बासमती शृंगार

0

बासमती शृंगार

साहित्य : २ वाट्या बासमती तांदूळ,
१ वाटी खवा, ३ मोठे चमचे साजूक तूप,
३ वाट्या साखर, अर्धी वाटी काजू-बदाम
काप पाव चमचा बेदाणे, १ चमचा वेलदोडा
पूड, पाव चमचा केशर (दुधात भिजवून), १
मोठा चमचा गुलाबपाणी (इसेन्स नव्हे) आणि
थोड्या गुलाब पाकळ्या.
कृती : तांदूळ स्वच्छ धुवून निथळावे.
तांदळाच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळून
त्यात मोकळा सळसळीत भात शिजवावा
आणि परातीत पसरून गार होऊ द्यावा.
साखरेचा तीनतारी पाक करून त्यात खवा,
केशर, वेलदोडा पूड घालावी. जाड बुडाच्या
भांड्यात तूप तापवून काजू-बदाम-बेदाणे
परतून त्यावर भात घालावा. साखरेचा पाक,
गुलाबपाणी घालून सगळे अलगद मिसळावे.
मंद आचेवर तवा ठेवून त्यावर भांडे ठेवावे.
घट्ट झाकण ठेवून पाक जिरून वाफ येऊ
द्यावी. वाढताना भाताच्या मुदी पाडून वर
गुलाबपाकळी लावावी.

पाचक ओवा दुखणे दूर करतो

0

पाचक ओवा दुखणे दूर करतो


हिवाळ्यात होणार्‍या दुखण्यांपासून आराम मिळावा म्हणून ओव्याचे वेगवेगळ्या प्रकारे
औषध स्वरुपात दररोज सेवन केल्यास निश्चितच फायदा होतो. जर सांधे दुखत असतील तर
सरसोच्या तेलात लसूण आणि ओवा घालून त्या तेलाने मालिश करा. अजीर्णाचा त्रास होत
असेल तर सकाळी रिकाम्या पोटी ३ ग्रॅम ओव्याच सेवन केल्यास फायदा होईल

उपकार स्मरावे

उपकार स्मरावे

अज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर
आली. घरातल्या कोणाला पाठवावे ? चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणार्‍या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.
तात्पर्य : उपकाराची जाण ठेवावी

वातावरणातील आर्द्रतेचा आरोग्यावर काही परिणाम होतो का?

वातावरणातील आर्द्रतेचा आरोग्यावर काही परिणाम होतो का?


आपल्या वातावरणात थोडेफार बाष्प असतेच. मुंबईचे हवामान दमट तर मराठवाडा-विदर्भात ते कोरडे-रखरखीत असते. मुंबईच्या दमट हवामानात सारखा घाम येतो, तर रखरखीत वातावरणात त्वचा कोरडी पडते. वातावरणातील आर्द्रतेचा आरोग्यावर बराच प्रभाव पडतो. हवामानातील आर्द्रता ६५% हून अधिक जास्त वाढली तर हवा ओलसर, चिकट
भासायला लागते व आपण अस्वस्थ होतो. दमा वगैरे श्वसनाचे विकार असणार्‍या लोकांना श्वसनात अडचणी येऊ शकतात. हवामानातील आर्द्रता ३०% हून अधिक कमी झाल्यास हवा कोरडी, रखरखीत वाटायला लागते. श्वास घेताना नाकात कोरडेपणा वाटायला जाणवतो. कालांतराने नाकातील श्लेष्मल आवरणाला इजा होते. जंतूसंसर्गही होऊ शकतो घसा बसणे, खोकला ही लक्षणेही निर्माण होतात. आपल्या लक्षात येईल की, हवेत योग्य त्या प्रमाणात आर्द्रता असेल तरच आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच एखादे ठिकाण वातानुकूलित करताना हवेच्या तापमानाबरोबरच हवेतील आर्द्रतेचेही संतुलन राखले जाते.

सुविचार

ध्येय जितके महान असते; तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो.

सुविचार

ध्येयासाठी जगणे हे ध्येयासाठी मरण्यापेक्षाही कठीण आहे.

हसा आणि शतायुषी व्हा!

एका लहान मुलाने त्याच्या बाबांना विचारले,
बाबा सांगा ना ….माझा जन्म कसा झाला?
त्याचे बाबा म्हणतात अरे कार्ट्या तुला किती वेळा सांगितलाय..
तुझा रीतसर जन्म झालेला आहे..
आम्ही तुला कोणत्याही website वरून फुकटात  download नाही केले…

सल्ला

0

गिर्यारोहक, हाइकर्स यांच्याबरोबरही नेहमी चॉकलेटस् असतातच. त्यात भरपूर
पौष्टीक तत्व, प्रोटीन, जीवनसत्व असतात. पर्वतीय क्षेत्रात शरीरातील कॅलरीज्ची
गरज भागविण्याचे कामही चॉकलेटस् करतात. चॉकलेटस्मध्ये फॅट, कार्बो
हायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक, कॅरोटीन आणि भरपूर प्रमाणात
जीवनसत्व असतात. मिल्क चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेटमध्ये या घटक द्रव्यांचे प्रमाण
अधिक असते. शरीराची पौष्टीकतेची गरज भागविण्याचे कामही चॉकलेट करते. मात्र हे
चॉकलेटमधील घटकांवर अवलंबून असते. अन्यथा अतिरिक्त कॅलरीज्मुळे लठ्ठपणाची
शयता नाकारता येत नाही. चॉकलेट मध्ये मेंदूला आराम देण्याचा गुण असतो.

                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

वास्तू

0


स्टोव्ह, चूल शेगडीजवळ पाण्याचा हंडा वा सिंक ठेवू नये. घरात भांडणे होतात.

भुवयांच्या सौंदर्यासाठी

डोळ्यांचे सौंदर्य

भुवयांच्या सौंदर्यासाठी

आठवड्यातून एकदा त्यावर जैतून वा जवसाचे तेल लावून चोळावे. कधी कधी बर्फाचा तुकडा घासावा व टर्किश टॉवेलने कोमट पाण्यात भिजवून पिळून भुवयांवर दाबून धरावा  यामुळे भुवयांचे केस मुलायम व काळे होतात. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे झाल्यास रोज दुधावरील साय काळ्या वर्तुळांवर लावावी. कच्चा बटाटा मधोमध चिरून डोळ्यांवर ठेवून झोपावे. बटाटा काळ्या वर्तुळांना स्पर्श करील असा ठेवावा. २०-३० मिनिटांनी धुवावे.