रेशमासारखे मुलायम केस

आपण थोडीशी दक्षता घ्याल तर आपले केसही रेशमासारखे मुलायम चमचमते बनवू शकाल. त्यासाठी डोके धुण्याचा अर्धा तास आधी एक लिंबाचा रस दूध वा दह्यात ङ्गेटून केसांना लावा.
वास्तू

जर तुमच्या घरातील एखादे टॉयलेट हे घराच्या पूर्व, उत्तर आणि पूर्वोत्तर दिशेला येत असेल, तर हा ङ्गार मोठा असा वास्तुदोष मानला जातो. यामुळे सुख, आरोग्य व समृद्धी या तिन्हींवर गंभीर नकारात्मक प्रभाव निर्माण होतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी थोडी चिनी माती, काच वा प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये 2-3 मुठी खडे समुद्री मोठ घ्या व ती प्लेट घरात ठेवा. या प्लेटमधील मीठ 15-20 दिवसांनी बदलत राहा. टॉयलेटचा वास्तुदोष हा या उपायामुळे बर्याच प्रमाणात नियंत्रित केला जातो.
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी

रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खाल्ल्याने, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते. मेथ्यामध्ये असलेल्या विशेष अमायनो ऍसिड्समुळे हे साध्य होते. परिणामत: उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन ती नियंत्रित राहण्यास मदत होते.
अनशा पोटी चहा घेताय?

अनेक लोकांची दिवसाची सुरुवात चहानेच होत असते. काही लोकांना तर डोळे उघडताच पलंगावरच ‘बेड टी’ हवा असतो. ही सवय झोप घालवण्यासाठी मदत करीत असली तरी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी चहा पिल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. चहा आणि कॉफीमध्ये नैसर्गिकरीत्याच आम्लियता असते. त्यामुळे रिकाम्या पोटी त्यांचे सेवन केल्याने आम्लाचे मूळ संतुलन बिघडू शकते व त्यामुळे पित्ताचा तसेच अपचनाचा त्रास उद्भवू शकतो. चहामध्ये ‘थियोफिलाईन’ नावाचाही एक घटक असतो. त्याच्यामुळे निर्जलीकरण होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. तसेच दात न घासताच चहा पिण्याच्या सवयीने जीवाणू तोंडात साखरेचे विघटन करू शकतात व तोंडात आम्लाचा स्तर वाढू शकतो. त्यामुळे दातांमधील इनॅमलचा र्हास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक कप कोमट पाण्यात लिंबूचा रस आणि काळ्या मिरीची पूड टाकून पिणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. वजन घटवण्यासाठी हा चांगला उपाय आहे तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
स्मार्टफोन वापराबाबत नवं संशोधन

स्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा जणू काही अविभाज्य भाग बनला आहे. केवळ कॉल करणे किंवा घेणे इतक्या कामासाठी हे उपकरण मर्यादित नाही. हे एक बहुपयोगी उपकरण बनवलेले आहे. सर्चिंगपासून ऑनलाईन पेमेंटपर्यंत अनेक कामे फोनच्या सहाय्याने केली जात असतात. आता ‘विनो’ने एक रिसर्च प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये भारतात स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर कशासाठी केला जातो याचा खुलासा झाला आहे. जर स्मार्टफोनवर यूजर अक्टिव्हिटीचा विचार केला तर स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर हा युटिलिटी (उपयुक्त वस्तूंच्या) बिलाचे पेमेंट करण्यासाठी होतो असे दिसून आले. रिपोर्टनुसार सुमारे 86 टक्के लोक फोनवरून यूटिलिटी बिलाचे पैसे देतात. ऑनलाईन शॉपिंंगसाठी स्मार्टफोनचा वापर सुमारे 80.8 टक्के केला जातो. तसेच सुमारे 61.8 टक्के लोक स्मार्टफोनचा वापर ज़रूरी सामानाची ऑर्डर देण्यासाठी करतात. ऑनलाईन सर्व्हिससाठी 66.2 लोक स्मार्टफोन वापरतात. याशिवाय ग्रॉसरी आयटम म्हणजेच किराणा मालाची ऑर्डर देण्यासाठी 73.2 टक्के लोक स्मार्टफोन वापरतात. डिजिटल कॅश पेमेंटसाठी 58.3 लोक स्मार्टफोन वापराच्या प्रमाणाचा विचार केला तर सुमारे 62 टक्के पुरूषांकडे स्मार्टफोन असतो. महिला याबातीत मागे असल्याचे दिसून आले. देशात केवळ 38 टक्के महिलांकडेच स्मार्टफोन आहे. मोठी शहरे आणि छोट्या शहरांची तुलना केली तर 58 टक्क्यांसह मेट्रो पुढे आहेत. त्यानंतर 41 टक्क्यांसह नॉन मेट्रो सिटींचा क्रमांक लागतो.
कांस्ययुगातील कांगव्याचा शोध

