सल्ला

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही पपईचे छोटे छोटे तुकडे खाऊ शकता किंवा पपई, अननस आणि लिंबूचा रस मिक्स करुन तुम्ही त्याची स्मुदी बनवून पिऊ शकता.

जुन्या कुलूपासंबंधी नियम

वास्तू विज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जे लॉक वापरात येत नाहीत किंवा खराब झाले आहे, त्या त्वरित काढल्या पाहिजेत. असं म्हणतात की खराब कुलूप नशीबसुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि या सोबत प्रगतीचा मार्ग देखील बंद होतो.

फुटाण्याच्या डाळ्याची चटणी

साहित्य – फुटाण्याची डाळ पाव किलो, सुक्के खोबरे 150 ग्रॅम, मिरी 15 मिरीचे दाणे, तिखट 4 चमच, हिंग 2 चमचे, तुप पाव वाटी, गुळ 1 छोट्या लिंबाच्या आकाराचा खडा, मिठ चवी प्रमाणे साधारण 1 चमचा

कृती – प्रथम फुटाण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटुन पुड करुन घ्यावी. 2 चमचे तुप तव्यावर घेऊन त्या वर मिरी भाजावी. नंतर मिरी काढून तुपावर सुक्या खोबर्‍याच्या कातळ्या करुन खरपूस सोनेरी रंग येई पर्यंत भाजाव्यात. गॅस बंद करुन त्याच तापलेल्या तुपा वर हिंग भाजावा मग थोडा तवा गार झाल्यावर त्यावरच मीठ-तिखट टाकावे आणि परतावे. त्यानंतर खोबरे, मिरी, हिंग, तिखट, गुळ चिंच, मिठ मिक्सरला वाटुन घ्यावे व हे मिश्रण डाळीच्या पुडीमध्ये टाकावे. नंतर हे दोन्ही एकत्र करुन परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावे. त्यानंतर हे सगळे एका भांड्यात काढून त्यामध्ये उरलेले तुप हाताने मिक्स करावे.

…तर द्याल वृद्धत्वाला आमंत्रण

दीर्घकाळ बसून राहणं वृद्धत्वाला आमंत्रण देऊ शकतं, असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. ऑफिसमध्ये काम करताना आपण किती वेळ बसून राहतो हे मोजता येणं अशक्य आहे. बसून काम करताना प्रत्येक तीस मिनिटांनी उभं राहून शरीराची हालचाल केल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असं कोलंबिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ नमूद करतात.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- उच्च रक्तदाब म्हणजे काय?

तुमच्या घरी आजी-आजोबा, काका-मामा व कोणा ओळखीच्यांना तरी रक्तदाबाचा त्रास असणारच. बरेचदा लोक ब्लडप्रेशरचा त्रास आहे असे सांगतात. यातून रक्तदाब व ब्लडप्रेशर असणे हाच रोग आहे असे तुम्हाला वाटू शकेल! पण ते चुकीचे आहे. हृदय हे विहिरीवर बसवलेल्या पंपासारखे कार्य करते. सारखे आकुंचन-प्रसरण पावून हृदय दाबाखाली रक्त सर्व शरीरभर पोहोचवते. रक्त दाबाखाली पाठवले जाते म्हणूनच झोपल्यावर, बसल्यावर, उभे राहिल्यानंतर वा खाली डोके-वर पाय असे राहिले तरी शरीराच्या सर्व भागात ते पोहोचू शकते. या दाबालाच रक्तदाब असे म्हणतात. हा रक्तदाब मोजताना तबकडीसारख्या वा पार्‍याच्या यंत्राने मोजतात. सर्वसामान्यतः निरोगी प्रौढ माणसाचा रक्तदाब 120-80 इतका असतो. (तो पार्‍याचे मिमी. असा सांगितला जातो) यातील 120 म्हणजे हृदय आकुंचित असतानाच दाब (सिस्टोलिक) व 80 म्हणजे हृदय प्रसरण पावलेले असतानाच (डायस्टोलिक) दाब होय. सिस्टोलिक रक्तदाब 160 च्या वर किंवा डायस्टोलिक रक्तदाब 95 च्यावर असल्यास त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात. भारतात 20 ते 60 वर्षाच्या वयोगटात शहरी भागात 7% पुरुषांना व 6% स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. वाढत्या वयाबरोबर रक्तदाब हळूहळू वाढतो. आनुवंशिकता हेही उच्च रक्तदाबामागील कारण असू शकते. लठ्ठ व्यक्ती, जास्त मीठ (दिवसाला 7 ते 8 ग्रॅमहून जास्त) खाणार्‍या व्यक्ती, आहारात जास्त तूप खाणारे, मद्यपान करणारे, व्यायाम न करणारे व मानसिक ताणतणाव असलेले अशा सर्वांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता इतरांहून जास्त असते. मूत्रपिंड व इतर इंद्रियाच्या आजारामुळेही उच्च रक्तदाब होऊ शकतो.

