हसा आणि शतायुषी व्हा!

आई – अरे राजू, आज उपवास आहे मी तुला साबुदाने आणायला सांगितले होते आणलेस का?

राजू – आई, तूच म्हणाली होतीस ना की, उपवासाच्या दिवशी साबुदाने चालतात!

म्हणून मी साबुदाने रस्त्यातच ठेउन आलो. आता ते मागुन चालत येतील.

सौंदर्य

रात्री झोपण्यापूर्वी केसांना मसाज करू शकता. असे केल्याने तुमचा दिवसभराचा थकवा जाईल आणि तुम्ही गाढ झोपू शकाल. गाढ झोपेमुळे तुमची त्वचा चमकू लागते.

सल्ला

जेवण बनवताना पश्चिम दिशेला चेहरा असू नये

जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी

काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते. ती त्यांच्या घरात साठत जातात. वास्तुमध्ये हे फारच चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रांवर धूळ आणि माती जमा होते. आणि त्यामुळे तिथे कीटकांच्या उत्पत्तिची भीती असते. या सर्व गोष्टींमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीस बाधा येते.

गुजराथी हांडवा

साहित्य – 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1/2 वाटी चणा डाळ, 2 चमचे मेथी दाणे, 1/4 वाटी दही, 1 वाटी किसलीली दुधी, 1/4 वाटी चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे आले- लसूण्-मिरच पेस्ट, कडीपत्ता, मीठ, 3 चमचे साखर, 1/4 चमचा हळद, 1/2 चमचा मीरपूड, 1/2 चमचा तीखट, 3 चमचे तीळ, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जीरे, 1/4 चमच हिंग, 1 चिमूट सोडा.

कृती – तांदूळ-डाळी-मेथी दाणे 5 ते 6 तास भिजवून, धुवून वाटून घेणे. त्यात दही टाकून किमान 8 ते 10 तास मिश्रण फरमेंट करणे. त्यानंतर त्यात दुधि, कोथिंबीर, मीठ, साखर, मीरपूड, आले-लसूण- मिरची पेस्ट घालून व्यवस्थित हलवून घेणे. 1 चमचा तेल गरम करून मोहरी, जीरे, कडिपत्ता, हळद, हिंग, दीड चमचा तीळ, तिख़ट टाकुन फोडणी करणे व ती तयार मिश्रणात घालणे.चिमूटभर सोडा टाकून हलवणे. हे मिश्रण आता हांडवा करण्यास तयार. नॉनस्टिक कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात थोडे तीळ घालावेत व त्यावर लगेच 3 डाव मिश्रण ओतुन कढईवर झाकण ठेवावे. कढई छोट्या गॅसवर ठेवावी व 8 ते 10 मिनीटाने हांडव्याची खालची बाजू गोल्डन ब्राऊन रंगावर क्रिस्पी भाजून घ्यावी. नंतर हळूवारपणे चमच्याने हांडवा उलटवून दुसरी बाजू परत 7/8 मिनीटे भाजून घ्यावी. थोडेसे गार झाल्यावर त्याचे स्क्वेअर तुकडे करणे.

सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी फायदेशीर असतो, दररोज सकाळी तुम्ही न्याहारी करा, पण हेही महत्त्वाचे आहे की, तुम्ही न्याहारी काय करीत आहात. त्यामध्ये तुम्ही निरोगी गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे, सकाळी नऊ वाजेपर्यंत तुमची न्याहारी झालेली असावी. कारण नंतर आपली जेवणाची वेळ होते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही अंड्यांचा, प्रोटीन शेक, दूध, ओमेलेट, भिजलेले काळधान्यं, कोंब आलेली मोट, फ्रेश फ्रूट इ. चा समावेश करू शकता.

