विकासकामांच्या माध्यमातून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले

0
46

नागपूर – बोल्हेगाव येथील गुंदेचा कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन

ोक बडे यांचे प्रतिपादन नगर – नागपूर- बोल्हेगाव उपनगराचा विकास कामातून कायापालट होत
आहे. महापालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास कामे मार्गी लावली आहे, या
भागातील नागरिकांनी देखील विकासकामांना साथ देत २० वर्षे नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. एम.आय. डी.सी मध्ये काम करणारा वर्ग
या ठिकाणी वास्तव्य करीत असून, त्यांना मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावून दिले
आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे झाली
असल्यामुळे ती पुन्हा-पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर आली
नाही. गुंदेचा कॉलनीतील रस्ता काँक्रिटी करण्याचे काम मार्गी
लागत असल्यामुळे या परिसराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त
होईल. तसेच प्रभागातील विविध विकासकामे मंजूर असून ते
लवकरच मार्गे लागले जातील असे प्रतिपादन माजी सभागृह
नेते अशोक बडे यांनी केले
नागपूर-बोल्हेगाव येथील गुंदेचा कॉलनी येथे अशोक
बडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
चैतन्य अशोक बडे यांच्या हस्ते झाले. यावेळी
अनिल कोरडे, प्रविन गांधी, अशोक गुंदेचा, वामन
आडकर, पांडुरंग सगभोर, गणेश पवार, संकेत
रावताळे, राहुल भाबड, शुभम भापकर, विजय
भांड, अशोक बेंद्रे, अंबादास रावताळे, संजय
रिसे, भाऊसाहेब खेडकर, कालिदास देशपांडे,
बाळासाहेब भणगे, दिलीप पेटकर, विलास गोफणे,
रामदास खोडदे, कृष्णा थिटे, यश शाहू, मंगल
भणगे, संगीता पवार,अंबिका पवार, सीमा रावताळे,
रिया तिजोरे, ज्योती बोरा, शारदा हिंगमीरे, सुनीता
लांडे, रत्नमाला वांढेकर, सरिता बोरुडे, मिना थिटे,
गयाबाई कबाडी, तारामती अमृते, सविता वाघमारे,
काळे काकू, शोभा आढाव, संगीता शिंदे, बेंद्रेताई,
आशाताई दळवी, कमल गिरी, अलका थिटे आदी
उपस्थित होते.
कॉलनीतील रस्त्याचे काम अनेक दिवसापासून
प्रलंबित होते. ते मार्गी लावण्याचे काम अशोक बडे
यांनी केले आहे, त्यांना सांगितलेले कामे तातडीने मार्गी लागले
जातात, या परिसराच्या विकास कामात त्यांचा मोठा वाटा
आहे, पूर्वी या भागामध्ये कुठलेही विकास कामे नव्हती तेव्हा
त्यांनी या परिसराच्या विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर
करून आणला होता अशी माहिती अशोक गुंदेचा यांनी दिली