जंकफूड धोकादायक
जंकफूड हे हृदयासाठी धोकादायक आहे. जास्त तळलेले, भाजलेले पदार्थ खाणंही
आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. प्रोसेस्ड मिटमध्येही मिटला फ्रेश ठेवण्यासाठी अनेक गोष्टींचा
समावेश केला जातो, जे हृदयासाठी धोकादायक आहे.
शके १९४५ शोभननामसंवत्सर,पौष कृष्णपक्ष, मघा १५|५३
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य:
मेष : दिवस चांगला जाईल. महत्त्वाच्या कार्यात हितचिंतकांकडून मदत मिळेल. वाहन
चिंता सतावेल. आरोग्य उत्तम राहिल.
वृषभ : जुने मित्र भेटतील. हितशत्रुंपासून सावधान. वाहने सावकाश चालवावीत.
कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखदराहील. नवीन करार होतील.
मिथुन : व्यावसायिक अडचणी सतावतील. पितृचिंता जाणवेल. वैवाहिक सुख
वाढेल.
कर्क : कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात वातावरण
मधुर राहील. मानसन्मानात वाढ होईल.
सिंह : धार्मिक भावना वाढेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान
वाढेल. वडीलधार्यांचा आदर करावा.
कन्या : राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील. भातृचिंता सतावेल.
वाहनपिडेचा संभव आहे.
तूळ : पितृचिंता सतावेल. न्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये
यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक : दिवस आनंदात जाईल. मानसन्मानात वाढ होईल. आपल्या क्रोधावर
संयम ठेवाल.
धनु : पूर्वीपासून आपल्या मनातील असलेले संकल्प पूर्ण होतील. पुर्वी केलेल्या
श्रमांचे फळ आज मिळेल.
मकर: आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. कार्य योग्य वेळी पूर्ण
करण्यासाठी कठोर श्रम करावे लागतील.
कुंभ : आपला विधायक दृष्टीकोन इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो.
मीन : आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती
संतोषदायक राहील. भातृचिंता सतावेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
राघवदास लाडू
साहित्य : हरभरा डाळीचा रवा ४ वाट्या, १ वाटी साजूक तूप, अर्धी वाटी खवा, २ वाट्या साखर, १ चमचा वेलदोडे पूड, काजू, बेदाणे.
कृती : हरभरा डाळीचा रवा दूध घालून घट्ट भिजवून ठेवावा. २ तासांनंतर तूप घालून रवा मोकळा करून खमंग भाजावा. खवा भाजून त्यात मिसळावा. साखरेत पाणी घालून दोन तारी पाक करावा. पाकात रवा, खवा, वेलदोडे पूड घालून मिश्रण एकसारखे करून ठेवावे. २-३ तासांनी लाडू वळावेत. वरून काजू, बेदाणे बसवावेत. राघवदास लागू खूप चवदार, खमंग लागतो. शक्तिवर्धक आहे. आठ दिवस टिकतो.
शरीर हीच संपत्ती
एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला अनेक रोगांनी विळखा घातला. तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉटरांकडे जाण्यासाठी वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूममध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नोकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले. (क्रमश:)
मेलेला माणूस काही काळाने उठून बसला असे होते का?
एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना! मृत व्यक्तीला तिरडीवर ठेवताच ती व्यक्ती उठून बसते. सगळ्या नातेवाईकांची धावपळ उडते. मग कळते की, ती व्यक्ती खरोखर मेलीच नव्हती. हृदयाचे ठोके बंद पडले व श्वसन बंद पडले. तरीही काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत व्यक्ती जिवंत राहू शकते. या अवस्थेला ‘सस्पेंडेड अॅनिमेशन’ किंवा ‘तात्पुरती मृतावस्था’ असे म्हणता येईल. ही अवस्था योगी-ध्यानधारणा करणारे लोक स्वतःच्या इच्छेने आणू शकतात; पण मेंदूचे रोग, दुखापती, बधिरीकरणानंतर, विजेचा धक्का वा उष्णता, बार्बीट्यूरेट वा अफूची अधिक मात्रा घेतल्याने बेशुद्धावस्थेत गेलेल्या व्यक्तींमध्ये सस्पेेंडेड अॅनिमेशन ही अवस्था आढळून येते. त्यामुळेच मृत्यूचे निदान करताना ते फार काळजीपूर्वक करावे लागते. हृदयाचे ठोके स्टेथास्कोपने तपासून, तसेच श्वसनाची क्रिया होते का हे तपासून, पुरेसा वेळ गेल्यानंतर तज्ज्ञ डॉटर व्यक्तीला मृत घोषित करतात. मेंदूच्या कार्याचा विद्युत आलेख घेण्याची सोय असल्यास तो घेतात. ५ मिनिटे मेंदूच्या पेशींनी कोणत्याच प्रकारच्या कार्याचे प्रदर्शन आलेखात न केल्यास (हा आलेख म्हणजे केवळ एक सरळ रेषाच येते) व्यक्ती मृत आहे, असे समजता येते. मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. सस्पेंडेड अॅनिमेशन मधील माणूस पुन्हा जिवंत होतो, कारण तो खरोखर मेलेलाच नसतो. नाहीतर तुम्हाला वाटेल की, ती व्यक्ती नसून भूतच आहे. जगात भूत नसते, हे पक्के लक्षात ठेवा म्हणजे झाले!
विक्सचा असाही उपयोग
विक्समध्ये कापूर आणि मेन्थोल असते. जखमेवर विस लावल्यास ती भरून निघते. विक्स पुरळ आणि मुरुमावर गुणकारी आहे. पुरळ असेल त्या ठिकाणी थोडेसे विस हाताच्या बोटावर घेऊन रात्री झोपण्यापूर्वी लावावे. पायाच्या किंवा हाताच्या नखांना संसर्ग झाला असेल तर दिवसातून दोन वेळा विक्स लावा. एखादा किडा चावल्यावर त्वचेवर खाज येत असेल तर त्या जागी थोडेसे विक्स लावा. झोपण्यापूर्वी पायांच्या टाचांना विक्स लावून मसाज करा. यामुळे टाचा निरोगी राहतील.