आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

0
53

जेवण झाल्यावर लगेचच झोप घेतली, तर शरीरामध्ये विकृत मेदाची वाढ होते. परिणामी वजन वाढते. शांत झोपेमुळे डोळ्याचे स्नायू धरत नाहीत. डोळ्यांना विश्रांती मिळावी म्हणून दर 2-3 तासांनी डोळे मिटून त्यावर दोन्ही हातांनी पाच मिनिटे हलकासा दाब द्यावा व शांत बसावे. तसेच दर पाच तासांनी डोळे थंड पाण्याने धुवावेत. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होऊन शरीर व मन प्रफुल्लीत होते. तारुण्यामध्ये नोकरी-व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी केलेले प्रचंड काम, स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, घरच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी बर्‍याच मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. नोकरी, घर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते.

घरातील वृद्धांच्या जबाबदार्‍या, मुलांचा जन्म, त्यांचे संगोपन, पाहुणचार, सणवार हे सर्व करत असताना चाळिशी कधी येते हे समजतच नाही. सात-आठ पाहुण्यांचा स्वयंपाक अगदी सहज करणार्‍या स्त्रीला चाळिशीमध्ये दोघांचा स्वयंपाक करायलासुद्धा कधी-कधी मनावर दडपण येते. याचाच अर्थ शरीराला थोडी विश्रांती हवी असते. स्वतःला सुपर वुमन न समजता झेपेल तेवढे काम करावे. इतरांबरोबर सतत तुलना, द्वेष, मत्सर व सूड भावना ठेवू नये. अति महत्त्वाकांक्षा व स्पर्धेला बळी पडू नये. यामुळे ताण वाढतो. शरीर व मनाचे संतुलन बिघडते. म्हणून नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी ध्यानधारणा, योगासने, ओंकारासाठी रोज थोडा तरी वेळ द्यावा. कामाचा ताण कमी होण्यासाठी आवडते संगीत ऐकावे. टीव्हीवर एखादी विनोदी मालिका बघावी.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400