‘इथे’ तयार होतात विचित्र ढग

0
67

ऑस्ट्रेलियातील सक्विन्सलँड प्रांतात कारपेन्ट्रियाच्या खाडीवर एक अनोखे नैसर्गिक घटना घडत असते. या घटनेचे नेमके कारण आजपर्यंत समजू शकलेले नाही. या ठिकाणी सप्टेंबरअखेर ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत लांब नळ्यांच्या आकाराचे ढग तयार होत असतात. त्यांना ‘मॉर्निंग ग्लोरी क्लाऊड’ असे म्हटले जाते. पृथ्वीपासून सुमारे 100 ते 200 मीटर उंचीवर हे ढग बनतात. हे ढग एक हजार किलोमीटर लांबीचे आणि दोन किलोमीटर मा उंचीचे असतात. ग्लायडर्स घेऊनही अनेक पायलट हे ढग पाहण्यासाठी आकाशात भरारी मारतात. हे ढग नेहमी भयानक आवाज करीत येतात. त्यावेळी वारे वेगाने वाहत असतात. जमिनीवर हवेचा दाब वाढतो आणि हे ढग ताशी 60 किलोमीटर वेगाने जाऊ लागतात. या ढगांबरोबर पावसाचे थेंब शिडकावा देतात आणि वीजाही कडाडतात. अमेरिका, इंग्लिश खाडी, जर्मनी, रशियातही काही वेळा असे ढग दिसून आले आहेत. मात्र कारपेन्ट्रियाच्या खाडीवर ते दरवर्षी नियमितपणे दिसून येतात.