मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
87

पक्षी पिसे का विंचरतात?

बहुतेक सर्वच पक्षी एका जागी बसले
की, चोचीने आपली पिसे विंचरताना आढळून
येतात. पक्ष्यांना पंख फुटले की ते हा उद्योग
सुरू करतात. पिसे साफ करणे हा या मागचा
हेतू असतोच, पण त्यापेक्षाही या पिसांवर तेल
पसरवणे हा या मागचा प्रमुख हेतू असतो.
पक्ष्यांच्या शेपटीवर, ती जिथे शरीराला मिळते
तिथे तैल ग्रंथी असतात. हे तेल पिसांवर पसरले
की, पिसे स्वच्छ तर होतातच, पण या तेलामुळे
पक्ष्यांच्या शरीरावर पाणी पडताच ते निथळून
जाते. शिवाय या तेलावाटे पक्ष्यांना डी जीवनसत्व
मिळत राहते ते वेगळेच.