वनस्पतींमध्येही असते सोने!

सोन्यासारख्या राजधातूला प्राचीन काळापासून जगभरात महत्त्व आहे. प्लॅटिनमसारखा धातू सोन्यापेक्षाही मौल्यावान असला तरी सोन्याचे राजस सौंदर्य आणि लोकप्रियता त्याला नाही. आतापर्यंत जगभरात माणसाने जितके सोने पृथ्वीपासून मिळवले आहे त्यापेक्षा चारपट अधिक सोने अद्याप मानवापासून दूरच आहे. जमिनीच्या प्रत्येक दहा लाखाच्या हिश्श्यात 0.0025 किलो सोने असते. अगदी वनस्पतींच्या पानांमध्येही सोन्यांचा अंश असतो. युकेलिप्लस नावाच्या वनस्पतीच्या पानांमधील सोन्याचे कण 2013 मध्ये ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी काढून दाखवले होते. सात हजार वर्षांपासून किंवा त्याच्या आधीपासूनच माणूस सोन्याचा वापर करतो आहे, असे मानले जाते. अनेक नद्यांच्या पाण्यातही सोन्याचे कण सापडतात. नद्याच नव्हे तर अनेक वाहते झरेही आपल्या प्रवाहाबरोबर खनिजांमधील सोन्याचे कण वाहून नेत असतात. अनेक लोक चाळणीत असे पाणी घेऊन सोने शोधत असतात. सर्वसाधारणपणे लोकांना 24 कॅरेट सोन्याचे अप्रूप असते. मात्र, तज्ज्ञांच्या मते 22 कॅरेट सोने सर्वात चांगले असते.

तुळशीचीवर नवं संशोधन

वनस्पतींनाही संवेदना असतात हे आपल्या जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध करून दाखवले होते. आता पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी दोन वनस्पती एकमेकांशी ‘बोलू’ शकतात असे म्हटले आहे. याबाबत त्यांनी भारतात सर्वत्र आढळणार्‍या व पवित्र मानल्या जाणार्‍या तुळशीच्या रोपाचे प्रयोग केले आहेत. या झाडाचा शेजारच्या झाडावर प्रभाव पडतो असे त्यांना दिसून आले. दोन्ही झाडे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यात आली तरी हा प्रभाव पडतो हे विशेष. तुळशीला इंग्रजीत ‘बेसील’ असे म्हटले जाते. तुळशीच्या रोपातून काही विशिष्ट घटक बाहेर पडत असतात ज्याचा उपयोग अन्य झाडांच्या वाढीसाठीही होतो. तुळशीची मुळे दीर्घकाळ ओलावा राखून ठेवतात. त्याचाही उपयोग शेजारच्या झाडांना होतो. मोनिका गॅग्लीआनो आणि मायकल रेन्टोन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी तुळशीच्या शेजारी एक मिरचीचे झाड लावले आणि हे झाड व्हॅक्युम बॅरीअरच्या सहाय्याने वेगळेच ठेवले. तरीही या मिरचीच्या झाडाला तुळशीचा शेजार गुणकारी ठरला. झाडांचे सायटोस्केलेटन काही लहरी उत्पन्न करीत असते. या कंपनीद्वारे झाडे एकमेकांशी संवाद साधतात असे या संशोधकांनी म्हटले आहे.

जेलीफिश नव्हे, डिटेक्टीव्ह रोबो!

