‘परतीच्या’ दिशेने…?

गतसप्ताहात इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सने 65 हजारांची आणि निफ्टीने 19,500 ची पातळी ओलांडली. सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने 65,898.98 आणि निफ्टीने 19,523.60 हे सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी सातत्यपूर्ण खरेदी, मान्सूनची अल्पशी का होईना पण समाधानकारक प्रगती आणि नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाही निकालंबाबतची सकारात्मकता यामुळे बाजाराचा मूड आणि गुंतवणूकदारांमधील उत्साह वाढण्यास मदत झाली आहे. तपशिलात पाहिल्यास 27 मार्चच्या आठवड्यापासून सुरू झालेली ‘तेजी एक्सप्रेस’ अव्याहतपणाने धावताना दिसत आहे. निफ्टीने या काळात सुमारे तीन हजार अंकांची झेप घेतली आहे; तर बँक निफ्टीने सुमारे 6000 अंकांची उडी घेतली आहे. वीकली टेक्निकल चार्ट पाहिल्यास या दोन्ही निर्देशांकांमध्ये सव्वा तीन महिन्यात एकही मोठी पडझड झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी बाजारात थोडीशी घसरण दिसून आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरं पहायला मिळाले. वित्त, माहिती तंत्रज्ञान आणि तेल या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये शुक्रवारी गुंतवणूदकारांनी नङ्गावसुलीला प्राधान्य दिले. त्यामुळे सलग आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वृद्धीला ब्रेक लागला.शुक्रवारच्या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन शेअर बाजारातील घसरण आणि त्यामुळे हॉंगकॉंग, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारात झालेली पडझड हे होते. अमेरिकेतील बॉंड मार्केटमधील परतावा कमी आल्यामुळे तेथील बाजारात घसरण झाली. जागतिक बाजारांचे लक्ष सध्या अमेरिकन बॉंड यिल्डवर आहे. यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे ङ्गेडरल रिझर्व्हकडून नजिकच्या भविष्यात व्याजदरात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता बळावली आहे. रोजगार बाजार स्थिर राहिल्याने मंदीला अटकाव होणार असला तरी ङ्गेडची दरवाढ अटळ दिसत आहे. तसे झाल्यास त्याचा ङ्गटका भारतीय बाजारातील विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीला बसू शकतो. या भीतीने भारतीय बाजारात घसरण दिसून आली आहे. तथापि, ही नङ्गावसुली असल्याचे सध्या तरी दिसत आहे. सलग काही आठवडे एकसलग तेजी राहिल्यानंतर अशा प्रकारची नङ्गावसुली अपरिहार्यही असते आणि गरजेचीही असते. ती चालू आठवड्यातही कायम राहते का हे पहावे लागेल. गतसप्ताहात एङ्गआयआयनी 20361.75 कोटींच्या समभागांची खरेदी केली; तर डीआयाआयकडून 1564.60 कोटींच्या समभागांची विक्री करण्यात आली. टेक्निकल चार्ट पाहिल्यास बँक निफ्टी आणि निफ्टीच्या वीकली चार्टवर घसरणीची सुरवात होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीसाठी सर्वांत पहिला अडथळा 19375, 19400 या पातळीवर आहे. तो पार करून 19,511 च्या पुढे निफ्टी स्थिरावला तर 19700 पर्यंत झेपावू शकतो. याउलट 19300 च्या खाली घसरल्यास 19200 ते 19100 पर्यंत खाली येऊ शकतो. बँक निफ्टीसाठी 45000 ही आधार पातळी असेल. त्याखाली घसरल्यास 44300 ते 44200 पर्यंत घसरण दिसू शकते. याउलट 45 हजारांवर स्थिरावल्यास 45500 ते 45700 पर्यंत बँक निफ्टी वधारू शकतो. चालू आठवड्यापासून नव्या आर्थिक वर्षातील तिमाही निकालांची सुरवात होणार आहे. यामध्ये टीसीएस, एचसीएल टेक्नालॅाजी, विप्रोचे निकाल चालू आठवड्यात जाहीर होतील. त्याचबरोबर किरकोळ महागाईच्या आकड्यांवरही बाजाराची नजर असेल. याखेरीज रिलायन्सने 20 जुलै ही जिओ ङ्गायनान्शियलच्या डीमर्जरची तारीख जाहीर केली आहे. हिंदुस्थान झिंकने 7 रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्यादृष्टीने या समभागांवर लक्ष ठेवून राहणे आवश्यक आहे. याखेरीज सोभा कंपनीचा समभाग 570 रुपयांच्या आसपास खरेदी करुन 890 रुपये लक्ष्य ठेवता येईल. एनआरबी बेअरींग्जचा समभाग 215 रुपयांना खरेदी करुन 270 लक्ष्य ठेवता येईल. बीईएलचा समभाग 120 रुपयांसमीप खरेदी करुन 126 रुपये लक्ष्य ठेवता येईल. एचयुएलचा समभाग 2690 रुपयांसमीप खरेदी करुन 2780 रुपये लक्ष्य ठेवता येईल. डिव्हिज लॅबचा समभाग 3668 रुपयांना खरेदी करुन 4070 रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल.

