भारतीय जनसंसद व सावित्री-फातेमा सदभावना मंचची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
नगर – जात, धर्म याच्या पलीकडे जात नाथ संप्रदायाने मानवतेची शिकवण दिली. नाथांच्या भक्तात मुस्लीम, भटके,
मागासवर्गीय, वंचीत भक्तच फार मोठ्या प्रमाणात आहेत नव्हे नाथांनी याच उपेक्षित, वंचित समाजाचे संघटन केले. सुफी संत व नाथ सांप्रदाय हा अनेक शतकांपासून मानवता धर्म व जीवब्रम्ह सेवा करीत
आहेत. नाथांची हिच पंरपरा संत ज्ञानेश्वर माऊलींपासून आजपर्यंत येते. नाथांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या भूमित नेमया
त्यांच्या विचाराविरोधी वर्तन करणार्यांना नाथांची शिकवण व त्यांचे कार्यच समजले
नाही असे वाटते. अशा भूमीत एखाद्या विशिष्ट समूहाने यात्रेत व्यवसाय करू नये, असा ठराव करणे ही नाथ संप्रदायांच्या
विचारांशी विसंगत कृती आहे. चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या यात्रेचे पावित्र जपण्यासाठी यात्रेसाठी
सर्वांसाठी केलेल्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्याचे उल्लघंन कोणीही करणार नाही याची दक्षता
घेण्यात यावी. चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत कोणत्याही जाती, धर्माचा असलेला व समाज विघातक कृत्य करणार्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला असला, तरी
कोणत्याही जाती – धर्माच्या विरुद्ध असा ठराव बहुसंख्या मतदारांना ग्रामसभेत घेता येणार नाही.
सभा अध्यक्ष असलेल्या इसमाने ग्रामसभेच्या सभेच्या सूचनेत मान्यता देणे हेच मुळात संविधान व ग्रामसभेच्या कायदा
विरोधी आहे. १) ग्रामसभा – अजेंडा वर असा विषय
घेता येणार नाही.
२) सभा अध्यक्ष यांनी ऐत्यावेळी
येणार्या विषयावर असा प्रश्नासाठी परवानगी
करायला हवी.
३) ग्रामसभेला गणपूर्ती होऊन, असा
विषय – बहुसंख्येने पारित झाला असला,
तरी ग्रामसभेने घेतलेला अवैध ठराव
– पंचायतीने स्वीकारलाच पाहिजे असे
पंचायतीवर बंधन घालण्यात आलेले नाही.
घटनाबाह्य वैध आणि अवैध याची व्याख्या
खझउ, खपवळरप िेश्रळलश अलीं – १८६० मध्ये
सुस्पष्ट दिलेली आहे.
आता – खझउ ऐवजी भारतीय न्याय
संहिता २०२४ सुरु त्यामध्ये सुद्धा वैध आणि
अवैध तीच व्याख्या सामाविष्ठ करण्यात
आली आहे.
ग्रामसभेच्या अध्यक्ष व ग्रामसचिव
विरोधात धार्मिक तेढ, संविधानाचे व
ग्रामसभेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल
कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी
मागणी सावित्री फातेमा सद्भावना मंचा
तर्फे जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली
आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
अहिल्यानगर यांना प्रत देण्यात आली.
याप्रसंगी भारतीय जनसंसदचे
राज्याध्यक्ष अशोक सब्बन, प्रतिक बारसे,
युनूस तांबटकर, संध्या मेढे, फिरोज शेख,
रवि सातपुते, राजेंद्र कर्डिले, अॅड.आरिफ
भाई आदि उपस्थित होते.