विज्ञानाने आपल्या चमत्कारांनी नेहमीच माणसाला थक्क केले आहे. क्लोनिंग असो किंवा चालता-बोलता रोबो असो, सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने हे चमत्कारच आहेत. आता अमेरिकेत व्हर्जिनियामधील एका विद्यार्थ्याने रोबो जेली फिश तयार केला आहे. हा मासा समुद्रात हेरगिरी किंवा देखरेखीचे काम करू शकतो. सायरो नावाचा हा जेली फिश समुद्रातील हालचालींवर नजर ठेवेल. तसेच लाटा, समुद्रातील घडामोडी यांबाबतची माहितीही या रोबोकडून मिळू शकते. अमेरिकेतील प्रशासनाने या विद्यार्थ्याला अशा संशोधनाबाबत 50 लाख डॉलर्स दिले आहेत. अमेरिकन नौदलाने यापूर्वीही अशा प्रकारची जेलीफिश तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. गेल्या वर्षी नौदलाकडून जो जेली फिश बनवण्यात आला होता त्याचा आकार तळहाताइका होता. आता या विद्यार्थ्याने बनवलेला जेली फिश पाच फूट सात इंच रुंदीचा असून त्याचे वजन 170 पौंड आहे. सायरोला ऍल्युमिनियमचे आठ हात असून तिचा पृष्ठभाग सफेद रंगाचा व अतिशय लवचिक अशा सिलीकॉनचा आहे. या रोबोचे रूप खर्‍या जेलीफिशसारखेच आहे. त्याच्या आता एक ब्रेन बॉक्स असून तो मेंदूसारखा काम करतो. पाण्यात सोडताना या रोबोचे प्रोग्रामिंग केले जाते. पाण्यात हा रोबो आदेशानुसार काम करतो. या रोबोमधील त्रुटी म्हणजे त्याची निकेल हायड्राईड बॅटरी. ही बॅटरी केवळ चार तासच काम करते!

‘इथे’ तयार होतात विचित्र ढग

ऑस्ट्रेलियातील सक्विन्सलँड प्रांतात कारपेन्ट्रियाच्या खाडीवर एक अनोखे नैसर्गिक घटना घडत असते. या घटनेचे नेमके कारण आजपर्यंत समजू शकलेले नाही. या ठिकाणी सप्टेंबरअखेर ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत लांब नळ्यांच्या आकाराचे ढग तयार होत असतात. त्यांना ‘मॉर्निंग ग्लोरी क्लाऊड’ असे म्हटले जाते. पृथ्वीपासून सुमारे 100 ते 200 मीटर उंचीवर हे ढग बनतात. हे ढग एक हजार किलोमीटर लांबीचे आणि दोन किलोमीटर मा उंचीचे असतात. ग्लायडर्स घेऊनही अनेक पायलट हे ढग पाहण्यासाठी आकाशात भरारी मारतात. हे ढग नेहमी भयानक आवाज करीत येतात. त्यावेळी वारे वेगाने वाहत असतात. जमिनीवर हवेचा दाब वाढतो आणि हे ढग ताशी 60 किलोमीटर वेगाने जाऊ लागतात. या ढगांबरोबर पावसाचे थेंब शिडकावा देतात आणि वीजाही कडाडतात. अमेरिका, इंग्लिश खाडी, जर्मनी, रशियातही काही वेळा असे ढग दिसून आले आहेत. मात्र कारपेन्ट्रियाच्या खाडीवर ते दरवर्षी नियमितपणे दिसून येतात.

 

