बुद्धीला व्यवहाराची जोड हवी

बुद्धीला व्यवहाराची जोड हवी

पाणीनी हे संस्कृतचे महान व्याकरणकार. २००० वर्षांपूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले.
एकदा ते शिष्यांना व्युत्पत्ती विषयी शिकवीत होते त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत
होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले पण
व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यात ते गडून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. ‘व्या जिघ्रती इती व्याघ्रः’ म्हणजे वास घेत
चालतो तो वाघ पण झाले काय वाघाने त्यांचीच शिकार केली.

तात्पर्यः या ठीकाणी फक्त बुध्दी असून चालत नाही, त्याला व्यवहाराची सांगड घालावी लागते.

डासांपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय कोणता?

डासांपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय कोणता?

डासांपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय आहेत. डासांची पैदास जेथे होते त्या जागांवर किटकनाशके फवारून त्यांचा नायनाट करणे, हा प्रभावी उपाय असला तरी शहरांमध्ये वा खूप डास असलेल्या ठिकाणी स्वतःचे रक्षण करण्यासाठी काय करावे; हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. डासांच्या चाव्यापासून तुमचे रक्षण व्हावे, यासाठी अनेक उपाय आहेत. कडूनिंबाच्या पाल्याचा धूर करणे व नंतर दारेखिडया उघडून धूर बाहेर काढणे यात धुरामुळे डास पळून जातात. पण ते परत येतात. कासव छापसारख्या अगरबत्त्या रात्रभर लावून ठेवल्यासही धूर होतो व डास पळून जातात; पण आपल्याही फुप्फुसात धूर जातो व खोकला, दम्याचा त्रास असलेल्यांना दम्याचा झटका येऊ शकतो. फुप्फुसाच्या कर्करोगाची शयताही असते. असे काही शास्त्रीय अभ्यासामध्ये दाखवण्यात आले आहे. (अर्थात यावर संशोधन चालू आहे) काही तेले अंगाला लावल्यास डास चावत नाहीत; पण याची किंमत लक्षात घेता व अंगाला तेल लावून झोपण्यातील अडचणींचा विचार करता ही पद्धतही योग्य ठरत नाही. गुडनाईट, ओडोमॉससारख्या वड्या आजकाल बाजारात मिळतात त्यात रासायनिक पदार्थ असतात. ते श्वसनावाटे आपल्या शरीरात जातात. सध्या हे पदार्थ सुरक्षित समजले जातात; पण २५ वा ५० वर्षानंतरच्या वापराने काही दुष्परिणाम होत नसतील असे कोणालाच सांगता येत नाही. तसेच महिन्याला ४० ते ५० रूपये खर्च येईल तो वेगळाच. मग काय करायचे? डासांना चावू द्यायचे की काय? काळजी करू नका. डासांच्या चाव्यापासून वाचण्याचा सुरक्षित, सोपा व कमी खर्चाचा असा एक मार्ग आहे. तो म्हणजे मच्छरदाणी वापरणे. एकदा मच्छरदाणी आणली की मग कोणताच खर्च नको. रासायनिक पदार्थांच्या व धुराच्या दुष्परिणामांची चिंता नको व अंगाला तेल लावून कसेसेच वाटायला नको! डासही चावणार नाहीत व आरोग्यही नीट राहील.

चटपटीत मोठा हलवा

0

चटपटीत मोठा हलवा

साहित्य : चणा डाळ २५० ग्रॅम, दूध १ कप, तूप २५० ग्रॅम, खवा १ कप, वेलची पूड,
चारोळ्या, साखर ४०० ग्रॅम, वर्ख.

कृती : डाळ निवडा व धुवा. निदान  ५-६ तास पाण्यात भिजवा. मग उपसा व
वाटून घ्या. जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाका. त्यात वाटलेली डाळ टाका. गडद सोनेरी रंग
येईल तो परता. त्यावर दूध ओता. गॅस मंद करा. वरून झाकण घाला. १-२ मिनिटांनी
झाकण काढा. त्यात खवा घाला व परता. मग साखर घाला. हलवत रहा. हलवा दाटत
जाईल. त्यात वेलची पूड. चारोळ्या घाला. हवा तेवढा दाट झाला की गॅस काढा. खोलगट
बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर वर्ख लावा.