अर्थजगत

दक्षिण आशियाई राष्ट्र बांगलादेशचा परकीय चलन साठा वाढवू इच्छित आहेत. त्यांना डॉलरवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ईस्टर्न बँक 11 जुलै रोजी रुपयामध्ये व्यापार करण्याची आपली योजना जाहीर करणार आहे. बँकेने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकेत रुपे खाते उघडले आहे. बांगलादेशातील आणखी एका सरकारी बँकेने सोनाली बँकेने असेच पाऊल उचलले आहे. या बँकांद्वारे भारतीय रुपयाचा वापर वाढवून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या बांगलादेशचा प्लॅन आहे. स्थानिक आणि प्रादेशिक चलने वापरणे विकसनशील देशांना संकटाच्या वेळी परकीय चलन साठा वाचविण्यात मदत करू शकते, असंही तिथल्या सरकारला वाटते.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

जेवण झाल्यावर लगेचच झोप घेतली, तर शरीरामध्ये विकृत मेदाची वाढ होते. परिणामी वजन वाढते. शांत झोपेमुळे डोळ्याचे स्नायू धरत नाहीत. डोळ्यांना विश्रांती मिळावी म्हणून दर 2-3 तासांनी डोळे मिटून त्यावर दोन्ही हातांनी पाच मिनिटे हलकासा दाब द्यावा व शांत बसावे. तसेच दर पाच तासांनी डोळे थंड पाण्याने धुवावेत. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होऊन शरीर व मन प्रफुल्लीत होते. तारुण्यामध्ये नोकरी-व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी केलेले प्रचंड काम, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, घरच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी बर्‍याच मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. नोकरी, घर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते.

घरातील वृद्धांच्या जबाबदार्‍या, मुलांचा जन्म, त्यांचे संगोपन, पाहुणचार, सणवार हे सर्व करत असताना चाळिशी कधी येते हे समजतच नाही. सात-आठ पाहुण्यांचा स्वयंपाक अगदी सहज करणार्‍या स्त्रीला चाळिशीमध्ये दोघांचा स्वयंपाक करायलासुद्धा कधी-कधी मनावर दडपण येते. याचाच अर्थ शरीराला थोडी विश्रांती हवी असते. स्वतःला सुपर वुमन न समजता झेपेल तेवढे काम करावे. इतरांबरोबर सतत तुलना, द्वेष, मत्सर व सूड भावना ठेवू नये. अति महत्त्वाकांक्षा व स्पर्धेला बळी पडू नये. यामुळे ताण वाढतो. शरीर व मनाचे संतुलन बिघडते. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी ध्यानधारणा, योगासने, ओंकारासाठी रोज थोडा तरी वेळ द्यावा. कामाचा ताण कमी होण्यासाठी आवडते संगीत ऐकावे. टीव्हीवर एखादी विनोदी मालिका बघावी.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

साहित्य सहवास – ‘देहबोली…’