बांबूचे नूडल्स

बांबूचा उपयोग इमारत बांधण्यासाठी तसेच कागद बनवण्यासारख्या अन्य कामांसाठी होतो हे आपल्याला माहित आहे. अनेक ठिकाणी कोवळ्या बांबूच्या पोकळीत भात भरून आपल्याकडील साखरभातासारखा गोड भातही केला जातो. मात्र बांबूपासून कुणी नूडल्स आणि पापड तयार केलेले आपल्या ऐकिवात नसेल. बांबूच्या उपयोगांबाबत सातत्याने संशोधन करीत असलेल्या हिमालय जैवसंपदा संस्थेने आता बांबूपासून असे अनेक खाद्यपदार्थ तयार केले आहेत. हे पदार्थ केवळ स्वादिष्टच आहेत असे नव्हे तर त्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि फायबरसारखे गुणही आहेत. जुन्या जमान्यात दक्षिण अमेरिकेतील लोकांना शेंगदाण्यांचे विविध उपयोग सांगण्यासाठी प्रख्यात कृषीशास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी स्वतः शेंगदाण्यापासून ‘कोंबडी’ व अन्य पदार्थ बनवून दाखवले होते. आता भारतातील या संशोधकांनी बांबूपासून नूडल्स, कँडी व पापड बनवले आहेत. बांबूपासून कोळसा तयार करण्याचेही तंत्र यांनी विकसित केले आहे. या संस्थेने बांबूच्या अनेक नव्या प्रजातीही विकसित केल्या आहेत. संस्थेचे बांबूचे एक खास संग्रहालयही आहे. त्यामध्ये दरवाजापासून फरशीपर्यंत बांबूपासून तयार केलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या संशोधकांच्या मते बांबूपासून कापड, टाईल्स, शाम्पू वगैरे अनेक वस्तू तयार करता येतात.

आंतरिक बल (भाग – 1)

वे कहते थे कि ज्ञानी का एक यह भी लक्षण है कि अगर कोई उसकी कमीकमज़ोरियॉं सुनाये तो सुनेगा भी और उनके बारे में सोचेगा भी। वो यह नहीं कहेगा कि मैं भी तो अनुभवी हूँ, मैं क्या कम हूँ। अगर किसी में बुद्धि का, ज्ञान का, योग का या सेवा का अभिमान आ गया तो समझ लो कि उसकी प्रगति रुक गयी, उसकी गिरावट शुरू हो गयी। इसलिए अपनी मनोभावना अच्छी बनाओ। ऐसे हम बहनों को भाई साहब समझाते थे।

बाबा के महावाक्यों पर अचल विश्वास – बाबा पर और बाबा के महावाक्यों पर अचल विश्वास स्थिर रहने के लिए हम बहनों को कई बातें सुनाते थे। कहते थे, बाबा का एक-एक महावाक्य लाखों-करोड़ों रुपयों का है। इस ज्ञान से आत्मा का अध:कार। मिट जायेगा, जीवन पवित्र और श्रेष्ठ बन जायेगा, मनुष्य देवता बन जायेगा । भगवान सर्वज्ञ है, सत्य है, उसका कोई भी महावाक्य ग़लत नहीं हो सकता। मनुष्य से कोई ग़लती हो सकती है; वो भगवान है, उससे कोई भी गलती हो नहीं सकती। वह सर्व का कल्याणकारी है, शुभकारी है। हमेशा अपने जीवन में यह गॉंठ बॉंधकर रखो कि इस संगमयुग में हमें जो ज्ञान मिला है, यही सत्य ज्ञान है, उसके अलावा और कोई ज्ञान सत्य हो नहीं सकता। ऐसे ज्ञान पर पूरा निश्‍चय रहना चाहिए।