दागिन्यांमध्येही अनेक प्रकार पाहायला मिळत असतात. आपल्याकडेही प्राचीन काळापासून डोक्यापासून पायापर्यंतचे अनेक प्रकारचे दागिने प्रचलित आहेत. त्यामध्ये केसांमधील चुडामणीसारख्या दागिन्याचाही समावेश होतो. आता ब्रिटनमध्ये तीन हजार वर्षांपुर्वीच्या अशाच केसांमध्ये वापरल्या जाणार्या सोन्याच्या दागिन्याचाही समावेश होतो. आता ब्रिटनमध्ये तीन हजार वर्षांपूर्वीच्या अशाच केसांमध्ये वापरल्या जाणार्या सोन्याच्या दागिन्याचा शोध लागला आहे. वेल्समध्ये पुरातत्त्व संशोधकांनी कांस्ययुगातील दफनभूमितील उत्खननात हा दागिना तसेच ब्रिटनमधील सर्वात जुना ठरलेला लाकडी कंगवाही शोधला आहे. एका थडग्यात या वस्तू आढळून आल्या. हे थडगे तीन हजार वर्षांपूर्वीच्या एका व्यक्तीचे असून त्याच्या देहाचे अवशेषही याठिकाणी सापडले आहेत.
त्याच्या देहाबरोबर अशा सुंदर आणि अत्यंत दुर्मीळ वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे लाकडाचा कंगवाही इतक्या वर्षांनंतर एखाद्या कोळशासारखा टिकून राहिलेला दिसून आला. इंग्लंडमधील आर्कियोलॉजिकल फर्म असलेल्या रेड रिव्हर आर्कियोलॉजीचे संचालक डेव्ह गिलबर्ट यांनी सांगितले की या ठिकाणी सापडलेली सर्वात आकर्षक वस्तू म्हणजे ही सोन्याची कडी. लाकडी कंगवाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. त्याला छोटे आठ दात आहेत. सहसा लाकडाच्या किंवा अन्य जैविक पदार्थांंच्या वस्तू काळाच्या ओघात मातीत विघटित होऊन जात असतात. या थडग्यातील माणसाचे दहन करण्यात आले होते. त्याच्याबरोबरच या वस्तूही ठेवल्या असल्याने त्यांना आगीची झळ बसलेली असावी. त् याचा परिणाम म्हणून हा कंगवा कोळशासारखा बनून टिकून राहिला असावा, असेही त्यांनी सांगितले.
85 हजार रुपयांची भाजी!