ओझेमुक्तीचे चार टप्पे

प्रत्येकालाच स्वत:चे आणि हक्काचे घर हवे असते. परंतु त्यासाठी मोठी रक्कम असणे गरजेचे आहे. आता बँकेच्या गृहकर्जाच्या मदतीने घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो. मध्यंतरी कोरोना काळात व्याजदरात मोठी घसरण पाहवयास मिळाली आणि हा व्याजदर 6.5 टक्क्यांपर्यंत पोचला. मात्र गेल्या दीड वर्षात सुमारे तीन टक्के वाढ झाल्याने व्याजदर 9 टक्क्यांपर्यंत पेाचला आहे. म्हणजे एप्रिल 2022 मध्ये वीस वर्षांसाठी 6.6 टक्के व्याजदराने घेतलेले गृहकर्ज आता 30 ते 31 वर्षांपर्यंत फेडावे लागणार आहे. या कालावधीत कपात करायची असेल तर प्रीपेमेंटचा पर्याय गृहकर्जादाराकडे राहतो. गृहकर्जाचे प्री पेमेंट करण्यासाठी चार टप्प्यांचा अंगीकार करावा. एक तर प्रीपेमेंट सुरवातीच्या टप्प्यातच केले तर व्याजदराचा बोजा हा बर्‍यापैकी कमी राहतो.

पहिला टप्पा

गृहकर्जासाठी अर्ज – गृहकर्ज दीर्घकाळासाठी असून ते किमान दहा वर्ष तर कमाल 25 ते 30 वर्षांपर्यंत राहते. प्रामुख्याने कर्जाचा कालावधी गृहकर्जदाराच्या वयावर अवलंबून असतो. गृहकर्जाच्या पहिल्या टप्प्यात योग्य कालावधी आणि योग्य बँकेची निवड ही महत्त्वाची राहते. गृहकर्जदार हा दीर्घकाळाचा पर्याय निवडून हप्ता कमी ठेवतो. त्याचवेळी कर्जफेडीचा कालावधी अधिक असेल  तर व्याजही बर्‍यापैकी जाते. शक्य असल्यास कमीत कमी कालावधी ठेवण्याचा प्रयत्न करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाउन पेमेंट अधिक करणे. तुम्ही 50 लाखांचे कर्ज 8 टक्के व्याजदराने 20 वर्षासाठी घेत असाल आणि त्यात पाच लाख रुपयांचे डाउनपेमेंट वाढविले तर संपूर्ण कालावधीत 6 लाख रुपयांची बचत करु शकता. गृहकर्जाचे व्याजदर अनेक घटकांवर अवलंबून आहे आणि प्रत्येक बँक किंवा आर्थिक संस्था स्वत:च्या धोरणानुसार व्याज आकारणी करत असतात. आजघडीला 40 हून अधिक बँका ग्राहकांना परवडेल अशा व्याजदरात गृहकर्ज देत आहेत. यशिवाय आणखी काही सुविधा देखील देऊ शकतात.

दुसरा टप्पा

20 टक्के कालावधी पूर्ण होणे – गृहकर्ज घेऊन वीस टक्क्याचा कालावधी पूर्ण झाला असेल म्हणजे दोन तीन वर्ष झाले असतील तर हप्त्यातून अजूनही 60 ते 70 टक्के रक्कम ही व्याजातच जात असते. अशावेळी प्रीपेमेंट करणे हा अतिशय चांगला निर्णय ठरू शकतो. नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त मिळणारा पैसा, बोनस, लाभांश आदी रक्कम ही थेट कर्जाच्या मूळ रक्कमेत भरू शकता. यामुळे कालावधी कमी होतो आणि हप्त्याच्या रक्कमेतही बदल होत नाही. अशा रितीने व्याजारुपी बाहेर जाणारा पैसा वाचू शकतो. वेतनात दरवर्षी चांगली वाढ होत असेल तर हप्त्याच्या रक्कमेत वाढ करायला हवी. उदा. हप्त्यात पाच हजार रुपयांनी वाढ केली आणि 40 लाखांचे गृहकर्ज 7.5 टक्के दराने 20 वर्षासाठी घेतलेले असेल तर हप्ता वाढीनंतर आठ लाखांची बचत होते आणि सात वर्ष अगोदरच कर्जमुक्त होऊ शकतो. कर्ज घेऊन पाच वर्ष झाले असतील आणि अन्य बँका कमी व्याजाची ऑफर देत असतील तर विद्यमान बँकेशी चर्चा करून कर्ज स्थानांतरित करु शकता. आणखी काही फायदे पदरात पाडून बँक बदलू शकता. गृहकर्जात सुधारणा करताना बँकांचे प्रक्रिया शुल्क आणि अन्य शुल्कांचे आकलन करावे. यानुसार कर्जाची बँक बदलायची की नाही याचा निर्णय घ्यावा. या बदलामुळे रक्कमेत किती फरक पडतो, याची आकडेमोड करावी.