सतत डोके दुखणे, हातापायाला कंप सुटणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे, हातापायांची जळजळ होणे, छातीत दुखणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. अशा व्यक्तींनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीला मीठ कमी करणे, मद्यपान सोडणे, आहारातील मेदपदार्थ कमी करणे व योगाद्वारे चित्तशांती या उपायांनी वा काम्पोजसारख्या गोळ्यांनी रक्तदाब आटोक्यात येऊ शकतो. पण रक्तदाब जास्त असेल, तर रक्तदाब कमी होण्याच्या गोळ्या घ्याव्याच लागतात. सामान्यतः ही औषधे नंतर आयुष्यभर घ्यावी लागतात. रुग्णाने स्वतः च्या मनाने डोस कमी करू नये व गोळ्या बदलू किंवा बंद करू नयेत. अन्यथा मेंदूतील रक्तस्राव, अर्धांगवायूचा झटका अशा भयंकर परिणामांना त्याला सामोरे जावे लागते. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारविहारात सुयोग्य बदल व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन घेतलेली औषधे याखेरीज इतर कोणताही उपाय करायची गरज नसते. असे केल्यास आयुष्यभर तो नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाबाचे निदान लवकर झाल्यास तात्काळ उपचार सुरू होतात व नंतरचे दुष्परिणाम होत नाहीत. यासाठी चाळीशीत प्रवेश केलेल्या सर्वच व्यक्तींनी रक्तदाब तपासून घ्यावा. दुसरे म्हणजे रुग्णांनी स्वतः च्या रक्तदाबाच्या नोंदी व उपचाराची माहिती एका डायरीत व्यवस्थित लिहून ठेवावी, म्हणजे पुढील उपचारात त्याचा फायदा होतो.

हसा आणि शतायुषी व्हा!

बाळोबांचा मुलगा अतिशय ढ होता.

एस. एस. सी. ला बरेच वेळा गोते खाल्ल्यावर शेवटी तो कसाबसा पास झाला.

आता तो बी.ए.ला आठव्यांदा बसत होता.

बाळोबाला त्याच्या मित्रांनी विचारले,

‘तुझा मुलगा बी.ए. झाल्यावर कोण होणार?’

‘म्हातारा’ बाळोबा म्हणाले.

सल्ला

वास्तूनुसार जिना चढण्यासाठी दक्षिण- पश्चिम ही सर्वोत्तम दिशा आहे. साधारणत: याच दिशेला जिना असावा.

सुदर्शन क्रिया

योग्य प्रकारे श्वासोश्वास केल्याने चेहर्‍यावरील पिटिका व ठिपके नाहीसे होतात? हो, हे खरे आहे! जेंव्हा आपण शांत असतो तेंव्हा ताणतणावाचे बाह्याविष्कार म्हणजे चेहर्‍यावरील पिटिका व ठिपके कमी होतात. सुदर्शन क्रिया, जे एक उत्तम श्वसनाचे तंत्र आहे, साठलेले ताणतणाव शरीर व मनाबाहेर फेकते आणि आपल्याला शांत करते. ज्यामुळे आपल्या प्रकृतीचा समतोल व ताळमेळ राखला जातो.

वास्तू

एका घरातील दरवाजे हे सम संख्येत (2, 4, 6 इ.) असावेत. मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांपेक्षा लांबी-रुंदीला थोडा मोठा असावा तसेच इतर दरवाजांपेक्षा जास्त सुशोभित असावा.

गुड्डे बिस्कीट मोदक

साहित्य : गुड्डे बिस्किट, दुध, रंगीत बॉल्स

कृती – बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्य आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या. त्यामध्ये रंगीत बॉल्स घालून एकत्र करुन घ्या आता हे मिश्रण मोदक साचामध्ये घालून मोदक तयार करुन घ्या. गुड्डे बिस्कीट मोदक तयार आहेत