वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर वाद्याच्या गजरात कुलदेवतेची पूजा, आलेल्या
लोकांचा सन्मान, पुरोहितांना प्रसन्न करून घरात प्रवेश करावा. गृहप्रवेश करण्या पूर्वी
वास्तुशांती करणे शुभ मानले जाते.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
धनगर आणि त्याचा कुत्रा
त्यावर धनगर म्हणाला, “अरे विश्वासघातया, त्या लांडग्यापेक्षा तू फारच लबाड आणि दुष्ट आहेस. हाच तुझा मोठा अपराध. तो लांडगा तर माझा शत्रू आहे, हे मला माहीत आहेच. त्याच्याकडून मला अपाय होणार, हे मला पक्के माहीत असल्यामुळे त्याचा बंदोबस्त कसा करायचा, हे मला माहीत आहे. पण तू तर माझा विश्वासू चाकर. शिवाय, तुला मी काही कमी पडू देत नाही. तुला इतके चांगले वागवूनही तू कृतघ्नपणा करण्यास धजावतोस, हाच तुझा अक्षम्य अपराध आहे. क्षमा करण्यास तू मुळीच लायक नाहीस.” असे म्हणत धनगराने त्याला एका झाडाला उटले टांगले आणि ठार मारले.
तात्पर्य : विश्वासघातकी माणूस कधी दगा देईल, ते सांगता येत नाही. उघड शत्रूपेक्षा विश्वासघातकी माणूस भयंकर मोठा शत्रू असतो. त्याच्यावर वेळीच उपाययोजना करावी लागत
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
अफूचे व्यसन लागते का?
पापाव्हेर सॉम्नीफेरम या झाडाच्या फळातील रस वाळवल्यास अफू मिळते. हे झाड भारतात आढळून येते. अफू खाल्ल्याचे दुष्परिणाम हे त्यातील मॉर्फीन, कोडेन, थिबेन, पापाव्हरीन, तसेच नार्कोटीन या घटकांमुळे होतात. या झाडाच्या पिकलेल्या फळांमध्ये अफू असते. या फळाच्या बियांना ‘खसखस’ असे म्हणतात. आपल्या जेवणात आपण खसखस वापरतो. त्यात अफू नसल्याने काही दुष्परिणाम होत नाहीत. अफू खाल्ल्यास सुरुवातीला व्यक्तीला छान आनंदी असल्यासारखे वाटते. त्यानंतर डोकेदुखी, चक्कर येणे, पायांत गोळे येणे व झोप येणे; अशा गोष्टी आढळून येतात. ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास व्यक्ती कोमात जाते व मरते. अफूमध्ये मॉर्फीन असते व ते वेदनाशमनाचे काम करते. त्यामुळे वेदना घालवणे, हे एक कारण व मानसिक स्तरावर समाधान मिळवणे (जे की ती व्यक्ती वास्तवात मिळवू शकत नाही) या दुसर्या कारणामुळे व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. ही एक जीवनातील संघर्षातून, वास्तवापासून पळ काढण्याची वृत्तीच असते. व्यसनाने गंभीर स्वरूप धारण केल्यास व्यक्तीचा वास्तवाशी संपर्क राहत नाही. तिला अनेक भ्रम होतात. दुसर्याशी ती चांगले संबंध ठेवू शकत नाही. लैंगिक विकृतीही निर्माण होतात. अफूची विषबाधा झाल्यास नॅलोरफीन या विशिष्ट औषधाचा उपयोग करावा लागतो. सध्या नॅलझोन या जास्त प्रभावी औषधाचा वापर करतात. अफूच्या व्यसनापासून माणसाची सुटका होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्यसन सोडण्याची त्या वयक्तीची इच्छा पाहिजे. त्याचे मन खंबीर असेल, तरच तो अफू सोडू शकेल. काही काळासाठी त्याला घरापासून व मित्रमंडळापासून दूर ठेवावे लागेल. अफू दुसर्या कोणाकडून त्याला मिळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. अफूचे सेवन थांबवल्यावर व्यक्तीला सुरुवातीला त्रास होतो; पण दोनय्चार दिवसांत त्यांचे गांभीर्य बरेचसे कमी होते. अफूवरून आठवले. खेड्यात स्त्रिया शेतावर काम करताना मुलांना अफूचे बोंड चोखायला देऊन झोपवून टाकतात. त्यामुळे मुले झोपाळू होतात व त्यांच्या बुद्धीची वाढही योग्य रीतीने होत नाही.
टोमॅटो चटणी
टोमॅटो चटणी
साहित्य : अर्धी जुडी पालक, एक लाल टोमॅटो, एक वाटी कोथिंबीर, एक
टीस्पून बारीक चिरलेला लसूण, मुलांना चालेल एवढी हिरवी मिरची, मीठ, तेल.
कृति : तेलावर ठेचलेली मिरची आणि लसूण परतून घ्या. टोमॅटोच्या बारीक फोडी
करून परता. पालक परतवून मिश्रण कोरडे होऊ द्या. शेवटी कोथिंबीर घालून परता.
मिश्रण परतताना थोडे ठेचल्याशिवायसारखे करा. मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून
घ्या.
डाळिंबा खाण्याचे फायदे
डाळिंबा खाण्याचे फायदे

डाळिंबाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज डाळिंब खायला हवे. डाळिंबात ओमेगा ५ कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑसीडेंट, व्हिटॅमिन ए, सी, ई, रायबोफ्लेवीन, लोह, फॉलिक अॅसिड,
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड, फॉस्फोरस आणि थायमिन सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
जे शरीरास निरोगी ठेवण्यास मदत करते. बर्याच आजारांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर असते. डाळिंबाचे सेवन अशक्तपणा असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. दररोज डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळीत वाढ होते. अशक्तपणा असलेल्या रुग्णांनी आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश करावा. डाळिंबाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.
दैनिक पंचांग रविवार, दि. १४ जानेवारी २०२४
विनायक चतुर्थी, भोगी, धनुर्माससमाप्ति, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष
शुलपक्ष, धनिष्ठा १०|२२
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६वा. २६ मि.
राशिभविष्य
मेष : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. शब्दाने शब्द वाढवू नका. आर्थिक स्थितीत सुधारणा.
वृषभ : गुंतवणूक विचारपूर्वक करा.मित्रांबरोबर वेळ जाईल. नवे संबंध बनतील. मिळकतीतून लाभ प्राप्ति योग.
मिथुन : दृढ निश्चयामुळे कामात विजयमिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. धनलाभहोईल.
कर्क : विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन. घरात मंगल कार्याचा योग. आर्थिक क्षेत्रात संयमाने वागा.
सिंह : आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा.
कन्या : आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ. आवास संबंधी समस्या सुटतील. व्यापार क्षेत्रात लाभ.
तूळ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ
दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : आळस करू नये, कामे वेळेत करण्याचा प्रयत्न करा. आनंददायी बातमी कळेल. घरातील व्यक्तिशी वाद होऊ
शकतो. मागील उधारी वसुल होईल.
धनु : निर्णय घेण्यात दुविधा राहील ज्यामुळे कामाची गति बाधित होऊ शकते. घरातील वातावरणामुळे मन प्रसन्न राहील.
मकर : आध्यात्मा संबंधी कामांमध्ये विशेष लाभ प्राप्ति योग. कौटुंबिक सुख लाभेल. भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग.
कुंभ : जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार चांगला होत राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. मित्रांचा सहयोग मिळेल.
मीन : अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. आनंदी वातावरण राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
पक्षी पिसे का विंचरतात?
बहुतेक सर्वच पक्षी एका जागी बसले
की, चोचीने आपली पिसे विंचरताना आढळून
येतात. पक्ष्यांना पंख फुटले की ते हा उद्योग
सुरू करतात. पिसे साफ करणे हा या मागचा
हेतू असतोच, पण त्यापेक्षाही या पिसांवर तेल
पसरवणे हा या मागचा प्रमुख हेतू असतो.
पक्ष्यांच्या शेपटीवर, ती जिथे शरीराला मिळते
तिथे तैल ग्रंथी असतात. हे तेल पिसांवर पसरले
की, पिसे स्वच्छ तर होतातच, पण या तेलामुळे
पक्ष्यांच्या शरीरावर पाणी पडताच ते निथळून
जाते. शिवाय या तेलावाटे पक्ष्यांना डी जीवनसत्व
मिळत राहते ते वेगळेच.




