‘परतीच्या’ दिशेने…?

0
49

गतसप्ताहात इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सने 65 हजारांची आणि निफ्टीने 19,500 ची पातळी ओलांडली. सप्ताहादरम्यान सेन्सेक्सने 65,898.98 आणि निफ्टीने 19,523.60 हे सार्वकालिक उच्चांक प्रस्थापित केले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी सातत्यपूर्ण खरेदी, मान्सूनची अल्पशी का होईना पण समाधानकारक प्रगती आणि नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाही निकालंबाबतची सकारात्मकता यामुळे बाजाराचा मूड आणि गुंतवणूकदारांमधील उत्साह वाढण्यास मदत झाली आहे. तपशिलात पाहिल्यास 27 मार्चच्या आठवड्यापासून सुरू झालेली ‘तेजी एक्सप्रेस’ अव्याहतपणाने धावताना दिसत आहे. निफ्टीने या काळात सुमारे तीन हजार अंकांची झेप घेतली आहे; तर बँक निफ्टीने सुमारे 6000 अंकांची उडी घेतली आहे. वीकली टेक्निकल चार्ट पाहिल्यास या दोन्ही निर्देशांकांमध्ये सव्वा तीन महिन्यात एकही मोठी पडझड झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी बाजारात थोडीशी घसरण दिसून आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरं पहायला मिळाले. वित्त, माहिती तंत्रज्ञान आणि तेल या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये शुक्रवारी गुंतवणूदकारांनी नङ्गावसुलीला प्राधान्य दिले. त्यामुळे सलग आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वृद्धीला ब्रेक लागला.शुक्रवारच्या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन शेअर बाजारातील घसरण आणि त्यामुळे हॉंगकॉंग, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारात झालेली पडझड हे होते. अमेरिकेतील बॉंड मार्केटमधील परतावा कमी आल्यामुळे तेथील बाजारात घसरण झाली. जागतिक बाजारांचे लक्ष सध्या अमेरिकन बॉंड यिल्डवर आहे. यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे ङ्गेडरल रिझर्व्हकडून नजिकच्या भविष्यात व्याजदरात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता बळावली आहे. रोजगार बाजार स्थिर राहिल्याने मंदीला अटकाव होणार असला तरी ङ्गेडची दरवाढ अटळ दिसत आहे. तसे झाल्यास त्याचा ङ्गटका भारतीय बाजारातील विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीला बसू शकतो. या भीतीने भारतीय बाजारात घसरण दिसून आली आहे. तथापि, ही नङ्गावसुली असल्याचे सध्या तरी दिसत आहे. सलग काही आठवडे एकसलग तेजी राहिल्यानंतर अशा प्रकारची नङ्गावसुली अपरिहार्यही असते आणि गरजेचीही असते. ती चालू आठवड्यातही कायम राहते का हे पहावे लागेल. गतसप्ताहात एङ्गआयआयनी 20361.75 कोटींच्या समभागांची खरेदी केली; तर डीआयाआयकडून 1564.60 कोटींच्या समभागांची विक्री करण्यात आली. टेक्निकल चार्ट पाहिल्यास बँक निफ्टी आणि निफ्टीच्या वीकली चार्टवर घसरणीची सुरवात होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीसाठी सर्वांत पहिला अडथळा 19375, 19400 या पातळीवर आहे. तो पार करून 19,511 च्या पुढे निफ्टी स्थिरावला तर 19700 पर्यंत झेपावू शकतो. याउलट 19300 च्या खाली घसरल्यास 19200 ते 19100 पर्यंत खाली येऊ शकतो. बँक निफ्टीसाठी 45000 ही आधार पातळी असेल. त्याखाली घसरल्यास 44300 ते 44200 पर्यंत घसरण दिसू शकते. याउलट 45 हजारांवर स्थिरावल्यास 45500 ते 45700 पर्यंत बँक निफ्टी वधारू शकतो. चालू आठवड्यापासून नव्या आर्थिक वर्षातील तिमाही निकालांची सुरवात होणार आहे. यामध्ये टीसीएस, एचसीएल टेक्नालॅाजी, विप्रोचे निकाल चालू आठवड्यात जाहीर होतील. त्याचबरोबर किरकोळ महागाईच्या आकड्यांवरही बाजाराची नजर असेल. याखेरीज रिलायन्सने 20 जुलै ही जिओ ङ्गायनान्शियलच्या डीमर्जरची तारीख जाहीर केली आहे. हिंदुस्थान झिंकने 7 रुपये लाभांश जाहीर केला आहे. त्यादृष्टीने या समभागांवर लक्ष ठेवून राहणे आवश्यक आहे. याखेरीज सोभा कंपनीचा समभाग 570 रुपयांच्या आसपास खरेदी करुन 890 रुपये लक्ष्य ठेवता येईल. एनआरबी बेअरींग्जचा समभाग 215 रुपयांना खरेदी करुन 270 लक्ष्य ठेवता येईल. बीईएलचा समभाग 120 रुपयांसमीप खरेदी करुन 126 रुपये लक्ष्य ठेवता येईल. एचयुएलचा समभाग 2690 रुपयांसमीप खरेदी करुन 2780 रुपये लक्ष्य ठेवता येईल. डिव्हिज लॅबचा समभाग 3668 रुपयांना खरेदी करुन 4070 रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल.