मृदू त्वचेसाठी

अर्धा चिरलेल्या लिंबाच्या फोडीत थोडी पिठीसाखर पसरा. हाताचे कोपरे, गुडघ्यांच्या वाट्या व घोट्याच्या उंचवट्यावर घासा. खांदे आणि मान यांनाही हे मिश्रण लावा. यामुळे तेथील निब्बर त्वचा मृदू होईल.

सल्ला

तांदूळ शिजवताना पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि मीठ घालावे. यामुळे भात पांढराशुभ्र होतो आणि चवीलाही चांगला लागतो.

वास्तू

एखादी श्रीमंत व्यक्ती काही कारणास्तव स्वतःचे घर विकून दुसरीकडे चालली असेल, तर राहण्यासाठी किंवा कारखान्यासाठी असे घर कधीही विकत घेऊ नये.

रताळ्याचं चाट

साहित्य – रताळी, मीठ, चिमूटभर सैंधव मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस

कृती – सर्वात आधी रताळी उकडून थंड होवू द्यावीत. मग रताळी सोलून ती गोल गोल आकारात कापावीत. त्यावर चवीनुसार साधं मीठ, सैंधव मीठ, मिरे पूड, लाल तिखट आणि चाट मसाला घालावा. हलक्या हाताने रताळ्याच्या फोडी हलवून सर्व मसाले छान एकत्र करुन घ्यावेत. एका ताटात रताळ्याचं चाट काढून त्यावर लिंबाचा रस घालावा. पुन्हा रताळ्याच्या फोडी हलवून घ्याव्यात. त्यावर कोथिंबीर पेरुन सर्व्ह करावे.

गुडघेदुखीवर घरगुती उपाय

जवस – रोज जेवण झाल्यावर बडीशेपऐवजी जवस खा. जवस खाल्ल्याने शरीरात नवऊर्जा निर्माण होते आणि गुडघेदुखीचा त्रासही काही प्रमाणात कमी होतो.

पांढरे तीळ – पांढरे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यामुळे आपल्याला कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास कमी होतो.

वास्तू

जर तुमच्या घरातील एखादे टॉयलेट हे घराच्या पूर्व, उत्तर आणि पूर्वोत्तर दिशेला येत असेल, तर हा फार मोठा असा वास्तुदोष मानला जातो. यामुळे सुख, आरोग्य व समृद्धी या तिन्हींवर गंभीर नकारात्मक प्रभाव निर्माण होतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी थोडी चिनी माती, काच वा प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये 2-3 मुठी खडे समुद्री मोठ घ्या व ती प्लेट घरात ठेवा. या प्लेटमधील मीठ 15-20 दिवसांनी बदलत राहा. टॉयलेटचा वास्तुदोष हा या उपायामुळे बर्‍याच प्रमाणात नियंत्रित केला जातो.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- पाश्‍चराइझड् दूध म्हणजे काय?

आपण पिशव्यांचे दूध जेव्हा आणतो, तेव्हा त्यावर पाश्‍चराइझड् मिल्क असे लिहिलेले असते. पाश्‍चराइझड् म्हणजे काय हा प्रश्‍न तुम्हाला सतावत असेल. लुईस पाश्‍चर या शास्त्रज्ञाच्या नावावरून हे नाव दिले गेले आहे. या फ्रेंच शास्त्रज्ञाने दूध निर्जंतुक करण्याची जी पद्धत शोधून काढली, त्याला ‘पाश्‍चरायझेशन’ असे म्हणतात. आपल्या घरी दूध खराब होऊन नासू नये म्हणून एकतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो वा उकळवून थंड करून फ्रिजमध्ये ठेवतो. दूध आणून जर तसेच ठेवले, तर काही वेळाने ते नासते. उन्हाळ्यात तर असे फार लवकर होऊ शकते. मग दुधाचे एवढे टँकर, लाखो लिटर दुधाच्या डेअरीमध्ये दूध टिकावे म्हणून काय करत असतील, हा प्रश्‍न अनेकांना पडला असेल.

यासाठी काय करतात, ते आपण पाहू. दूध योग्य त्या तापमानापर्यंत योग्य त्या काळासाठी गरम करून त्यासाठी सर्व रोगकारक जंतू नष्ट करण्याच्या प्रक्रियेला ‘पाश्‍चरायझेशन’ असे म्हणतात. या प्रक्रियेत दुधातील घटक त्याचा रंग, वास, पोषणमूल्य इत्यादींमध्ये कोणताही बदल होत नाही. पाश्‍चरायझेशनच्या अनेक पद्धती असल्या, तरी त्यातील एक पद्धत सामान्यतः वापरली जाते. या पद्धतीत दूध अत्यंत वेगाने खूप कमी वेळात 720 से. पर्यंत गरम करतात. त्या तापमानाला किमान 15 सेकंद ठेवून नंतर अत्यंत वेगाने 40 सेंटीग्रेड इतके थंड करतात. या पद्धतीत खूप मोठ्या प्रमाणातील दुधाचे पाश्‍चरायझेशन दर तासाला होऊ शकते, त्यामुळे डेअरीमध्ये ही पद्धत वापरतात. पाश्‍चरायझेशनमुळे आपल्याला सुरक्षित दूध मिळते. पाश्‍चरायझेशनमुळे 90% जंतू मरतात. म्हणून घरी आणल्यानंतर जर ते तसेच ठेवले, तर खोलीतल्या तापमानामुळे या जिवाणूंची वाढ होऊ शकते. पाश्‍चराईझ् केलेले दूध खराब होऊ नये म्हणून आणल्यावर एकतर ते उकळवून घ्यावे किंवा फ्रिजमध्ये ठेवावे.

सल्ला

कॅसेटचा आवाज खरखरत असेल तर ती थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. आवाज व्यवस्थित येईल

 

मुलायम केस

आपण थोडीशी दक्षता घ्याल तर आपले केसही रेशमासारखे मुलायम चमचमते बनवू शकाल. त्यासाठी डोके धुण्याचा अर्धा तास आधी एक लिंबाचा रस दूध वा दह्यात फेटून केसांना लावा.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी

रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खाल्ल्याने, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होऊ लागते. मेथ्यामध्ये असलेल्या विशेष अमायनो ऍसिड्समुळे हे साध्य होते. परिणामत: उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन ती नियंत्रित राहण्यास मदत होते.