इस ज्ञान में आने से पहले मैं मॉं-बाप के साथ बहूत भक्ति करती थी। उनके साथ तीर्थों पर भी जाती थी। मेरे मन में एक ही आशा थी कि अगर भगवान मुझे मिले, मैं उनसे पूछूगी कि आपने संसार क्यों बनाया ? पिता जी हम बच्चों से बहुत दान-पुण्य करवाते थे। वे गरीबों को, भिखारियों को बहुत दान-पुण्य करते थे तो वही संस्कार उन्होंने हम बच्चों में भी डाल दिये। सन 1982 में मुझे बाबा का ज्ञान मिला। ज्ञान-योग करते हुए मुझे एक सप्ताह ही हुआ था, तब भाई साहब को पहली बार देखा सेन्टर पर। वे किसी भाई से छपाई के बारे में बातें कर रहे थे। उस समय मुझे यह पता नहीं था कि ये संस्था के एक बड़े भाइ हैं । स़फेद कपड़े पहने हुए थे, बाबा का बैज लगा हुआ था। मैंने उनका हाथ जोड़कर नमस्ते कहा। तब उन्होंने कहा, आप ओम शान्ति क्यों नहीं कहते? चक्रधारी दीदी कुमारियों की क्लास कराती थी। एक दिन भाई साहब वहा आये। उस समय हम तीन कुमारियॉं थीं। भाई साहब ने पूछा, आप लोगों का क्या लक्ष्य है ? चक्रधारी दीदी की तरफ़ देखते हुए मैंने कहा, मुझे इन जैसा बनना है और यहॉं सेन्टर पर रहकर सेवा करनी है। दूसरी बहन ने कहा, मुझे मुंबई में रहकर सेवा करनी है। तीसरी ने कहा, मुझे मधुबन में रहना है। फिर भाई साहब ने मेरे से पूछा, दूसरी दो तो अलगअलग स्थान पर रहकर सेवा करना चाहती हैं लेकिन आपने यह क्यों कहा कि मैं शक्ति नगर में रहकर सेवा करूँगी? मैंने कहा, भाई साहब, मैं जब भी आपको देखती हूँ, आप मुझे गणेश के रूप में दिखायी पड़ते हैं। जहॉं विघ्नविनाशक गणेश जी रहते हैं वहॉं हर बात में सफलता हुई ही पड़ी है। चक्रधारी दीदीने ही हमें उनका परिचय करवाया कि ये बड़े भाई हैं, साहित्य लिखते हैं आदि-आदि। हर महीने के एक बुधवार को भाई साहब कुमारियों की क्लास कराते थे। हर शुक्रवार को भाइयों की क्लास होती थी।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र

महाराज आणि मी एक दुसर्‍यांमध्ये इतके भान हरपून गेलो की महाराज एका नंतर दूसरे प्रसादाचे पॅकेट मला देत राहिले. मधेच एका सेवादाराने येऊन थांबवले आणि म्हणाला की, महाराजजी सर्व काही यालाच द्याल का? दुसर्‍या वेळेला फेब्रुवारीमध्ये जन्मोत्सवाच्यावेळी मला नामदानही मिळाले आणि त्या दिवशी मला खुप चांगला अनुभव मिळाला. एकदा आमच्या घरी सत्संगचा कायक्रम ठेवण्यात आला होता. म ला महाराजांनी दर्शन दिले आणि म्हणाले, सत्सग मी स्वतः करेन मी सत्संगच्या कायदेकानूनविषयी अनभिज्ञ होतो. मी माझ्या मुलाला प्रसाद व गंगाजल सत्संगसाठी आणण्यास पाठविले परंतु एका सत्संगी महिलेकडून अस एकल का, गुरू तर या सर्व गोष्टींच्या पाशी माझी चूक कळली आणि मी लगेच मुलाला थांबवण्यासाठी बसमध्ये असतात. मला माझे कले निघालो. बस जेव्हा जमुनेच्या जुन्या पुलावरून जात होती तेव्हा मला बसून गावाकडे निघालो. बस जेव्हा जमुनेच्या जुन्या पुलावरुन जात होती तेव्हा मला महाराज संत कृपालसिंहजी यमुनेच्या पाण्यावर उभे असलेले दिसले. मी गंगाजल आणू नको म्हणून सांगितले परंतु गुरूने माझ्या अंतरी लपलेल्या गंगामैयाच्या श्रध्देला अशाप्रकारे पुर्ण केले. एक दिवस मी झोपलेलो होतो तेव्हा अचानक एक सफेद वस्त्रधारी मुलीने मला उठवले. मी उठलो तेव्हा मुलगी गायब झाली. मी उठून ध्यानाला बसलो. ध्यानाला बसल्यानंतर मला एक अन्य दृश्य दिसले. माझ्या खोलीमध्ये गंगा प्रकट झाली आणि तीनही महापुरूष गंगेवर प्रकट झाले. नंतर हुजूर बाबा सावनसिंहजी महाराज आणि परम संत कृपालसिंहजी महाराजांनी मला संत दर्शनसिंहजींकडे इशारा करीत म्हणाले, हे तुझे गुरू आहेत.’ नंतर महाराज सावनसिंहजी यांनी संत कृपालसिंहजींना माझे ऑपरेशन करण्याचा आदेश दिला. माझ्या छातीला चीर देऊन त्यांनी माझ्या हृदयातून काहीतरी वस्तू काढली. मी बघत होतो. त्यावर ॐ लिहिलेले होते. महाराजांनी ते हातात घेऊन त्यास गंगाजलाने धुतले आणि पुन्हा ते यथास्थानावर ठेवले. अशाप्रकारे महाराजांनी म ाझे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी ही निराळी पद्धत निवडली. एकदा मला घर घ्यावयाचे होते. परंतु म ाझ्याजवळ पैसे नव्हते. मी सतत चिंतेत राहयचो की घर कसे खरेदी करावे? घरही बघून ठेवले होते. परंतु माझी घर खरेदी करण्याची परिस्थिती नव्हती. एक दिवस जेव्हा मी आंघोळ करीत होतो, तेव्हा महाराज दर्शनसिंहजी प्रकट झाले आणि म्हणाले, ‘जे घर तू घेवू इच्छितो ते तुलाच मिळेल आणि 13 एप्रिलला हे घर तुझ्या नावावर होईल. या अतिरिक्त माझ्याजवळ एक आणखी घर होते जे विकले जात नव्हते. तेव्हा काही दिवसानंतर त्याचे ग्राहकही आले आणि काही पैसे घेऊन जे घर मी घेवू इच्छित होतो त्या मालकाबरोबर सौदा झाला आणि ते घर ठीक 13 एप्रिलला माझ्या नावावर करण्यात आले.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