तिसरा टप्पा

50 टक्के कालावधी पूर्ण होणे कर्जाचा निम्मा कालावधी झाल्यानंतर हप्त्यातील मूळ रक्कमेत वाढ होऊ लागते आणि ती 60 ते 70 टक्क्यांपर्यंत पोचते. अशावेळी व्याजाची रक्कम ही 30 ते 40 टक्क्यांपर्यंत खाली येते. या टप्प्यात प्रीपेमेंट करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या अन्य पर्यायावर विचार करण्याची गरज आहे. गृहकर्जापोटी देत असलेल्या व्याजावर करसवलतीचा दावा करत असाल तर अशावेळी गुंतवणुकीला झुकते माप द्यावे. तीस टक्क्यांच्या स्लॅबमधील कर्जदार 9 टक्के व्याजाने कर्ज फेडत असेल आणि त्यावर करवसलत मिळत तो व्याजदर 6.2 टक्केच इतका राहतो. हा व्याजदर कॉर्पोरेट फिक्स बॉंडच्या व्याजदराएवढाच राहतो. या टप्प्यावर मार्केट लिंक्ड गुंतवणुकीचा देखील विचार करू शकता. जोखीम उचलण्याची तयारी असेल तर म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणकीचा विचार करायला हवा. प्रीपेेमेटपेक्षा हा पर्याय चांगला ठरू शकतो.

चौथा टप्पा

80 टक्के कालावधी पूर्ण या टप्प्यात हप्त्यातील मोठी रक्कम ही मुद्दलातच जात असल्याने प्रीपेमेंटला फारसा अर्थ राहत नाही. अशावेळी अतिरिक्त रक्कम ही प्रीपेमेंटसाठी अजिबात वापरू नये आणि त्यापेक्षा चांगल्या गुंतवणूक योजनेत पैसा वळवावा. नवीन खरेदीची योजना असेल, तणावमुक्त राहायचे असेल किंवा लवकर कर्ज फेडीची मनीषा असेल तर या टप्प्यांवर संपूर्ण रक्कम भरून कर्जमुक्त होऊ शकता.

80 टीटीबीची सवलत कशी मिळते?

कराचे नियोजन हे आर्थिक ध्येय गाठण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या नियोजनाच्या आधारे करसवलत मिळवता येते आणि संपत्ती कशी वाढवता येईल, यादृष्टीनेही उपाययोजना करता येते. नोकरदार असो किंवा निवृत्त कर्मचारी किंवा उद्योजक सर्वांनाच कराबाबत सजग राहावे लागते. त्याचवेळी निवृत्त कर्मचार्‍यांना देखील कराचे नियोजन गरजेचे आहे. कारण ठराविक काळानंतर वैद्यकीय खर्च हा आवाक्याबाहेर राहू शकतो. 1961 च्या प्राप्तीकर कायद्यात अनेक तरतुदी असून ते ज्येष्ठांना पैसे वाचविण्यासाठी मदत करतात.

कलम 80 टीटीबी – कलम 80 टीटीबी हे ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष तरतूद असून त्यानुसार 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींना 50 हजारांपर्यंत करसवलतीचा दावा करता येतो. 80 टीटीबीची कपात ही त्यांना कर वाचविणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची संधी देते. ज्येष्ठ नागरिकांना बँक, पोस्ट ऑफिससह अन्य आर्थिक साधनातील गुंतवणूकीतून व्याज मिळते. ंयावर ज्येष्ठ नागरिक कर कपातीचा दावा करु शकतात.

व्याज कोठून मिळते?

बँकेच्या ठेवी, आवर्ती ठेव योजना आणि बचत खाते.

पोस्टातील विविध गुंतवणूक योजना.

बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करणार्‍या सहकारी बँकांतील गुंतवणूक

80 टीटीबीच्या मर्यादा – कलम 80 टीटीबी हे प्रामुख्याने व्याजातून मिळणार्‍या उत्पन्नावर करसवलतीचा दावा करण्याची मूभा देते. बँकांचे बचत खाते, मुदत ठेवी, रिकरिंग खाते, तसेच सहकारी बँक आणि पोस्टातील बचत खाते, बचत योजना जसे की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना आदींपासून मिळणारे व्याज हे करसवलतीस पात्र ठरते. परंतु कंपनीच्या मुदत ठेवीवर मिळणार्‍या व्याजावर सवलत पात्र नसते.