0

प्रिय व्यक्ती भेटल्यावर आपल्याला आनंद होतो. आपल्याला झालेला आनंद आपल्या चेहर्‍यावर स्मित हास्याच्या रुपात दिसतो. एखाद्या लहान मुलाने खुपच हट्ट केला म्हणून घरातल्या व्यक्तीने, त्या मुलाला धोपाटलं तर, रडणार्‍या मुलाचा चेहरा अथवा तो मुलगा रागावला आहे, हे त्याच्या चेहर्‍यावरुन लक्षात येतं. ज्यावेळी एखादा उमेदवार इंटरव्यु (मुलाखत) साठी निघतो तेव्हा अगदी चकाचक, छान कसा दिसेल या दृष्टीने स्वतःचे कपडे, व्यवस्थित केसांची सेटिंग करतो. मुलाखतीच्या केबिनमध्ये जातांना रितसर परवानगी घेऊन जातो. मुलाखतकर्त्याने बसण्याची परवानगी दिली की आभार मानतो. त्या विशिष्ट क्षणी तुमची देहबोली मुलाखत घेणाराच्या लगेचच लक्षात येते. प्रश्नाला उत्तर देतांना अथवा माहिती सांगतांना आपण शब्द कसे उच्चारतो यावरुन बोलणं, आवाज लक्षात येतोच परंतू तुम्ही नेमकं कसे बसले आहात? गोंधळलेले आहात का? मुलाखतीचा तणाव चेहर्‍यावर दिसतो का? उत्तरं किती ठामपणे सांगता? माहिती सांगतांना अडखळता का? या सगळ्याच बाबींचा विचार, या विषयीचे गुण मुलाखत घेणारा नोंदवंत असतो. आपला देह बरंच काही बोलत असतो, सांगत असतो, काही शिकवतही असतो. वक्तृत्व स्पर्धेच्यावेळी वक्तृत्व जेवढं महत्वाचं आहे, तेवढीच महत्वाची आहे तुमची देहबोली. आवाजातील चढ- उतार, त्याविशिष्ठ विषयाचा तुम्ही केलेला अभ्यास, आवडेवारी, तुम्ही सदर विषय कोणत्याप्रकारे मांडता, व्यक्त होता, लोकांपर्यंत तो विषय कितपत, कसा पोहोचवता यासाठी देहबोली नक्कीच पाहिली जाते. खरं तर देहबोलीच्या माध्यमातुन आपण एकमेकांसोबत संवाद साधत असतो. जेव्हा एखाद्या परफॉर्मन्समध्ये एकही संवाद नसतो तेव्हा तुमची देहबोली नेमकी, कशी आहे? हे पाहणाराच्या लक्षात येतं. तुमची देहबोली पाहिली की लक्षात येतं तुम्ही स्वतःला नेमकं कसं सादर करणार आहात. म्हणजे अगदी तुमची हुशारी, प्रसंग निभावुन नेण्याची क्षमता, परिस्थितीशी दोन हात करण्याची तुमची कितपत तयारी आहे? तुमची देहबोली ही तुमच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग आहे.

सेलिब्रिटींचे अंगरक्षक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रथमदर्शनी व्यक्तिमत्व अर्थात देहबोली. आपला देह सहवासात येणारा सोबत निश्चितपणे बोलत असतो, काहीतरी सांगत असतो. स्मितहास्य, मोजक्या तसेच योग्य शब्दात संवाद साधणं, हस्तांदोलन, आपुलकीने केलेली चौकशी ही सगळी देहबोलीची वेगवेगळी आभुषणं. अनपेक्षित संकट आल्यावर तुम्ही नेमकी कशी प्रतिक्रिया देता हे देहबोलीवरुन लक्षात येतं. सौंदर्य प्रसाधनांनी चेहर्‍याचं सौंदर्य नक्कीच वाढवता येतं तसं देहबोलीचं सौंदर्य हे आपण नेमकं कसं वर्तन करतो यावरुन वाढतं. चेहर्‍यावरुन आपली ओळख होते. नाव लक्षात राहातं. तसं देहबोलीतुन तुम्ही तुमची वेगळी ओळख नक्कीच निर्माण करु शकता. देहबोलीचे अनेक प्रकार सांगता येतील. समजा तुमच्यासोबत कुणीतरी काही कारणास्तव भांडत असेल तर नेमकं त्याक्षणी तुमच्या देहबोलीकडे पाहिलं की समोरच्याला लक्षात येईल की तुमची लगेचच कोणती प्रतिक्रिया असणार आहे? तुम्ही भांडणारावर हल्ला करणार आहात की शांत बसणार आहात? हे सगळं तुमच्या देहबोलीवरुन लक्षात येतं. आपली देहबोली ही जेवढी सकारात्मकता, आत्मविश्वासाने असेल तेवढं आपण, नात्याची वीण घट्ट करु शकु, अधिकाधिक प्रगती करु शकु. आपल्या प्रगती अथवा अधोगतीमध्ये देहबोलीचं फारच महत्व आहे. तुम्ही एकाही शब्दाने समोरच्याशी संवाद साधत नसला तरीसुध्दा, तुमचा देह समोरच्याशी बोलतंच असतो.

