दैनिक पंचांग गुरुवार, दि. १८ जानेवारी २०२४

दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवारंभ, शके१९४५ शोभननामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
अश्विनी २६|५८ सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६
वा. २७ मि.

राशिभविष्य

मेष : स्वजनांशी भेट घडेल. विषयावर वाद संभव आहे. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आर्थिक लाभ. भाजणे, कापण अशा गोष्टी होण्याची शयता.

वृषभ : शासकीय स्त्रोतांकडून धन प्राप्तीचा योग. आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील.

मिथुन : पैश्यासंबंधी वाद सोडविण्यासाठी भाग्यवर्धक यश प्राप्ति योग. आर्थिक क्षेत्रात अनुसंधान संबंधी योग. वडीलोपार्जीत मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होतील.

कर्क : सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. मुलांकडून सुखद बातमी कळेल.

सिंह : अडकलेली कामे पूर्ण होतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आकस्मिक लाभ. ईच्छा नसतानाही लांबचा प्रवास करावा लागेल.

कन्या : आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना मनाची एकाग्रता साधता येईल. आध्यात्मिक चेतना मिळेल. वादंग होण्याची शयता असल्यामुळे शांत राहावे.

तूळ : सामाजिक क्षेत्रात, ज्ञानवर्धक कामांमध्ये हजेरी द्यावी लागेल. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते.

वृश्चिक : आलेली संधी न गमावणे हे तुमच्या यशाचे रहस्य. स्वप्ने पूर्ण होतील. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.

धनु : व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ. अधिकारांचा योग्य वापर करा. स्पर्धा, पैजा जिंकू शकाल. लाभ होईल. कोर्ट- कचेर्‍या यांपासून लांब रहा.

मकर : धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. आई-वडीलांचा व वडीलधार्‍यांचा सन्मान करा.

कुंभ : कामात यश सुनिश्चित. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चांगल्या घटना घडतील. लांबलेल्या प्रकरणात यश. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.

मीन : दिवस धावपळीचा असेल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मुले व पत्नी यांच्या
सहवासामुळे आरोग्य उत्तम राहिल.

                                                                                  संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

कर्करोग म्हणजे काय?
‘कर्करोग’ हा शब्द ऐकताच रुग्णाची पाचावर
धारण बसते. इतकी भयंकर स्थिती असण्याचे
कारण काय? कर्करोग झालेला माणूस जास्त
दिवस जिवंत राहत नाही हेच या भीतीचे कारण
असते. या कर्करोगाला इतके घाबरायची खरंच
गरज आहे का, ते आता पाहू.
सामान्यपणे कर्करोग हा वयस्कर व्यक्तींचा
रोग आहे. आपल्या देशात दर हजार लोकसंख्येत
एक व्यक्ती कर्करोगग्रस्त आहे. म्हणजेच प्रत्येक
खेडेगावात एकतरी रुग्ण सापडेलच. पुरुषामध्ये
जीभ, तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका व
जठर, प्रोस्टेट ग्रंथी, गुदाशय व मोठे आतडे,
श्वसनसंस्था व फुफ्फुसे तसेच यकृत या भागाचे
कर्करोग प्रामुख्याने होतात. स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे
तोंड, स्तन, अन्ननलिका व जठर, स्त्रीबीजांड,
तोंडाचा अंतर्भाग, जीभ, गुदाशय, तसेच फुफ्फुसे
व श्वसनसंस्था यांचे कर्करोग होतात. भारतातील
कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी ५०% रुग्ण तोंडाचा
अंतर्भाग, घसा व गर्भाशयाचे तोंड या भागांशी
संबंधित असतात. शरीरातील पेशींची संख्या नेहमी
वाढत असते, पण त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे
त्या वाढीचे दुष्परिणाम होत नाहीत. तसेच जठरात
फुफ्फुसाच्या पेशी वाढत नाहीत, तर यकृतात
हाडांच्या पेशी वाढत नाहीत. कर्करोगात पेशींची
अनियंत्रित अशी वाढ होते व लिंफ वाहिनीतून वा
रक्तवाहिनीतून या पेशी इतर इंद्रियापर्यंत पोहोचून
तेथे रुजतात व वाढायला लागतात. वाढ खूप
झाल्यास इंद्रियाभोवतीच्या रक्तवाहिन्या, दुसरे
अवयव यांच्यावरही त्या आक्रमण करतात व त्यांना
हानी पोहोचते.
कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. काही
रासायनिक पदार्थाशी संबंध येणे, किरणोत्सर्गी
पदार्थांशी संबंध येणे, एखाद्या जागी सतत घर्षण
होणे, काही विषाणूंचा संसर्ग होणे, आनुवंशिकता
व व्यसने ही कर्करोगाची प्रमुख कारणे होत.
कर्करोग झाला आहे, हे ओळखण्यासाठी काही
लक्षणे उपयुक्त ठरतात. यात वजन अचानक
खूप कमी होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही
अचानक गाठ येणे वा न बरा होणार व्रण तयार
होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यानंतर
सवयीत बदल होणे तसेच लघवी, शौचमार्ग व
नाक, तोंड, कान यांतून अचानक रक्तस्राव होणे
इत्यादींचा समावेश होतो.
कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण
वाचू शकतो. मुख्य म्हणजे त्याचे आयुष्य वाढते.
कर्करोग असेल म्हणून घाबरून काही लोक
डॉटरांना दाखवतच नाहीत. हे बरोबर नाही. काही
कर्करोग शस्त्रक्रियेने, तर काही किरणोपचाराने व
औषधांनी बरे होतात. निदान व्यक्तीचा मृत्यू
टाळता येतो व त्याचे आयुष्य वाढवता येते. फक्त
निदान लवकर व्हायला हवे.

