वनस्पतींमध्येही असते सोने!

0
82

सोन्यासारख्या राजधातूला प्राचीन काळापासून जगभरात महत्त्व आहे. प्लॅटिनमसारखा धातू सोन्यापेक्षाही मौल्यावान असला तरी सोन्याचे राजस सौंदर्य आणि लोकप्रियता त्याला नाही. आतापर्यंत जगभरात माणसाने जितके सोने पृथ्वीपासून मिळवले आहे त्यापेक्षा चारपट अधिक सोने अद्याप मानवापासून दूरच आहे. जमिनीच्या प्रत्येक दहा लाखाच्या हिश्श्यात 0.0025 किलो सोने असते. अगदी वनस्पतींच्या पानांमध्येही सोन्यांचा अंश असतो. युकेलिप्लस नावाच्या वनस्पतीच्या पानांमधील सोन्याचे कण 2013 मध्ये ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी काढून दाखवले होते. सात हजार वर्षांपासून किंवा त्याच्या आधीपासूनच माणूस सोन्याचा वापर करतो आहे, असे मानले जाते. अनेक नद्यांच्या पाण्यातही सोन्याचे कण सापडतात. नद्याच नव्हे तर अनेक वाहते झरेही आपल्या प्रवाहाबरोबर खनिजांमधील सोन्याचे कण वाहून नेत असतात. अनेक लोक चाळणीत असे पाणी घेऊन सोने शोधत असतात. सर्वसाधारणपणे लोकांना 24 कॅरेट सोन्याचे अप्रूप असते. मात्र, तज्ज्ञांच्या मते 22 कॅरेट सोने सर्वात चांगले असते.