गुळ खाण्याचे असेही फायदे

0

गुळ खाण्याचे असेही फायदे

* रक्ताचे शुद्धीकरण – गूळ रक्ताला शुद्ध करतो. त्याला दररोज आपल्या आहारात
सामील करा.
* पोट ठीक ठेवणे – पचन संबंधित सर्व समस्यांना गूळ खाऊन दूर करू शकता.
* गुडघ्यांचा त्रास कमी होतो – गूळ खाल्ल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. दररोज
अदरकचा एक लहान तुकड्या बरोबर गूळ मिसळून खाल्ल्याने गुडघे मजबूत होतात आणि दुखणे
दूर होते

वास्तू

0


* घरात प्रवेश करताना लगेच चूल,
शेगडी नजरेस पडता कामा नये. घरातील धन
नष्ट होऊ लागते. पार्टीशन करा.

* दक्षिणेकडे असणारा आड/विहीर
यामुळे अशुभ प्रभाव पडतो व घरात पुत्रसंतती
जन्म घेत नाही. जरी झाली तरी ती सदोष
असते.

                                                                     संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

सल्ला

0


* थर्मास स्वच्छ करण्यासाठी
साबणाच्या पाण्यात वर्तमानपत्राचे तुकडे टाकून
१०-१५ मिनिटे ठेवून हलवून धुवावा.

हसा आणि शतायुषी व्हा!

इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं:
’तडफड’ म्हणजे नेमके काय असतं ?
सासु शांतपणे उठली,
आणि वायफायचा स्विच बंद केला.
म्हणाली… घे अनुभव.

शिकवण साधूची

शिकवण साधूची

एका गावाच्या भोवती जंगल होतं. त्या जंगलातून एक पायवाट शहराकडे जात होती. बाजारहाट किंवा राजाच्या दरबारी नोकरीस जाताना गावकर्‍यांना याच पायवाटेवरून जावे लागे. काही दिवसांनी अतिशय विषारी व मोठा नागराज त्या जंगलातील पायवाटेवर आडवा पडून राहू लागला. त्याने अनेकांना दंश केला. बरीच माणसं दगावली, त्यामुळे त्या नागराजाबद्दलची दहशत वाढली. एक साधू त्या पायवाटेवरून निघाला असता, त्याला त्या नागराजाने दंश केला. तरी तो साधू उभाच! म्हणून पुन्हा त्या नागराजाने कडकडून दंश केला. तरी साधूवर काही परिणाम झाला नाही. साधू त्याला म्हणाला, ‘अरे तू निष्कारण दंश करून कित्येकांना ठार केलेस, जन्म माणसाचा असो की सर्पाचा. पाप पदरी पडतेच. तुझ्या खाती किती पाप जमा झाले असेल याचा कधी विचार केला आहेस का?’ ‘मग मी काय करू महाराज?’ ‘तू आजपासून दंश करायचे सोडून दे. उंबराची फळं भक्षण कर व देवाचे नामस्मरण करत त्याच उंबर वृक्षाखाली रहा. ही पायवाट मोकळी कर.’ साधूचे ऐकून नागराज उंबराच्या झाडाखाली गेला व पिकलेली सुंदर फळे खाऊन ‘हरी हरी’ मंत्रजप करीत राहिला. साधूने गावात जाऊन आजपासून नागराजाने पायवाट मोकळी केली व त्याने दंश करण्याचे सोडल्याचे सर्वांना सांगितले. मग गावकरी निर्धास्तपणे त्या पायवाटेवरून येऊ-जाऊ लागले. एके दिवशी एक गारुडी आला. त्याने उंबराच्या झाडाखाली उंबर फळाप्रमाणे लालबुंद अशा नागाला पाहिले व टोपलीत बंद करून घेऊन गेला. नागराज संन्यासी बनला होता. उंबर फळे खाऊन तो लाल झाला होता. त्या गारुड्याने तो लाल नागराज दाखवून शहरात त्याचे खेळ दाखवू लागला. तो मोठा लाल नाग पाहून लोक अचंबित होऊन पैसे, धान्य व फळे देऊ लागले. गारुडी खूष होता. तो संन्यासी साधू गर्दी पाहून तेथे आला. तेव्हा नागराज इतका मऊ झालेला पाहून साधूला वाईट वाटले. साधू त्या नागराजाजवळ आला व म्हणाला, ‘इतकाही मऊ होऊ नकोस की, तुझ्या आयुष्याचा अर्थच निघून जाईल. यापुढे तू मोठे फुत्कार टाक पण कुणाला चावू नकोस. नुसत्या फुत्काराने लोक तुका घाबरतील.’ त्याबरोबर नागराजाने मोठा फुत्कार टाकला. गारुडी व लोक घाबरले. मग तो नागराज सळसळत जंगलाकडे निघून गेला. ‘पाहिलंत, जगात अगदीच मऊ वागून चालत नाही. बरं का मुलांनो!’ आजोबा म्हणाले. दीपा व मनोज हसले

