मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
33

घामाला वास का येतो?

घामाचे डाग कपड्यावर का पडतात? घामात पाण्याखेरीज असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे सोडियम लोराईड हा क्षार. याखेरीज इतर टाकाऊ पदार्थही असतात. कपडे घामाने भिजल्यानंतर कालांतराने घामातील पाण्याचे बाष्पीभवन होते व कपड्यावर क्षार तसेच इतर उत्सर्जित पदार्थ यामुळे डाग पडतात. सामान्यपणे घामाला कोणत्याही प्रकारचा वास नसतो. काखेतील घामाचा विशिष्ट प्रकारचा वास येतो. विशेषतः बस, लोकल अशा खूप गर्दीच्या ठिकाणी हे वास प्रकर्षाने जाणवतात. घामाला वास नसला तरी काख व शरीराच्या इतर भागातील घामाला तेथे जंतूसंसर्ग झाल्याने वास येतो. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाण्याने दिवसातून दोनदा तरी स्नान करावे, म्हणजे शरीराची स्वच्छता नीट राखता येईल. साधारणतः टाल्कम पावडरचा वापर केल्यास घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. घामोळ्या झाल्या असतील तर औषधीयुक्त पावडरी वापराव्यात. असे उपाय केल्यास घाम जास्त येणार नाही व आला तरी योग्य ती स्वच्छता राखली गेल्याने त्याला वास येणार नाही.