सुनील राऊत

माळीगल्ली, भिंगार,अ नगर., मो.9822758383

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

दिली शक्ति है जो अदृश्य है। प्रेम सबको आकर्षित करता है लोगों को भी और फरिश्तों को भी। एक ईश्वरीय शक्ति उन लोगों के साथ होती है जो लोगों से प्रेम करते हैं। सभी जीवों से प्रेम करने वालों और उनकी रक्षा करने वालों के साथ भी ईश्वरीय शक्ति होती है। यह नियम भी उसी तरह काम करता है और करता रहेगा जैसे कि आकर्षण का नियम। जब हम प्रेम, खुशी या प्रशंसा जैसे सकारात्मक भाव और विचार करते हैं तो दिल को धड़कन शांत और कम हो जाती है। जब हम अधिक प्रेम महसूस करते हैं तो सेहत बेहतर हो जाती है। जो लोग ज्यादा खुश होते हैं या ज्यादा प्रेम अनुभव करते हैं उनका औसत जीवन 9 वर्ष ज्यादा होता है। जब हम किसी से स्नेह करते हैं तो एक हार्मोन पैदा होता है जिससे हम युवा बने रहते हैं। यदि कोई ऐसा व्यक्ति है जिसे लगता है कि उसे कोई प्रेम करने वाला नहीं है तो वह व्यक्ति आजीवन कैद काट रहा है, उसे अपना जीवन नर्क लगेगा। वह हमेशा एकांत की आग में जलेगा। वह भीड़ में भी एकांत महसूस करेगा। वह फूलों में भी शूल देखेगा। प्रेम के बिना हमारा जीवन ही एक सजा है।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

एका अनुभवी पुरुषात सर्व धर्मग्रंथाचा समावेश असतो. ते तर त्यापेक्षाही श्रेष्ठ असतात. कारण धर्म पुस्तकात त्या परम तत्त्वाचे सुक्ष्म वर्णन असते, परंतु त्याची बास्तविक व्याख्याकरून आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव प्रदान करण्यास धर्मग्रंथ पुर्णपणे असमर्थ आहेत. आजकाल प्रत्येकजण आपल्या दुष्कृत्यांबद्दल किंवा चुकांसाठी जगाला दोषी ठरवतो. प्रत्येक युगात म ानवाची हीच तक्रार आहे. भुतकाळाप्रमाणे, वर्तमान काळ आणि भविष्याचा काळ ही आमचा स्वतः चा नाही. हे जग एका विशाल चुंबकीय शक्तीसारखे आहे. आपण जितके यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतो तितकेच आपण त्याच्या आकर्षणात अडकत जातो. जगाच्या या महाजालात मनुष्य इकडून तिकडे नाचतो आणि असे समजतो की, आपल्याला कोणी पाहत नाही. बुद्धीमान मनुष्यास हे जाळे समजते. त्यातुन मुक्त होण्यासाठी त्याला कोणताही मार्ग सापडत नाही.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

लांडग्याचा बहाणा

एकदा शेळीने आपल्या करडाला चरण्यासाठी बोकडाबरोबर रानात पाठविले. बोकडाबरोबर करडू गवत खाऊ लागले. पलीकडेच एक लांडगा शिकारीसाठी टपून बसला होता. करडावर त्याची नजर जाताच त्याच्या तोंडाला पाणी सुटले. करडू चरत-चरत बोकडापासून दूर गेले की त्याला पळवावे, असा लांडग्याचा विचार होता. पण करडू बोकडाची पाठ सोडत नव्हते. त्याच्या जवळपासच चरत होते. करडाला कसे एकटे पाडावे, असा विचार करीत लांडगा हळूच करडाजवळ आला आणि म्हणाला, ‘‘अरे मुला, आईला सोडून आलास हे काही चांगले नाही. आईजवळ तुला पोटभर दूध प्यायला मिळाले असते. इथे रानात काय गवत चघळत बसलास? मी तुला तुझ्या आईकडे नेऊन सोडतो. चल माझ्याबरोबर.‘‘ त्यावर करडू म्हणाले, ‘‘मामा, मला तर आईनेच बोकडाबरोबर चरायला रानात पाठविले. शिवाय तिने मला येताना बजावून सांगितले, बाळा रानात कोणाच्या गोड बोलण्याला फसू नकोस आणि त्या लांडग्यापासून दूरच राहा.’ तुम्ही तर लांडगेमामा. तुम्ही मला येथून थाप मारून दूर न्याल आणि मला टाकाल खाऊन, हे मी केव्हाच ओळखले आहे,’’ आपली मात्रा येथे लागू पडत नाही, हे पाहताच लांडगा मागच्या मागे पळून गेला.

तात्पर्य – आपणच तेवढे शहाणे समजून वागल्यास इतरजण तिरस्कार करतात.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज -माणसाच्या डोक्याचं वजन किती असतं?

