शेंगदाण्याची चिक्की

0

शेंगदाण्याची चिक्की


साहित्य : २ कप साधी साखर, १ कप ब्राऊन शुगर, अर्धा कप गोल्डन सिरप
(हा विकत मिळतो), अर्धा कप पाणी, पाऊण वाटी लोणी, अडीच कप भाजलेले शेंगदाणे
सोलून.

कृति : साखर (दोन्ही) गोल्डन सिरप, पाणी एकत्र करून जाड बुडाच्या भांड्यात ठेवून
गरम करावे. ढवळून साखर पूर्ण विरघळवून घ्यावी. मग त्यात लोणी घालून ढवळत रहावे
आणि पूर्ण वितळल्यावर एक उकळी येऊ द्यावी. पाक न हलवता तसाच मंद आचेवर
१५ ते २० मिनिटे ठेवावा किंवा पाक दोन तारीच्या पुढे जाईल इतपत उकळावा. मग
पाक उतरवावा आणि त्यात शेंगदाणे घालावेत. तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये ते मिश्रण
ओतावे. गार झाल्यावर तुकडे पाडावेत.

सुविचार

एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.

हसा आणि शतायुषी व्हा……

वडील : मोठी झाल्यावर काय करशील?
मुलगी : लग्न…
वडील : चुकीची बाब…आतापासून कोणाबद्दल असले
वाईट विचार ठेवू नये…

सुविचार ः

धैर्य म्हणजे संतोषाची कुपी आहे

शरीर हीच संपत्ती

शरीर हीच संपत्ती

अर्ध्या रात्री त्याचे डोयात अतिशय वेदना व्हाायला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, “मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे.” तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, “तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.” आत्मा म्हणाली, “माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसीत झाले आहे. तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही. एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.” तात्पर्य : शरीर व चांगले स्वास्थ्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे

घामाला वास का येतो?

घामाला वास का येतो?

घामाचे डाग कपड्यावर का पडतात? घामात पाण्याखेरीज असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे सोडियम लोराईड हा क्षार. याखेरीज इतर टाकाऊ पदार्थही असतात. कपडे घामाने भिजल्यानंतर कालांतराने घामातील पाण्याचे बाष्पीभवन होते व कपड्यावर क्षार तसेच इतर उत्सर्जित पदार्थ यामुळे डाग पडतात. सामान्यपणे घामाला कोणत्याही प्रकारचा वास नसतो. काखेतील घामाचा विशिष्ट प्रकारचा वास येतो. विशेषतः बस, लोकल अशा खूप गर्दीच्या ठिकाणी हे वास प्रकर्षाने जाणवतात. घामाला वास नसला तरी काख व शरीराच्या इतर भागातील घामाला तेथे जंतूसंसर्ग झाल्याने वास येतो. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाण्याने दिवसातून दोनदा तरी स्नान करावे, म्हणजे शरीराची स्वच्छता नीट राखता येईल. साधारणतः टाल्कम पावडरचा वापर केल्यास घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. घामोळ्या झाल्या असतील तर औषधीयुक्त पावडरी वापराव्यात. असे उपाय केल्यास घाम जास्त येणार नाही व आला तरी योग्य ती स्वच्छता राखली गेल्याने त्याला वास येणार नाही.

ओठावर लाली


देशी लाल गुलाबाच्या पाकळ्या वाटून त्यात थोडेसे ग्लिसरीन मिसळून दाट लेप
बनवून रात्री झोपताना ओठावर लावा. यामुळे ओठावर लाली येते.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0


सकाळी उपाशीपोटी आवळ्याचा मुरब्बा खाल्ल्याने बुध्दी तेज होते.

वास्तू

0

गुरुवार असे कपडे परिधान करा

* त्याचप्रमाणे गुरुवारी नेहमी पांढर्‍या रंगाचेच कपडे घालावे काळ्या रंगाचे कपडे
वापरू नयेत. पांढरा रंग हा स्वच्छतेचे प्रतिक असून तो आपले गुरुबल वाढवतो.

* जेवण शिजवणार्‍या उष्णतादेय वस्तूजवळ अंथरुण असू नयेत. त्यावर झोपल्याने
मस्तकशूळ उठतो. मेंदूचे विकार उद्भवतात.

फाफडी

0

फाफडी

साहित्य – तांदूळ पिढी २ वाट्या, बेसन १ वाटी, मीठ, तिखट, जिरे पूड व
ओवा पूड प्रत्येकी अर्धा टी स्पून, मोहन १ टे. स्पून, तळणीस तेल.

कृति – तळणीचे तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करा. घट्ट मळा. एकीकडे तेल
तापत ठेवा. पोळपाटावर पातळ पोळी लाटा. सुरीने तिच्या उभ्या पट्ट्या कापा व गरम
तेलात तळा.