रोज मनुका खाण्याचे फायदे

0

रोज मनुका खाण्याचे फायदे

मनुका खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रुव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते आणि रंग
देखील निखरण्यास मदत होते. मनुकांमध्ये फायबर्स असतात. हे डायजेशन योग्य ठेवण्यास मदत
करतात. यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते. मनुका हार्ट अ‍ॅमटॅकच्या आजारांमध्ये इफेटिव
आहे. यात आयरन असते. हे अ‍ॅनीमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

पुदिना शेव

0

पुदिना शेव

साहित्य : २ कप बेसन, १ पुदिना गड्डी,
४ हिरव्या मिरच्या, १/४ कप बटर, १/४ टी
स्पून हिंग, चिमूट हळद, मीठ चवीने, तेल
कृती : प्रथम पुदिना गड्डी निवडून, धुऊन
घ्या. मिसरमध्ये पुदिना पाने, हिरवी मिरची,
१/४ कप पाणी घालून चांगली बारीक पेस्ट
करून घेऊन गाळून घ्या. एका परातीत बेसन
व बटर मिस करून घ्या. मग त्यामध्ये मीठ,
हिंग, हळद घालून मिस करून पुदीन्याचे पाणी
घालून मिस करून शेवेचे पीठ चांगले मळून
घ्या. शेवेच्या पिठाला तेलाचा हात लावावा.
शेव बनवण्यासाठी शेवेचा सोर्‍या घेऊन
बारीक भोक असलेली चकती लावून शेवेचे
पीठ त्यामध्ये भरून घ्या. कढईमध्ये तेल गरम
करून त्यामध्ये शेव घालून विस्तव मंद करा.
दोन्हीही बाजूने शेव कुरकुरीत तळून घ्या.

वास्तू

0

आरशावर पडदा टाका

नवदाम्पत्याच्या खोलीत आरसा लावू
नये. या खोलीत जर ड्रेसिंग टेबल ठेवला
असेल तर झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशात
पडणार नाही याची विशेष काळजी घेतली
पाहिजे. परंतु, बदल करण्याची व्यवस्था
नसेल तर आरशावर पडदा टाकायला विसरू
नका.

सल्ला

0

लोणच्याला अधूनमधून उन्हात ठेवावे.
यामुळे त्यातील अवाजवी पाणी सुकून जाते.

डोळ्यांखालील काळवंडलेपणा

कुस्करलेला बटाटा रेशमी कापडात
बांधून रोज थोडा वेळ डोळ्यांवर ठेवल्यास
डोळ्यांखालील काळवंडलेपणा नाहीसा होतो.
लिंबाचा रस गाळलेला, दोन तोळे गुलाब
अर्क, २ तोळे ग्लिसरीन मिसळून बाटलीत
भरून ठेवावं. रात्री झोपताना चेहर्‍यावर चोळून
लावावे. वीस दिवस उपचार केल्याने मुरूम,
पुटकुळ्या दूर होऊन त्वचा मऊ आणि
तजेलदार होते. चेहर्‍यावर ग्लो येतो.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर,पौष शुलपक्ष, श्रवण १२|४९
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. वाहने व उपकरणे सावकाश चालवावीत.

वृषभ : शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.
मानसिक शांति मिळेल. अध्यात्मिक क्षेत्राकडे आपण आज वाटचाल कराल.

मिथुन : कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.

कर्क : खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. चांगली बातमी मिळेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता.

सिंह : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.

कन्या : आपल्या विवेकबुध्दीच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. खिशाला आर्थिक झळ बसण्याचा संभव आहे.

तूळ : आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा.

वृश्चिक : आई-वडीलांची चिंता सतावेल. कार्यालयातील सहकार्‍यांकडून मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामे कौशल्यपुर्ण करावी लागतील. वाहन व गृहखरेदीसाठी चांगला दिवस.

धनु : आपली वैचारिक पातळी चांगली ठेवा. वडीलोपार्जित मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. भाऊबंद डोके वर काढण्याची शयता आहे. जुन्या गुरुजन वर्गाची भेट होईल. पत्नीकडून सहकार्य मिळेल.

मकर : खूप दिवसांपासून नियोजित राहिलेले काम आज मार्गी लागेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. वाहने व उपकरणे
सावकाश चालवा. मागील केलेले संकल्प आज पुर्णत्वास येतील.