कलम 80 टीटीए म्हणजे काय – कलम 80 टीटीबीच्या 80 टीटीए तरतुदीनुसार ज्येष्ठ नागरिकांना समान कपातीचा लाभ मिळतो. अर्थात ही करसवलत केवळ व्यक्तिगत करदाता किंवा एक हिंदू संयुक्त कुटुंब (एचयूएफ) च्या एकुण उत्पन्नातील बँक, सहकारी बँक आणि पोस्टातील गुंतवणुक योजनातून मिळणार्‍या व्याजावर दहा हजारांपर्यंत करसवलतीची मूभा देते. आता 80 टीटीबी नुसार कपात म्हणजे 50 हजारापर्यंत करसवलत मिळते. याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी करपात्र उत्पन्न 3 लाख 5 हजार रुपये होईल तर बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी करपात्र उत्पन्न हे 3,50,000 रुपये आहे. यात कलम 80 टीटीए नुसार संपूर्ण कपात झाल्यानंतर आणखी 5 हजार रुपयांची कपात झालेली असते. बिगर ज्येष्ठ नागरिक हा कलम 80 टीटीएनुसार कपातीस पात्र नाही. कारण हे कलम ज्येष्ठांसाठीच सादर करण्यात आलेले आहे.

आयटीआरमध्ये दावा करता येतो? आयटीआर भरताना ज्येष्ठ नागरिक कलम 80 टीटीबीनुसार कर सवलतीचा दावा करू शकतात. परंतु अन्य स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या कॉलमात व्याजापोटी मिळणार्‍या उत्पन्नाचा समावेश करायला हवा आणि नंतरच कलम 80 टीटीबीनुसार कपातीचा दावा करता येतो.

कर कपातीचे आकलन कसे करावे?

बचत व्याज: 5 हजार

मुदत ठेवीवरील व्याज: 2 लाख

अन्य उत्पन्न: दीड लाख रुपये

यानुसार एकूण उत्पन्न: 3,55,000

परदेश दौर्‍यावर जाणार आहात?

येत्या काही महिन्यांत विशेेषत: ऑक्टोबरनंतर परदेशात जाण्याचे नियोजन करत असाल तर वीस टक्क्यांपर्यंत टीसीएस भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ 1 जुलैपासून लागू होणार होती. पण तीन महिन्यासांठी ही वाढ पुढे ढकलली. सध्यातरी पर्यटकांना, नागरिकांना दिलासा मिळाला असून टीसीएस पाच टक्के दराने भरावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांतील परदेशातील बुकिंग करताना टीसीएसशी संबंधित नियमांची माहिती ट्रॅव्हल एजंट किंवा कोणत्याही चार्टर्ड अकाउंट्सकडून घेऊ शकता.

कोण करेल कपात ?- ऑक्टोबरनंतर आपण एखाद्या टूर ऑपरेटबरोबर परदेशात जाण्याची तयारी करत असाल तर हा ऑपरेटर आपल्याकडून टीसीएस कापून घेईल. उदा. ब्रिटनला जायचे असेल आणि यासाठी ऑनलाइन ट्रॅव्हल संकेतस्थळ किंवा कार्यालयात पाच लाख रुपयांची बुकिंग करत असाल तर ट्रॅव्हल कंपनी 20 टक्के टीसीएस वसूल करेल. म्हणजे या पॅकेजचा खर्च हा सहा लाख रुपये होईल. टीसीएसची रक्कम ही पॅकेज बुकिंगच्या वेळी भरावी लागेल.

रिफंडसाठी दावा – परदेश दौर्‍यादरम्यान आगाऊन आणि अधिक टीसीएस भरणारा व्यक्ती हा प्राप्तीकर विवरण भरताना रिफंडचा दावा करु शकतो. जोपर्यंत क्लेम केला जात नाही, तोेपर्यंत ही रक्कम लॉक राहते.