खूप खेळल्यावर घाम का येतो ?

खूप खेळल्यावर घाम का येतो ?


खूप खेळल्याने, धावल्याने व्यायाम होतो. शरीरातील स्नायूंचे मोठ्या प्रमाणावर आकुंचनय्प्रसरण होते. स्नायूंचे कार्य वाढते. साहजिकच  या भौतिक श्रमांमुळे उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान ठराविक पातळीवर स्थिर राहण्यासाठी शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची आवश्यकता असते. व्यायामामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या परिणामाने
त्वचेखालचा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्वचेचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा जास्त होते व काही उष्णता वातावरणात सोडली जाते; परंतु उष्णतेतील ह्या मार्गाने होणारी घट अल्प प्रमाणातच असते. व्यायामानंतर निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर टाकण्याचा महत्त्वाचा मार्ग घाम हाच होय. खूप व्यायाम केल्यानंतर घाम येण्याचे प्रमाण वाढते व त्याबरोबरच घामाचे बाष्पीभवन होण्याचेही प्रमाण वाढते. शरीरातील वाढलेली उष्णता व मेंदूतील प्रेरणा या दोहोंमुळे व्यायामानंतर
आपल्याला खूप घाम येतो. विश्रांती घेतल्यावर हळूहळू घाम येण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारे घाम आल्याने शरीरात निर्माण झालेली उष्णता शरीरा बाहेर टाकली जाते व शरीराचे तापमान सामान्य पातळीत राहते. त्यामुळेच खूप व्यायाम
केल्यावर घाम येतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम आणखीनच येतो व हिवाळ्यात तेवढाच व्यायाम करून घाम कमी येतो, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.

कांजण्या वा मोठ्या फोडांचे डाग राहिलेले असतील तर

चेहरा उजळण्यासाठी


* जर चेहर्‍यावर देवी, कांजण्या वा मोठ्या फोडांचे डाग राहिलेले असतील तर
दोन वाटून पीठ केलेले बदाम, दोन चमचे दूध व एक चमचा संत्र्यांच्या सालींची पावडर
एकत्र मिसळून हळूवारपणे चेहर्‍यावर चोळा. ती तासभर चेहर्‍यावर ठेवून नंतर धुवून टाका.
असे नियमित केल्यास चेहरा उजळलेला आपल्याला दिसेल.

* नाश्त्यामध्ये केळाचे सेवन करणेसुध्दा लाभकारी आहे. नाश्त्यात अथवा सायंकाळी
१ केळ जरूर खावे. याने आपले ब्लडप्रेशर नियंत्रित राहील.