कुंभ : पितृचिंता सतावेल. धाकट्या भावंडांची शैक्षणिक चिंता राहिल. दिवस कालच्या दिवसाइतका आनंदी जाणार
नाही. अनेक प्रकारच्या अडचणी संभवतात. हितशत्रुंकडून त्रास संभवतो.

मीन : गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. इतरांची देणी आपण परत कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. कार्यालयातील वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यास कामातील समस्या दूर होतील.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

प्रतिध्वनी का ऐकू येतो?

गोलघुमटाचं नाव ऐकलंय? विजापूरला असलेल्या या इमारतीत आपण जर मित्राला हाक मारली तर ती पुन्हा सात वेळा ऐकू येते. टाळी वाजवली तर तिचेही असेच प्रतिध्वनी ऐकायला येतात किंवा मोठ्या इमारतीत, सभागृहातसुद्धा असे प्रतिध्वनी ऐकायला मिळतात. याचे कारण ध्वनिलहरी एखाद्या अडथळ्यावर आदळून पुन्हा परावर्तित झालेल्या असतात. आपल्याला ठाऊकच आहे की, ध्वनी हवेमध्ये दर सेकंदास ११०० फूट (३४० मीटर) या वेगानं प्रवास करतो. आपण बोलतो म्हणजे विशिष्ट ध्वनिलहरींची स्वरयंत्राच्या सहाय्यानं निर्मिती करतो. जर या लहरींना असलेला अडथळा ५५ फुटांच्या आत असेल तर परत येणार्‍या ध्वनिलहरी नि आपण निर्माण करत असलेल्या ध्वनिलहरी एकमेकीस अडथळा निर्माण करतात नि प्रतिध्वनी न येता नुसताच आवाज घुमतो. जर अडथळा ५५ फुटांच्या (१७ मीटर) पलीकडे असेल तर मात्र प्रतिध्वनी म्हणजे आपण उच्चारलेला शब्द आपल्याला जसाच्या तसा ऐकू येतो. याचे कारण ५५ फूट जाऊन परत यायला ध्वनिलहरींना ११० फूट अंतर कापावे लागते. यासाठी त्यांना १|१० सेकंद एवढा वेळ लागतो. या काळात आपल्या कानावर पडणार्‍या आधीच्या ध्वनिलहरी दूर जातात नि नवा ध्वनी ऐकायला आपले कान पुन्हा तयार होतात. शिवाय मूळ ध्वनिलहरी आणि परत येणार्‍या ध्वनिलहरीत अडथळे निर्माण होत नाहीत आणि स्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतो. जर जाळीदार नक्षीची भिंत, लाकूड, जाड कापड यांचे अडथळे असतील तर प्रतिध्वनी निर्माण होत नाहीत. याचा फायदा घेऊन नाट्यगृहे, सभागृहे आदी ठिकाणी भिंतीवर असे पदार्थ बसवले जातात. त्यामुळे आपल्याला संवाद वा भाषण नीट ऐकू येत.

सुविचार

अत्यंत पराक्रमी मनुष्य अत्यंत क्षमाशील आणि भांडणापासून दूर राहणारा असतो.

तुळशीच्या चहाचा लाभ

0

तुळशीच्या चहाचा लाभ

तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो.
तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. नियमीत
तुळशीचा चहा पिल्याने घसा मोकळा होतो व घशातील जळजळीपासून आराम मिळतो.

खारे शंकरपाळे

0

खारे शंकरपाळे

साहित्य : ५०० ग्रॅम मैदा, २ चमचा
कलौंजी, १ चमचा बडीशेप, पाव चमचा मेथी,
दीड चमचा खायचा सोडा, २ टे. स्पून तुपाचे
मोहन, मीठ व थोडी साखर.
कृती : कलौंजी, बडीशेप व मेथी भाजून
पूड करावी. मैदा, कडकडीत तुपाचे मोहन व
इतर वस्तू एकत्र करून गरम करून पाण्याने
पीठ भिजवावे. नंतर चांगले मळून या पिठाच्या
पोळ्या लाटून घ्याव्यात व नेहमीप्रमाणे
शंकरपाळे करावेत व तुपात तळावेत.