तुळशीचीवर नवं संशोधन

0
85

वनस्पतींनाही संवेदना असतात हे आपल्या जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध करून दाखवले होते. आता पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी दोन वनस्पती एकमेकांशी ‘बोलू’ शकतात असे म्हटले आहे. याबाबत त्यांनी भारतात सर्वत्र आढळणार्‍या व पवित्र मानल्या जाणार्‍या तुळशीच्या रोपाचे प्रयोग केले आहेत. या झाडाचा शेजारच्या झाडावर प्रभाव पडतो असे त्यांना दिसून आले. दोन्ही झाडे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यात आली तरी हा प्रभाव पडतो हे विशेष. तुळशीला इंग्रजीत ‘बेसील’ असे म्हटले जाते. तुळशीच्या रोपातून काही विशिष्ट घटक बाहेर पडत असतात ज्याचा उपयोग अन्य झाडांच्या वाढीसाठीही होतो. तुळशीची मुळे दीर्घकाळ ओलावा राखून ठेवतात. त्याचाही उपयोग शेजारच्या झाडांना होतो. मोनिका गॅग्लीआनो आणि मायकल रेन्टोन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी तुळशीच्या शेजारी एक मिरचीचे झाड लावले आणि हे झाड व्हॅक्युम बॅरीअरच्या सहाय्याने वेगळेच ठेवले. तरीही या मिरचीच्या झाडाला तुळशीचा शेजार गुणकारी ठरला. झाडांचे सायटोस्केलेटन काही लहरी उत्पन्न करीत असते. या कंपनीद्वारे झाडे एकमेकांशी संवाद साधतात असे या संशोधकांनी म्हटले आहे.