सध्या आपण टॉमॅटोच्या आणि अन्यही काही भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे त्रस्त आहोत. अशा स्थितीत एक भाजी अशी आहे जिची किंमत आपले डोळे विस्फारू शकते. युरोपियन देशांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली आणि ‘जगातील सर्वात महाग भाजी’म्हणून ओळखल्या जाणार्या या भाजीचे नाव आहे ‘हॉपशूटस्’ही भाजी इतकी महाग असण्याचे कारण म्हणजे या हॉपशूटस्मध्ये अनेक औषधी गुणधर्म भरपूर आहेत. या भाजीची किंमत सुमारे 85 हजार रूपये किलो असून भारतात या भाजीची लागवड सहसा केली जात नाही. अनेक मिडिया रिपोर्टनुसार, सर्वात आधी हिमाचल प्रदेशच्या शेतात याची लागवड करण्यात आली होती. एका अहवालानसार, हॉप शूटस् कापणीसाठी ‘बॅक-ब्रेकिंग’आहेत आणि हेच एकमेव कारण आहे की हॉपशॅटसची किंमत इतकी महाग आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मूळच्या लोकांनी जगातील सर्वात महागड्या भाजीची लागवड करण्यास सुरूवात केली. ही वनस्पती मध्यम गतीने 6 मीटर (19 फूट 8 इंच) पर्यंत वाढू शकते आणि सुमारे 20 वर्षे जगू शकते. हॉपशूटला कापणीसाठी तयार होण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागतो. या वनस्पतीची कापणी करण्यासाठी बरेच शारीरिक श्रमही करावे लागतात, कारण वनस्पतीच्या लहान हिरव्या टोकांना तोडताना अतिशय काळजी घेणे आवश्यक असते. वैद्यकीय अभ्यासानुसार, असे सूचित केले गेले आहे आहे की, भाजी क्षयरोगाविरूद्ध अँटीबॉडी बनवू शकते तसेच चिंता, निद्रानाथ, अस्वस्थता, तणाव, अटेंशन डेफिसिट-हाइपरक्टिविटी डिसऑर्डर अशा विविध समस्यांवर मदत करते. या भाजीचा वापर मद्य, हर्बल चहा, हर्बल, औषधे, शीतपेये अशा वेगवेगळ्या उत्पादनांसाठी केला जात असतो.
अतिप्राचीन कोळंबी!

तब्बल 50 कोटी वर्षांपूर्वी समुद्रात कोळंबीची अनोखी प्रजाती अस्तित्वात होती. या प्रजातीला ‘ऍनोमॅलोकॅरिस कॅनाडेन्सिस’असे नाव दिलेले आहे. तिला ‘कॅनडाची असामान्य कोळंबी’असेही म्हटले जाते. या कोळंबीचा आकार पाळीव मांजराइतका मोठा होता. तिचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या तोंडावर असलेले दोन काटे. या काट्यांचा वापर ती भक्ष्याला ‘पंक्चर’करण्यासाठी करीत होत, असे आता संशोधकांनी म्हटले आहे. विशेषत: कठीण कवचाच्या भक्ष्याच्या शरीरात टोचण्यासाठी या काट्यांचा वापर होत असल्याचे पूर्वी मानले जात होते. मात्र, ही कोळंबी मऊ शरीराच्या भक्ष्यांनाच अधिक शिकार बनवत असल्याचे आता दिसून आले आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘प्रोसिंडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील संशोधक रसेल बिकनेल यांनी याबाबतची माहिती दिली. सध्याच्या कोळंबीसारख्या या प्रागेतिहासिक काळातील जलचराची लांबी तीन फुटांपर्यंत होती. त्यांच्या सहाय्याने असे भक्ष्य तोंडाजवळ ओढून जात असे.
पूर्वज होते ‘ऑल राऊंडर’!

मानवाचे पूर्वज ‘होमो नलेडी’बाबत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनानुसार असे दिसून आले आहे की, हे पूर्वज ‘ऑल राऊंडर’ होते. याचा अर्थ ते झाडावरही राहू शकत होते आणि जमिनीवरुन ताठपणे चालूही शकत होते. तसेच ते दगड किंवा काठ्यांसारखी साधने वापरण्यातही कुशल होते.हामो नलेडी मानवाच्या हात आणि पाय संरचना तसेच कार्याबाबत दोन नवी संशोधने करण्यात आली आहेत. त्यानुसार हे मानव विशिष्ट पद्धतीने झाडावर चढण्यास आणि जमिनीवरुन चालण्यास सक्षम होते. दक्षिण आफ्रिकेत विटवाटर्सरँड विद्यापीठातील संशोधकांच्या एका पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी 2013 पासून आतापर्यंत रायजिंग स्टार गुहांमधून 1550 अवशेषांना शोधून त्यांचे निरीक्षण केले आहे. या गुहा जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट आहेत. विल्यम हारकोर्ट स्मिथ आणि त्यांच्या सहकार्यांनी याबाबतचे एक संशोधन केले असून, दुसरे संशोधन ट्रेसे किवेल आणि त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.