हसा आणि शतायुषी व्हा!

नवरा – तुला किती वेळा सांगितले… स्वयंपाक करताना मोबाईल
मध्ये तोंड खुपसून स्वयंपाक नको करत जाऊस… आमटीत मीठ नाही…
हळद नाही… मिरची नाही… मसाला नाही… अगदी पाण्या सारखी फिक्की
आहे.
बायको – (लाटणे फेकून) तुम्हाला किती वेळा सांगितले की
मोबाईलमध्ये तोंड खुपसून जेवत जाऊ नका.. तुम्ही पाण्याच्या ग्लासात
पोळी बुचकळून खात आहात.

सुविचार

कर्तृत्वाने कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्‌भुत कार्ये घडतात.

केळी खाणे लाभदायक

0

केळी खाणे लाभदायक

केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मूत्र खड्यांच्या निर्मितीला
आळा बसतो, तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो. त्याचप्रमाणे
कृश शरीरयष्टीच्या लोकांनी केळे खाल्ल्यास वजन वाढण्यास लाभ होतो.

भाजणीच्या चकल्या

0

भाजणीच्या चकल्या

भाजणीचे साहित्य – १ किलोग्रॅम
तांदूळ, १/२ किलो चणा दाळ, १/४ किलो
उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ
धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे.
कृती – एका कढईत वरील सर्व
साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत
खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र
दळून घ्या. जितया कणकेच्या चकल्या
करावयाच्या असतील तितकी कणिक एका
कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे
तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा
सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त
सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या.
चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल
लावून वरील भजलेली थोडी थोडी कणिक
घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल
तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग
होईपर्यंत तळून घ्या.

सल्ला

0

टोमॅटो सुप बनविताना

सूप बनविण्यासाठी टोमॅटो फ्रीजमध्ये
ठेवा. जेव्हा ते सोलावयाचे असतील तेव्हा
त्यावर गरम पाण्याची धार सोडा. टोमॅटोची
साल मऊ होईल व ते सोलणे सोपे जाईल.
टोमॅटो जास्तीत जास्त आहारात घेणे अत्यंत
आवश्यक असते. टोमॅटोने शरीरातील रत
वाढते त्याचप्रमाणे त्वचेचा रंग उजळतो आणि
हिमोग्लोबीनही मोठ्या प्रमाणात वाढते.

हसा आणि शतायुषी व्हा !

 

रुग्ण : डॉटर डॉटर मी गेल्यावेळी तुमच्याकडे आलो होतो त्याला
महिना होऊन गेला, पण तब्येतीत काही सुधारणाच नाही.
डॉटर : मी दिलेल्या औषधाच्या बाटलीवरील सार्‍या सूचना तुम्ही
पाळल्या ना?
रुग्ण : होय तर. त्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे. झाकण घट्ट बंद ठेवा.

सुविचार ः

माता म्हणजे मनुष्याच्या जीवनातील गंगाजळ आहे. – आर्य चाणय.

सुदृढ व तरुण त्वचेसाठी

 


* जर आपल्या त्वचेवर छोटे, कम कुवत केस असतील तर उटण्याने ते हळूहळू
कमी होत जातात.

* उटण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे उटण्याने सर्वांगाचा मसाज होतो.
त्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. त्यामुळे त्वचा तेजस्वी, सुदृढ व तरुण बनते.
                                                 

                                                          संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.