एजन्सीच्या बुकिंगवर कर आपण विविध प्रवासी कंपन्यांच्या संकेतस्थळावर टूर पॅकेज घेत असाल तर या कंपन्या आपल्याकडून टीसीएस वसुल करतील आणि तो त्यांचा अधिकार आहे. कारण जेव्हा परदेश टूर पॅकेजचा मुद्दा येतो तेव्हा टीसीएस गोळा करण्याची जबादारी ही ट्रॅव्हल एजन्सीवरच राहते.

कमी खर्चात फायदा नव्या नियमानुसार एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे जर परदेश दौर्‍यावर आपला संपूर्ण खर्च सात लाखांपेक्षा अधिक होत असेल तर वीस टक्के दराने टीसीएस भरावा लागेल. अन्यथा पाच टक्के जुन्या दरानेच टीसीएस कपात केली जाईल. म्हणूनच संपूर्ण प्रवासादरम्यान आपला खर्च हा आंतरराष्ट्रीय डेबिट आणि क्रेडिट कार्डने करावा आणि तो खर्च सात लाखांपेक्षा कमी ठेवावा. परिणामी अधिक टीसीएस देण्यापासून आपला बचाव होईल. शिवाय एखादा व्यक्ती ब्रिटनचा दौरा करत असेल आणि तो तेथे राहण्यासाठी थेट हॉटेलशी संपर्क करून रुम बुक करत असेल तर ब्रिटनचे हॉटेल टीसीएस कपात करणार नाही. मात्र ट्रॅव्हल एजंटने हॉटेल बुक केल्यास तो कपात करु शकतो. याप्रमाणे परदेशी एअरलाइन्स संकेतस्थळावर थेट तिकीट खरेदी केल्यानंतरही टीसीएस आकारला जाणार नाही. या मार्गाने आपण टीसीएस वाचवू शकता, मात्र प्राप्तीकर विभाग हा आपल्याला या खर्चाची माहिती मागवू शकते.

परदेशातील चलनावर कर – परदेश दौर्‍याच्या बुकिंगवरच नाही तर अन्य अधिकृत डिलरकडून परकीय चलन खरेदी केल्यानंतर टीसीएसची कपात केली जाईल. तसेच परदेशात खर्च करण्यासाठी फॉरेक्स कार्डसाठी काही रक्कम आपण बँकेत जमा करतो. त्यावेळी ती रक्कम देखील 20 टक्के टीसीएसच्या कक्षेत येते. अर्थात हे नवीन बदल ऑक्टोबरपासून लागू होणार असून तूर्त तीन महिने तरी जुन्याच पद्धतीची कर आकारणी केली जाणार आहे.

आरोग्य आणि शिक्षणासाठी सवलत – एखादा व्यक्ती गंभीर आजारावरील उपचारासाठी परदेशात जात असेल तर आणि त्याने कागदपत्रे जोडली तर त्यास 20 टक्के टीसीएसच्या व्यवस्थेतून सवलत मिळेल. मग त्याचा खर्च सात लाखांपेक्षा अधिक झालेला असेल तरीही सवलत मिळेल. याशिवाय परदेशात शिक्षण घेणार्‍या मुलांना देखील या नवीन व्यवस्थेतून सवलत देण्यात आली आहे.

 

चित्रपट विम्याच्या अंतरंगात…

आजच्या अनिश्‍चिततेच्या काळात विमा ही एक अत्यावश्यक बाब बनली आहे. मग तो व्यक्तीचा विमा असो किंवा वाहन विमा असो. घर, कर्ज, कार्पोरेट कंपन्या आदीना विमा संरक्षण दिले जात आहे. एवढेच नाही तर विमान, बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांंचाही विमा उतरवला जात आहे. जेणेकरून दुर्दैवाने अपघात झाल्यास संबंधितांच्या नातेवाईकांना भरपाई मिळू शकेल. अशा स्थितीत अब्जावधींची उलाढाल असलेला चित्रपट उद्योग अपवाद कसा राहिल?