माणसाच्या डोक्याचं वजन किती असतं? हे तो माणूस किती जाडा किंवा भारदस्त आहे, यावर नाही का अवलंबून असणार, असं आपल्याला वाटेल; पण ते तितकंसं खरं नाही. कारण माणसाचं वजन जेव्हा वाढत जातं तेव्हा ते बहुतांश त्याच्या धडाचं असतं. त्यातही पोटाच्या आसपासच्या भागाचं वजनच जास्त वाढत जातं. पोट, मांड्या, छाती, हात या अवयवांवर चरबीचे थर जमत जातात आणि वजन वाढत जातं. ज्यावेळी अशी स्थूल व्यक्ती व्यायाम आणि मिताहार यांच्या मदतीनं आपलं वजन कमी करते, सडपातळ होते, तेव्हा तिच्या डोक्याच्या आकारात तसाच लक्षणीय फरक पडल्याचं दिसतं का? त्यामुळे प्रौढ व्यक्तीच्या डोक्याचं वजन फारसं वेगवेगळं नसतं, यात शंका नाही. लहान मूल आणि प्रौढ व्यक्ती यांच्या डोक्याचं वजन यांच्यात लक्षणीय फरक आढळून येईल, कारण त्या मुलाची संपूर्ण वाढ झालेली नसते. त्याच्या सगळ्याच शरीराची प्रमाणबद्ध वाढ होते. त्यामुळे डोक्याचा आकार आणि त्याचं वजनही वाढत जातं. तरीही नुसत्याच डोक्याचं वजन कसं करायचं? असा प्रश्‍न तुमच्यासमोर उभा राहील. कारण, धडापासून फक्त डोकं अलग करून त्याचं वजन कसं करायचं? फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात गिलोटीननं शिरच्छेद करण्यात येत असे. त्या वेळी अशा धडापासून अलग होऊन पडलेल्या डोक्यांचं वजन केलं गेलं असतं तर कदाचित त्याविषयीची अचूक माहिती देण्याचं श्रेय त्या राज्यक्रांतीच्या प्रणेत्यांना देता आलं असतं.

आता ते द्यायला हवं ‘न्यू सायंटिस्ट’ या नियतकालिकाच्या संपादकवर्गाला, कारण त्यांनी डोक्याचं वजन टक्कल पडलेल्या एकाची या प्रयोगासाठी निवड केली. त्यानंतर त्यांनी एक बादली पाण्यानं काठोकाठ भरली. त्या पाण्याचं तापमान जवळजवळ शून्य अंश सेल्सिअस असेल; पण तरीही ते पाणी गोठलेलं नसेल, याची खातरजमा करून घेतली. ती बादली त्यांनी एका भल्या मोठ्या परातीत ठेवली. त्यानंतर त्या सहकार्‍याचं डोकं उलटं धरून हनुवटीपर्यंत पुरतं बुडेल अशी व्यवस्था केली. त्या सहकार्‍याला आपला श्‍वास रोखून धरायला सांगण्यात आलं होतं. त्याचं डोकं पाण्यात बुडल्याबरोबर त्या डोक्याच्या आकारमानाइतकं बादलीतलं पाणी बाजूला सारलं गेलं. हे आर्किमिडीजच्या तत्वानुसारच होतं. बादलीतून बाहेर पडलेलं पाणी परातीत साठवल्यामुळे ते गोळा करून त्याचं आकारमान मोजलं गेलं. ते त्या डोक्याच्या आकारमानाइतकं असल्यानं त्याचं मोजमाप मिळालं. आता डोक्यात कवटीचा भाग सोडल्यास मुख्यत्वे मेंदुसारखा मऊ अवयवच असतो. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे डोक्याची घनताही शून्य अंश सेल्सियस इतकं तापमान असलेल्या पाण्याइतकीच असावी, हे गृहीत धरून त्यांनी डोक्याचं वजन गणितानं शोधून काढलं. ते 4.25 किलोग्रॅम भरलं.

हसा आणि शतायुषी व्हा!

‘तुम्ही ज्या वकिलाला तुमची जागा भाड्याने दिलीत तो कसा आहे?’

‘फारच हुशार आहे. माझ्या इस्टेटीबाबतच्या सर्व केसेस तोच लढला.’

‘जिंकला का पण?’

‘हो सर्व केसेस जिंकला. आता सर्व इस्टेटीचा तोच मालक आहे व आम्ही भाडेकरू.

सौंदर्य

पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर फायदेशीर ठरते. यासाठी चहाच्याचोथ्याने पांढरे झालेले केस धुवावेत.