सिंहाचा दरबार

एकदा वनराज सिंहाला वाटले म्हणून त्याने अरण्यातील सर्व प्रजाजनांना आपल्या दरबारात हजर राहण्याची आज्ञा सोडली. म्हणून अरण्यातील सर्व प्रजाजनांनी दरबारात हजेरी लावली. तेव्हा सिंह महाराजांच्या स्वयंपाकगृहातून येणारा वास अस्वलाच्या नाकाला फारच झोंबला; म्हणून त्याने आपले नाक दाबून धरले. अस्वलाचा हा उद्धटपणा सिंह महाराजांना सहन झाला नाही. रागावून त्याने आपल्या पंजाच्या एकाच फटकार्‍यात अस्वलाला ठार केले. या भयंकर प्रकाराने माकड भ्याले आणि थरथर कापू लागले. आपली भीती लपवण्यासाठी काही तरी बोलायचे म्हणून माकड सिंहाला म्हणाले, ‘‘महाराजांच्या स्वयंपाकघरातून येणारा सुगंध किती सुंदर आहे! निरनिराळे मसाले वापरून उंची भोजन बनत आहे. हे त्या मूर्ख अस्वलाला समजले नाही आणि सहनही झाले नाही. महाराजांचे पंजे तर किती सुंदर आहेत. त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही.’’

माकडाच्या या उपरोधिक बोलण्याने सिंहाला आनंद होण्याऐवजी तो जास्तीच खवळला; आणि क्षणभरातच त्याने माकडाला जमिनीवर आपटून ठार मारले. नंतर सिंहाची नजर कोल्ह्यावर पडताच तो म्हणाला, ‘‘काय कोल्होबा, स्वयंपाकघरातून कशाचा वास येतो, ते तुम्ही सांगता काय?’’ यावर धूर्तपणाने कोल्हा म्हणाला, ‘‘राजाधिराज, माझे नाक इतके तीक्ष्ण नाही. नुसत्या वासावरून तो कशाचा आहे, हे मला सांगता येणार नाही. शिवाय आज चार दिवस झाले, मला सर्दी-पडसे झाले आहे. म्हणून आपल्या स्वयंपाकघरातून कशाचा वास येत आहे हे सांगण्याचे धारिष्ट्य मी करणार नाही.’’

