चित्रकलेच्या माध्यमातून आपला इतिहास संस्कृती पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे एक माध्यम आहे

0
43

कोहिनूर मॉल येथे ’कलर्स आर्ट’ प्रदर्शन पाहण्यासाठी नगरकरांची गर्दी

नगर – कला ही मानवी अनुभवाचा अविभाज्य भाग आहे, हे आपल्याला एकमेकांशी संवाद
साधण्यास स्वतःला व्यक्त करण्यास, आणि जगाबद्दल नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी मदत
करत असते, कला ही प्रेरणा चिंतन आणि आनंदाचा स्रोत आहे, कला ही आपल्या इतिहास,
संस्कृती, जीवन आणि इतरांचे अनुभव समजून घेण्यासाठी मदत करते. कलेच्या माध्यमातून आपले
जीवन आनंददायक बनवते, चित्रकलेच्या माध्यमातून मनुष्याला कल्पनाशक्ती, ऊर्जा-प्रेरणा
ठरत असते चित्रकलेच्या माध्यमातून आपला इतिहास संस्कृती पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे एक माध्यम आहे, कोहिनूर मॉल येथे चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले असून नगरकर पाहण्यासाठी मोठी गर्दी करत
आहेत, तरी नगरकरांनी चित्रकलेचा आनंद घेण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन चित्रकार
गौरव भोसले यांनी केले. कोहिनूर मॉल येथे चित्रकार गौरव भोसले, अविनाश सोनवणे, अद्विती सोलंकी,
महावीर सोनटक्के या कलाकारांनी ’कलर्स आर्ट’ प्रदर्शनाचे आयोजन केले असून
पाहण्यासाठी नगरकरांची गर्दी होत आहे. यावेळी चित्रकार प्रमोद कांबळे, विटणकर
सर यांनी भेट दिली. नगर शहरामध्ये नवीन चित्रकार निर्माण होत असून, त्याचा मनस्वी आनंद
होत आहे. कोहिनूर मॉल येथे भरवण्यात आलेल्या चित्रकलेच्या प्रदर्शनाला नगरकरांनी
भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करावे, असे आवाहन प्रमोद कांबळे
यांनी केले. नव्या पिढीच्या चित्रकलेचे काम पाहून खूप आनंद झाला आहे, नवी पिढी कशी
प्रगती करते हे पाहण्यासाठी मी कोहिनूर मॉल येथील चित्र कलेच्या प्रदर्शनाला भेट
दिली, हे प्रदर्शन पाहून समाधान वाटले युवा चित्रकारांची आवड चांगली आहे, त्यामुळे
त्यांनी कलेमध्येच प्रगती करावी या चित्रांमध्ये व शिल्पा मध्ये जिवंतपणा पाहिला मिळाला
असल्याचे मत विटणकर सर यांनी व्यक्त केले.