पूर्वी चित्रपट निर्मिती करताना विमा उतरवला जात नव्हता किंवा त्याची पद्धतही रुढ नव्हती. परंतु आजकालचे चित्रपट निर्मितीचे वाढलेले बजेट पाहता विमा उतरवणे ही निर्मात्यांसाठी गरजेची बाब बनलेली आहे. काही वर्षांपूर्वी टिपू सुलतान मालिकेची शुटिंग सुरू असताना सेटला अचानक आग लागली. त्यात निर्माते संजय खान यांचे कोट्यवधीचे रनुकसान झाले होते. अशा प्रकारच्या घटना नेहमीच होतील असे नाही, परंतु झाल्यास त्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी विम्याकडे निर्मात्याचा कल वाढला आहे. अप्रिय घटनांपासून होणारे नुकसान भरून येण्यासाठी विमा उतरवण्याचा आग्रह केला जात आहे. अनिल कपूर आणि ऐश्‍वर्या रॉय यांच्य ताल चित्रपटापासून भारतात चित्रपटांचा विमा उतरवण्याची प्रथा सुरू झाली. मात्र त्यानंतर दोन दशकाच्या कालखंडानंतर बाहुबली-2 चित्रपटाने विमा उतरवल्याचे निदर्शनास आले आहे. या चित्रपटाचा 200 कोटींचा विमा उतरवण्यात आला होता.

चित्रपट विमा हा चित्रपट निर्मितीशी झालेल्या नुकसानीसाठी कंपनीकडे कायदेशीर दावा करू शकतो. चित्रपट तयार करताना अनेक प्रकारची जोखीम पत्करावी लागते. शुटिंग सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत निर्मात्याचा जीव टांगणीला लागलेला असतो. इनडोअर-आउटडोअर शुटिंग व्यवस्थित पार पडेपर्यंत निर्मात्याच्या जीवात जीव नसतो. परदेशात शुटिंग करणे ही निर्मात्यासाठी सर्वाधिक जोखीम मानली जाते. कारण त्याठिकाणी करण्यात आलेली गुंतवणूक ही कोट्यवधीच्या घरात असते. अशा प्रकारच्या विम्याच्या हप्त्याची रक्कम ही कंपनीवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. चित्रपटविम्याच्या संरक्षण कवचामध्ये कोणतकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव करायचा, यावर हप्त्याची रक्कम निश्‍चित होते. चित्रपटाच्या निर्मितीचा कालावधी किमान सहा महिने असतो. निर्मितीस्थळ हे एकाच ठिकाणी नसल्याने विविध शहरात, देशात शुटिंग केली जाते. यादरम्यान कधी कधी अप्रिय घटना होऊ शकतात. कलाकारांना दुखापत, सेटची हानी, शुटिंगच्या सामानाची ने आण करणार्‍या वाहनांचा अपघात, निर्मितीला चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या कर्मचार्‍यांचे संरक्षण आदींचा त्यात समावेश होतो.

कलाकारांचा विमा – चित्रपटात असंख्य पात्र काम करत असतात. मुख्य नायक, खलनायक, सहकलाकार, सहयोगी कलाकार आदी काम करत असतात. अशा स्थितीत एखाद्या कलाकाराचा अपघाती मृत्यू, शारिरीक इजा किंवा अपघात, गंभीर आजारपण उदभवल्यास विमा संरक्षणामुळे योग्य मोबदला मिळतो. शुटिंग सुरू असताना मग ती देशात असो किंवा परदेशात असो एखादी प्रॉपर्टी, सेट, वॉर्डरोब आणि साहित्याची हानी झाल्यास किंवा खराब झाल्यास विम्यातून भरपाई मिळू शकते. ङ्गिल्म निगेटिव्ह ः चित्रपटाची चित्रङ्गित किंवा साहित्याची हानी झाल्यास विमा संरक्षणामुळे त्याचा मोबदला चित्रपट निर्मिती करणार्‍या कंपनीला मिळतो.

निर्मितीनंतरचे संरक्षण – चित्रपटाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर चित्रङ्गित खराब झाल्यास किंवा हरवल्यास विमासंरक्षण मिळते. जोपर्यंत विम्याचा कालावधी असेल, तोपर्यंत निर्मात्याला विम्याचा लाभ मिळतो. अपघात, दुर्घटना, अपंगत्व: विम्याचा कालावधी असेपर्यंत शुटिंगदरम्यान अपघाती मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, जखमी यासारख्या घटना घडल्यास संबंधितांना नियमानुसार भरपाई मिळते.