनच
आहे. त्यामुळे शिवसैनिकांना हिंदुत्व हे काही नवीन नाही. लोकांना
ओरिजनल आणि डुप्लिकेट या मधला फरक कळतो. हिंदुत्व हा
अहिल्यानगर शहराचा श्वास आहे. तो कुणी संपवू शकत नाही असे
काळे म्हणाले.