बेघर कुटुंबाचा स्वतःचे घर भेटण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा

0
61

शासनाची जागा मनपाने घेऊन रमाई आवास योजनेसाठी मिळावी

नगर – मौजे बोल्हेगाव गावठाण येथील २ हेटर ५ आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यातच आहे.
ती जागा मनपाने घ्यावी व ती मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे १५० ते २०० कुटुंब
गांधीनगर बोल्हेगाव गावठाण येथे सुमारे १५ ते २० वर्षापासून भाडेतत्त्वावर रहिवास करत आहे.
त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन
योजना राबवण्याची मागणी मनपा आयुक्त डांगे यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात
आले. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब
वाघमारे, कर्मा वावरे, अक्षय गवळी, सतीश साबळे,
सचिन लोखंडे, अतुल काते, वंदना रोकडे, पोपट
रोकडे, सुनील सकट, अब्दुल पठाण, केसर ससाने,
संगीता गुंजाळ, अनिता कुर्‍हाडे, वैशाली शिरसाट,
मयुरी साबळे, अनिता साबळे, रूपाली वाल्हेकर, रेणुका
घोरपडे, अलका बोरुडे, जया मोकळ, अशा पठारे, राणी
दिवटे, अलका साबळे, संगीता मांडे, सतीश साबळे,
पिंटू तोरडे, रेखा शिरोळे, लता वैरागर, अशा काते,
मिराबाई सरोदे, मंगल चांदणे, मंगल शिंदे, यशोदा तोरडे
आदीसह बेघर कुटुंबीय उपस्थित
होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे
की, गांधीनगर बोल्हेगाव गावठाण
येथे १५ ते २० वर्षांपासून
भाडेतत्त्वावर राहत असून हे कुटुंब
बेरोजगार आहे. त्यामधील काही
कुटुंबातील व्यक्ती हे भंगार गोळा
करतात मजुरी, हमालीचे काम
करतात असे वेगवेगळ्या प्रकारे
आपले उपजीविका चालवीत
आहे. परंतु त्यांना राहण्यासाठी
स्वतःचे घर नसून हे भाड्याच्या
घरात राहून भाडे भरावे लागतात
तरी त्यांच्या उपजीविकेत पैसे
कधी मिळतात तर कधी मिळत
नाही अशा त्यांना भाडे भरणे परवडत नाही तरी बोल्हेगाव
गांधीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली पडीक
जागा सुमारे १ एकर रमाई आवास योजना, पंतप्रधान
आवास योजना, यशवंत आवास योजना ही योजना
राबवण्यासाठी घरकुल साठी मिळावी.