सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळा

0
60

सोशल मीडियाचा मिसयुज होऊ नये यासाठी ‘माझा प्रश्न सायबर क्राईमला’ यावर मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे संवाद

नगर – सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सुरू असलेली स्पर्धा जीवघेणी ठरत असून सायबर फसवणुकीला
निमंत्रण देणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार
संग्राम जगताप यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राधाकृष्ण फाउंडेशनच्यावतीने सोशल
मीडियाचा मिसयुज होऊ नये यासाठी ‘माझा प्रश्न सायबर क्राईमला’ या सायबर क्राईम मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे संवाद कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप बोलत होते. आमदार जगताप पुढे म्हणाले की, सोशल मिडीयामुळे वेगवेगळ्या
प्रकारे सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता सर्वांनीच सतर्क होणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींना तसेच अमिषांना बळी न पडता विचारपूर्वक कृती केल्यास आपली फसवणूक टळू
शकते. आपले अहिल्यानगर शहर व जिल्हा सायबर क्राईम मुक्त करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी आमदार जगताप म्हणाले. सोशल मीडियावरील आमिषांना राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, क्षेत्रातील उच्चशिक्षित लोक बळी पडत आहेत. ही बाब गंभीर आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष आयोजक सुमित कुलकर्णी म्हणाले की, सायबर
गुन्ह्यांच्या तपासासाठी शासनाने एक
विशेष व वेगळी शाखा सुरू केलेली
आहे हे बर्‍याच लोकांना माहीत
नाही. सायबर क्राईम ब्रँच कार्यपद्धती
विषयी समाजात माहिती व जनजागृती
व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंती निमित्त आमदार
जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर
क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या
माध्यमातून सायबर क्राईम व
सुरक्षिततेविषयी समाजात व्यापक प्रसिद्धी
होईल. भविष्यातही मोठ्या प्रमाणात अशा
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार
असल्याचे कुलकर्णी म्हणाले. पोलिसांच्या
तत्परतेमुळे आजवर अनेकांचे प्राण
वाचले आहेत. अनेकांची आर्थिक फसवणूक व
मानसिक पिळवणूकीतून सुटका झाली
आहे.
सायबर पोलीस स्टेशनचे राहुल गुंडू
यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेविषयी
मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा
गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार
दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र नागरिकांच्या
सतर्कतेमुळे हे प्रकार टळू शकतात.
स्मार्टफोन व सोशल मीडिया हे सायबर
फसवणुकीचे मूळ आहे. त्यामुळे सोशल
मीडिया हाताळताना अतिशय सतर्क रहावे.
बँक महावितरण, फोन पे, गुगल पे, मेझॉन,
आर्मी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून
बोलत असल्याची बतावणी करणार्‍यांना
आपल्या बँकेची, एटीएमची, क्रेडिट
कार्डची माहिती किंवा ओटीपी देऊ नये.
तसेच त्यांच्या सांगण्यावरून कोणतेही
अ‍ॅप डाऊनलोड करू नये. अनोळखी
व्यक्तींच्या सांगण्यावरून किंवा टठ कोड
स्कॅन करू नये. ओएलएस, फेसबुक,
इंस्टाग्राम, क्विकर यासारख्या सोशल
मीडिया साईट वरून अनोळखी व्यक्तींशी
व्यवहार करू नये, त्यांना पैसे पाठवू
नये. शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी
लोभापोटी अनोळखी व्यक्तींना पैसे
पाठवू नयेत. लोन अ‍ॅप वरून लोन
घेणे टाळावे. या माध्यमातूनही मोठ्या
प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढलेले
आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, जीमेल,
व्हाट्स अ‍ॅपमध्ये टू स्टेप वेरिफिकेशन ही
सेटिंग करून आपले सोशल मीडिया अकाउंट
हॅकिंग होण्यापासून वाचवता येऊ शकते.
याचबरोबर सोशल मीडियावर अनोळखी
व्यक्तींच्या आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू
नयेत आदी मार्गदर्शक सूचना राहुल गुंडू यांनी
केल्या. तसेच सायबर फसवणूक कशाप्रकारे
होते याची अनेक उदाहरणे देऊन यापासून
कसे वाचावे याबाबत मार्गदर्शन केले. सायबर
फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या
क्रमांकावर संपर्क साधावा याचबरोबर
आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार
नोंदवावी. तसेच हीींिीं://लूलशीलीळाश.
र्सेीं.ळप या वेबसाईटवर जाऊन तात्काळ
ऑनलाईन तक्रार नोंदवावी इत्यादी माहिती
राहुल गूंडू यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमास सायबर पोलीस स्टेशनचे
पोलीस उपनिरीक्षक योगेश चहार, अमलदार
राहुल गुंडू, पो.कॉ.अरुण सांगळे, म.पो.
कॉ.प्रीतम गायकवाड, गीता गिल्डा, दिनेश
जोशी, राज्य टंकलेखन संस्था अध्यक्ष
प्रकाश कराळे, अंबिका महिला बँकेचे अध्यक्ष
भारती आठरे, प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष
अभिजीत खोसे, शहर बँकेच्या संचालिका
रेश्मा आठरे, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा
अलकाताई मुंदडा, अमित गटणे, रचना तोर,
संध्या मेढे, विनोदसिंग परदेशी, अक्षय भिसे,
मायाताई कोल्हे, श्वेता पंधाडे, स्नेहा जोशी,
नंदाताई पांडुळे, प्रा. अतुल म्हस्के, भाग्यश्री
देवतरसे, मीनल बोरा आदीसह नागरिक
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
गौरी जोशी यांनी केले.