शेंगदाण्याची चिक्की

0
59

शेंगदाण्याची चिक्की


साहित्य : २ कप साधी साखर, १ कप ब्राऊन शुगर, अर्धा कप गोल्डन सिरप
(हा विकत मिळतो), अर्धा कप पाणी, पाऊण वाटी लोणी, अडीच कप भाजलेले शेंगदाणे
सोलून.

कृति : साखर (दोन्ही) गोल्डन सिरप, पाणी एकत्र करून जाड बुडाच्या भांड्यात ठेवून
गरम करावे. ढवळून साखर पूर्ण विरघळवून घ्यावी. मग त्यात लोणी घालून ढवळत रहावे
आणि पूर्ण वितळल्यावर एक उकळी येऊ द्यावी. पाक न हलवता तसाच मंद आचेवर
१५ ते २० मिनिटे ठेवावा किंवा पाक दोन तारीच्या पुढे जाईल इतपत उकळावा. मग
पाक उतरवावा आणि त्यात शेंगदाणे घालावेत. तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये ते मिश्रण
ओतावे. गार झाल्यावर तुकडे पाडावेत.