तात्पर्य – हजरजबाबीपणा, समयसूचकता आणि प्रसंगावधान या गुणांच्या जोरावर माणूस एखाद्या कठीण प्रसंगीतून आपली सुटका करू शकतो.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- प्लेग कशामुळे होतो?

काही वर्षांपूर्वी प्लेगने भारतात हाहाःकार उडवून दिला होता. सूरत, बीड, दिल्ली अशा शहरात प्लेगचे खूप रोगी सापडले. काही मृत्युमुखीही पडले. प्लेग हा काही शतकापूर्वी अत्यंत भयंकर असा रोग मानला जायचा. सहाव्या शतकात जगात या रोगाने 10 कोटी बळी घेतले, तर 1246 ते 1645 पर्यंत 2.5 कोटी बळी घेतले. 1898 ते 1908 या काळात भारतात प्लेगने दरवर्षी 5 लाखांच्यावर लोक मृत्युमुखी पडत होते. नंतर हे प्रमाण खूप कमी झाले. 1966 नंतर तर 1994 पर्यंत प्लेगचा एकही रुग्ण भारतात आढळला नाही. सप्टेंबर 1994 पासून मात्र 5000 हून जास्त रुग्ण सापडले.

यर्सिनीला पेस्टीज नावाच्या जिवाणूमुळे प्लेग हा रोग होतो. प्लेग हा सामान्यपणे जंगली उंदीर व तत्सम प्राण्यांपासून होणारा रोग आहे. असे उंदीर भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्तींच्या काळात समाजजीवनाची घडी बिघडल्याने, वस्त्या ओस पडल्याने गावांमध्ये येतात. त्यामुळे त्यांचा व घरातील उंदरांचा संपर्क येतो व तेथील घरात राहणार्‍या उंदरांमध्ये हा रोग पसरतो. या रोगाचा प्रसार उंदरांमध्ये व उंदरांपासून माणसांमध्ये पिसवांमुळे होतो. घाण असलेल्या जागी उंदराचे वास्तव्य असते. त्यांच्या शरीरावर पिसवा असतात. या पिसवा प्लेग रोग असलेल्या उंदराला चावून, नंतर निरोगी माणसाला चावतात. त्यामुळे निरोगी माणसाला प्लेग होतो. प्लेग होण्याचे मुख्य कारण हे अस्वच्छता वा कमी दर्जाचे राहणीमान यात सापडते. प्लेगचे गाठींचा प्लेग (ब्युबोनिक), फुफ्फुसाचा प्लेग (न्यामोनिक) व रक्तातील प्लेग (सेप्टीसेमीक) असे तीन प्रकार आहेत. पूर्वी प्लेगवर परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे खूप लोक बळी पडत. आज मात्र सेप्ट्रान, टेट्रासायक्लीन अशी अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. प्रतिबंधक लसही उपलब्ध आहे. त्यामुळे प्लेगला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. आजच्या काळात तो एक सहजगत्या बरा होणारा रोग आहे. फक्त त्याचे निदान लवकर व्हायला हवे. आपले घर-परिसर स्वच्छ राखला, उंदरांचा नायनाट केला; तर प्लेगची भीती बाळगण्याचे काहीच कारण उरणार नाही.

हसा आणि शतायुषी व्हा!

बंता   –    काल मला 10 जणांनी खूप मारला

संता   –    मग तू काय केलस?

बंता    –    मी म्हटलं, साल्यांनो दम असेल तर एक एक जण या

संता   –     मग?

बंता    –    मग काय, साल्यांनी एकेकाने येवून परत मारल